॥अभंगवाणी॥२५०१ते२७५०॥


2501
नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥1॥
हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥ वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥3॥
2502
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥1॥
हें कां मिळतें उचित । तुह्मी नेणा कृपावंत ॥ध्रु.॥ सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥2॥ तुका ह्मणे नास । आह्मां ह्मणविलियां दास॥3॥
2503
देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥1॥
लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥ शुद्ध भHी मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥2॥ तुका ह्मणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥3॥
2504
कडसणी धरितां अडचणीचा ठाव । ह्मणऊनि जीव त्रासलासे ॥1॥
लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥ संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥2॥ तुका ह्मणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥3॥
2505
हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥1॥
आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥2॥ तुका तुमचा ह्मणवी दास । तेणें आस पुरवावी ॥3॥
2506
आपल्या च स्काुंफ्दें । जेथें तेथें घेती छंदें ॥1॥
पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥ विश्वासाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥2॥ तुका ह्मणे घाणा । मूढा तीथाअ प्रदिक्षणा ॥3॥
2507
उद्वेगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥1॥
सकळ नििंश्चती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥ आपुलिया नांवें नाहीं आह्मां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥2॥ तुका ह्मणे चेळें एकाचिया सत्ता । आपुलें मिरवितां पणें ऐसें ॥3॥
2508
बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥1॥
घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥ ऐका निवळल्या मनें। बरवें कानें सादर ॥2॥ तुका ह्मणे करूनि अंतीं । नििंश्चती हे ठेवावी ॥3॥
2509
माझी मज जाती आवरली देवा । नव्हतां या गोवा इंिद्रयांचा ॥1॥
कासया मी तुझा ह्मणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥ भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥2॥ तुका ह्मणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुह्मां ॥3॥
2510
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥1॥
आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुह्मी ॥ध्रु.॥ नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥2॥ तुका ह्मणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥3॥
2511
एका ऐसें एक होतें कोणां काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥1॥
घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥ केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥2॥ तुका ह्मणे जाळीं अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥3॥
2512
जाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥1॥
आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥ सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥2॥ तुका ह्मणे भाग । गेला निवारला लाग ॥3॥
2513
मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥1॥
आतां होइऩल ते शिरीं । मनोगत आYाा धरीं ॥ध्रु.॥ तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥2॥ तुका ह्मणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥3॥
2514
नाहीं माथां भार । तुह्मी घेत हा विचार ॥1॥
जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥ आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥2॥ तुका ह्मणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥3॥
2515
माझें जड भारी । आतां अवघें तुह्मांवरी ॥1॥
जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥ करितों जें काम। माझी सेवा तुझें नाम ॥2॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे॥3॥
2516
तुह्मी आह्मी भले आतां । जालों चिंता काशाची॥1॥
आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥ सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥2॥ तुका ह्मणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥3॥
2517
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥1॥
आलिया वचनें रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥2॥ तुका ह्मणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥3॥
2518
कोण पुण्य कोणा गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी॥1॥
जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संवसारा पाणी ॥ध्रु.॥ कोण हा भाग्याचा । ऐसियांसी बोले वाचा ॥2॥ तुका ह्मणे त्यांचे भेटी। होय संसारासी तुटी ॥3॥
2519
तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुह्मां सोइऩ ॥1॥
एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥ फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥3॥
2520
किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥1॥
कोणा एका भावें तुह्मी अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥ इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥2॥ तुका ह्मणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥3॥
2521
दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥1॥
तांतडींत करीं ह्मणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥ संकल्पाच्या बीजें इंिद्रयांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥2॥ तुका ह्मणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥3॥
2522
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥1॥
नाही केली जीवेंसाटी । तों कां गोष्टी रुचे तें ॥ध्रु.॥ आधी निर्धार तो सार । मग भार सोसीन ॥2॥ तुका ह्मणे खाऊं जेवूं । नेदूं होऊं वेगळा ॥3॥
2523
होइल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥1॥
तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥ जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥2॥ तुका ह्मणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥3॥
2524
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥1॥
विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आह्मी असों ॥ध्रु.॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥2॥ तुका ह्मणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥3॥
2525
निष्ठ‍ तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी॥1॥
केला च करावा केला कइवाड । होइऩल तें गोड न परेते ॥ध्रु.॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥2॥ तुका ह्मणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥3॥
2526
बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥1॥
धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥ गादल्याचा जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥2॥ तुका ह्मणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥3॥
2527
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥1॥
काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥ धनवंjयाचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥2॥ तुका ह्मणे आलें मोडएासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥3॥
2528
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥1॥
जालों उतराइऩ शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥ आजिवरि होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥2॥ तुका ह्मणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥3॥
2529
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥1॥
सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥ बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आह्मां ॥2॥ तुका ह्मणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥3॥
2530
आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥1॥
उधारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥ करा आतां मजसाटीं वाड पोट । ठाव नाहीं तंटे जालें लोकीं ॥2॥ तुका ह्मणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥3॥
2531
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥1॥
दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥ बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥2॥ तुका ह्मणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥3॥
2532
शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥1॥
सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥ अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥2॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥3॥
2533
गोदे कांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें॥1॥
देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥ राखोनियां ठाव । अल्प जीव लावूनि ॥2॥ तुका ह्मणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥3॥
2534
न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥1॥
सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥ सावधान चित्त होइऩल आधारें । खेळतां ही बरें वाटइऩल ॥2॥ तुका ह्मणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥3॥
2535
मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥1॥
दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥ वचनाचा तो पसरुं काइऩ । तांतडी डोइऩपाशींच ॥2॥ तुका ह्मणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥3॥
2536
अवचिता चि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां॥1॥
भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥ दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥2॥ तुका ह्मणे वांटा जाला । बोलों बोली देवासीं ॥3॥
2537
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥1॥
धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥ न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥2॥ तुका ह्मणे नव्हे धीर । तुह्मां िस्थर दयेनें ॥3॥
2538
करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥1॥
जिहीं केला मूतिऩमंत । ऐसे संतप्रसाद ॥ध्रु.॥ सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥2॥ तुका ह्मणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥3॥
2539
अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निज खुण राहिलोंसें ॥1॥
आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥ एकविध भाव नव्हे अभावना । आणिकिया गुणां न मिळवे ॥2॥ तुका ह्मणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥3॥
2540
काय तुझी थोरी वणूप मी पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥1॥
तुज ऐसी दया नाहीं आणिकासी । ऐसें हृषीकेशी नवल एक ॥ध्रु.॥ कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केलें कोठें त्यांनीं ॥2॥ अकस्मात तेथें रणखांब रोविला । युद्धाचा नेमिला ठाव तेथें ॥3॥ कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणीं आले तेथें ॥4॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती ह्मणोनियां ॥5॥ हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥6॥ ऐसिये आकांतीं वांचों कैसे परी । धांव बा श्रीहरी लवलाहें ॥7॥ टाकोनियां पिलीं कैसें जावें आतां । पावें जगन्नाथा लवलाहीं ॥8॥ आली तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥9॥ एका गजाचिया कंठीं घंटा होती। पाडिली अवचिती तयांवरी ॥10॥ अठरा दिवस तेथे द्वंदजुंज जालें । वारा ऊन लागलें नाहीं तयां ॥11॥ जुंज जाल्यावरी दाविलें अर्जुना । तुह्मीं नारायणा पिक्षयांसी ॥12॥ पाहें आपुलिया दासां म्यां रिक्षलें । रणीं वांचविलें कैशा परी ॥13॥ ऐसी तुज माया आपुल्या भHांची । माउली आमुची तुका ह्मणे ॥14॥
2541
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥1॥
गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥2॥ तुका ह्मणे आतां आपुल्या सायासें । आह्मां जगदेशें सांभाळावें ॥3॥
2542
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥1॥
स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥ देह सांभाळून। पायांवरी लोटांगण ॥2॥ विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥3॥
2543
लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥1॥
कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥2॥ पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥3॥ मनाची ते चाली मोहाचिये सोइऩ । ओघें गंगा काइऩ परतों जाणे ॥4॥ तुका ह्मणे कोठें उदार मेघां शिH । माझी तृषा किती चातकाची ॥5॥
2544
युिH तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥1॥
संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥ जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥3॥
2545
हा गे आलों कोणी ह्मणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥1॥
तुह्मी तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥ भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥2॥ तुका ह्मणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥3॥
2546
कैसा तीं देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंतीं डोळीं नारायणा ॥1॥
तेणें लोभें जीव जालासे बराडी । आह्मी ऐशी जोडी कइप लाभों ॥ध्रु.॥ असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥2॥ तुका ह्मणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणाक्षणां होते ॥3॥
2547
कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥1॥
चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिरों नेणे ॥ध्रु.॥ सांवळें रूपडें चतुर्भुज मूतिऩ । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥2॥ तुका ह्मणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥3॥
2548
काय माझा पण होइऩल लटिका । िब्रदावळी लोकां दाविली ते ॥1॥
खरी करूनियां देइप माझी आळी । येऊनि कृवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥ आणीक म्यां कोणा ह्मणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥2॥ तुका ह्मणे मज येथें चि ओळखी । होइऩन तो सुखी पायांनीं च ॥3॥
2549
तुह्मां आह्मां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥1॥
उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥ नेणपणें आह्मी आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥2॥ तुका ह्मणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥3॥
2550
नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवऑयाचा वाद करीतसें ॥1॥
कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥ काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥2॥ लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकऑयानें घोळी जवळी मन ॥3॥ वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥4॥ तुका ह्मणे माझी येथें चि आवडी। श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥5॥
2551
ह्मणऊनी लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥1॥
पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥ बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥2॥ तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें॥3॥
2552
जेणें वाढे अपकीतिऩ । सर्वाथाअ तें वर्जावें ॥1॥
सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥ होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥2॥ तुका ह्मणे खोटें वर्म । निंद्यकर्म कािळमा ॥3॥
2553
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥1॥
परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥ जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥2॥ तुका ह्मणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें॥3॥
2554
याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड॥1॥
नेदी मग फिरों मागें । अंगा अंगें संचरे ॥ध्रु.॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसां ॥2॥ पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥3॥ अंगीं वसे चि ना लाज । न ह्मणे भाज कोणाची॥4॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुिश्चत कोणें नसावें ॥5॥ तुका ह्मणे धरिला हातीं । मग नििंश्चतीं हरीनें ॥6॥
2555
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥1॥
तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥2॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥3॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥4॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥5॥ तुका ह्मणे दुस†या भावें । छायें नावें न देखवे ॥6॥
2556
न संडावा आतां ऐसें वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥1॥
ह्मणऊनि मनें विळयेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥ नाना वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥2॥ तुका ह्मणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥3॥
2557
सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥1॥
वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम जाला ॥2॥ तुका ह्मणे धणी ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥3॥
2558
देइऩल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥1॥
पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥ गुणां ऐसा भरणा भरी। जो जें चारी तें लाभे ॥2॥ तुका ह्मणे देवीं देव । फळे भव आपुला ॥3॥
2559
तेव्हां होतों भोगाधीन । तुह्मां भिन्न पासूनि ॥1॥
आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥ सन्मुख जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥2॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥3॥ सहज िस्थत आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना॥4॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥5॥ तुका ह्मणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥6॥ ॥5॥
2560
केला कैवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥1॥
काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥ अबाळीनें जावें निचिंतिया ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥2॥ तुका ह्मणे बळी देतां तें निधान । भिकेसाटीं कोण राज्य देतो ॥3॥
2561
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥1॥
जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोइऩ । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे तरीं सज्जनाची कीतिऩ । पुरवावी आतिऩ निर्बळांची ॥3॥
2562
करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें॥1॥
मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा ॥ध्रु.॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥2॥ तुका ह्मणे माझें खरें देणें घेणें । तुह्मी साक्षी जाणें अंतरींचें ॥3॥
2563
कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥1॥
बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥ आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥2॥ तुका ह्मणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥3॥
2564
आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥1॥
गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥ या चि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥2॥ तुका ह्मणे न सरें मागें । होइऩन लागें आगळा ॥3॥
2565
ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां॥1॥
मन येथें साहए जालें । हरिच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥ चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥2॥ तुका ह्मणे धरूं सत्ता । होइऩल आतां करूं तें ॥3॥
2566
देवासी तो पुरे एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥1॥
पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥ कांहीं नेघें शिरीं निमिkयाचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥2॥ तुका ह्मणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥3॥
2567
लौकिकासाटीं या पसा†याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥1॥
ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥ डव्हिळल्या मनें वितिळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥2॥ तुका ह्मणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥3॥
2568
नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥1॥
ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥ उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥2॥ तुका ह्मणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥3॥
2569
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥1॥
उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आह्मी जालों निंद लंडीपणें ॥ध्रु.॥ उभयतां आहे करणें समान । तुह्मां ऐसा ह्मणें मी ही देवा ॥2॥ तुका ह्मणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥3॥
2570
मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥1॥
मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥ आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥2॥ तुका ह्मणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥3॥
2571
निष्ठ‍ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥1॥
सांडियेली तुह्मी गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥ सांपडूनि संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥2॥ तुका ह्मणे तुज काय ह्मणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥3॥
2572
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥1॥
काशासाटीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥ जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥2॥ तुका ह्मणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥3॥
2573
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची॥1॥
दुस†याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥ खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुह्मांसी तें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां सवें करितां वाद । होइऩजेतें निंद जनीं देवा ॥3॥
2574
तुह्मां आह्मांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥1॥
किती ह्मणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥ बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥2॥ तुका ह्मणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥3॥
2575
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥1॥
परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥ अंगें सवाौत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥2॥ तुका ह्मणे दाता । तरि हा जीव दान देता॥3॥
2576
कोणापाशीं द्यावें माप । आपीं आप राहिलें ॥1॥
कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥ एकें दाखविले दाहा। फांटा पाहा पुसून ॥2॥ तुका ह्मणे सरलें वोझें । आतां माझें सकळ॥3॥
2577
नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥1॥
आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥ कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥2॥ तुका ह्मणे कल्प जाला। अस्त गेला उदय ॥3॥
2578
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥1॥
कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥ वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभरें । करुणाकरें रिक्षलें ॥3॥
2579
आह्मी देव तुह्मी देव । मध्यें भेव अधीक ॥1॥
कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥ भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥2॥ तुका ह्मणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥3॥
2580
हीनसुरबुद्धीपासाीं । आकृतीसी भेद नाहीं ॥1॥
एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥ एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥2॥ तुका ह्मणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें॥3॥
2581
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥1॥
कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥ वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥2॥ भिHभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा॥3॥ कोरडएा उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥4॥ करी विYाापना । तुका प्रसादाची दाना ॥5॥
2582
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुिद्ध तेणें न्यायें ॥1॥
ह्मणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥ विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥2॥ तुका ह्मणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥3॥
2583
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥1॥
येइप वो येइप वो येइप लवलाहीं । आिंळगूनि बाहीं क्षेम देइप ॥ध्रु.॥ उताविळ मन पंथ अवलोकी । आठवा ते चुकी काय जाली ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥3॥
2584
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुह्मी ॥1॥
निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुह्मांआह्मांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥ आणीक तों आह्मी न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥3॥
2585
तांतडीनें आह्मां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥1॥
नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥ वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥2॥ तुका ह्मणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥3॥
2586
नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥1॥
न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥ सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥2॥ तुका ह्मणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें॥3॥
2587
वचनें चि व्हावें आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥1॥
सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥ वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥2॥ तुका ह्मणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥3॥
2588
उखतें आयुष्य जायांचें किळवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥1॥
कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥ उत्पित्त प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥2॥ तुका ह्मणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥3॥
2589
बोलावे ह्मुण हे बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥1॥
भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥ मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥2॥ तुका ह्मणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥3॥
2590
लटिक्याचे वाणी चवी ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥1॥
अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥2॥ तुका ह्मणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥3॥
2591
नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । काुंफ्दाचे ते कष्ट भंगा मूळ ॥1॥
नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥ पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥2॥ तुका ह्मणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥3॥
2592
कोण्या काळें येइऩल मना । नारायणा तुमचिया॥1॥
माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥ लागली हे तळमळ चित्ता । तरी दुिश्चता संसारी ॥2॥ सुखाची च पाहें वास । मागें दोष सांभाळीं ॥3॥ इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥4॥ लाहो काया मनें वाचा । देवा साच्या भेटीचा ॥5॥ कांटाळा तो न धरावा । तुह्मी देवा दासांचा ॥6॥ तुका ह्मणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥7॥
2593
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥1॥
ऐसीं कैंचीं आह्मी पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥ व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥2॥ तुका ह्मणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥3॥
2594
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥1॥
पडिलें हें दिसे ब्रह्मांड चि वोस । दाटोनि उच्छ्वास राहातसे ॥2॥ तुका ह्मणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥3॥
2595
सुकलियां कोमां अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥1॥
न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥2॥ तुका ह्मणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥3॥
2596
शृंगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥1॥
न घलावा मधीं कामाचा विलंब । तुह्मी तों स्वयंभ करुणामूतिऩ ॥2॥ तुका ह्मणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥3॥
2597
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥1॥
तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥2॥ तुका ह्मणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥3॥
2598
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥1॥
बिळयाचीं आह्मी बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥ आतां कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥2॥ तुका ह्मणे पंढरीराया । थापटितों ठोक बाहएा ॥3॥
2599
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपें संकल्प ॥1॥
अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥ वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥2॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥3॥
2600
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥1॥
देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥ नेणे भाग सीण । दुजें कोणी तुह्मांविण ॥2॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी॥3॥
2601
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥1॥
अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥ उभय लोकीं उत्तम कीतिऩ । देव चित्तीं राहिलिया ॥2॥ तुका ह्मणे जीव धाय । नये हाय जवळी ॥3॥
2602
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥1॥
धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥ जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांटवणें ॥2॥ तुका ह्मणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी॥3॥
2603
जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥1॥
तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥ वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥2॥ तुका ह्मणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥3॥
2604
कोण होइऩल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥1॥
केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥ सहजें चि घडे आतां मोऑयाविण । येथें काय सीण आणि लाभ ॥2॥ तुका ह्मणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥3॥
2605
आह्मां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥1॥
परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥ अभयदानवृंदें। आह्मां कैंचीं द्वंदें ॥2॥ तुका ह्मणे आह्मी । हरिजन साधनाचे स्वामी॥3॥
2606
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥1॥
नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥2॥ तुका ह्मणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥3॥ ॥1॥
2607
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥1॥
करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥ दया संतां भांडवल। वेची बोल उपकार ॥2॥ तुका ह्मणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥3॥
2608
जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥1॥
पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥ कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥2॥ तुका ह्मणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥3॥
2609
निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥1॥
पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥ धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥2॥ अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥3॥
2610
आतां दुसरें नाहीं वनीं । निरांजनी पडिलों ॥1॥
तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥ मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥2॥ तुका ह्मणे करुणाकरा । तूं सोयरा जीवींचा ॥3॥
2611
धरूनियां सोइऩ परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां॥1॥
येइप पांडुरंगे नेइप सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों॥ध्रु.॥ बुिद्ध जाली साहए परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥2॥ न चलती पाय गिळत जाली काया । ह्मणऊनि दया येऊं द्यावी ॥3॥ दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥4॥ तुका ह्मणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥5॥
2612
कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचे खोटे तंट ॥1॥
ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥ कामवितां लोहो कसे। तांतडीनें काम नासे ॥2॥ तुका ह्मणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥3॥
2613
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥1॥
बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥ नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥2॥ तुका ह्मणे भिH । सुखरूप आदीं अंतीं ॥3॥
2614
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रह्मांदिकां पार नुलंघवे सामथ्यॉ ॥1॥
शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना। आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥ पाठीवरी मोळी तो चि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥2॥ आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका ह्मणे ओढी पायां सोइऩ मनाची ॥3॥
2615
बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सवाौत्तमें ॥1॥
सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥ लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥2॥ तुका ह्मणे केला होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥3॥
2616
पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥1॥
काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥ध्रु.॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभािळतां ठाव काय वांचे ॥2॥ दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुिश्चत एकपणें ॥3॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥4॥ तुका ह्मणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंद एकसरें॥5॥
2617
एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाताती टािळया ॥1॥
मातले वैष्णव नटती नाना छंदें। नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥ हाका अरोिळया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥2॥ तीथाअ नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका ह्मणे हरिहरात्मक चि पृथुवी॥3॥
2618
देव सखा आतां केलें नव्हे काइऩ । येणें सकळइऩ सोइरीं च ॥1॥
भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥2॥ अविनाश जोडी आह्मां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥3॥ पायांवरी डोइऩ ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥4॥ तुका ह्मणे जीव पावला विसावा । ह्मणवितां देवा तुमचींसीं ॥5॥
2619
कोण आतां किळकाळा । येऊं बळा देइऩल ॥1॥
सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥ लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥2॥ तुका ह्मणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥3॥
2620
आह्मां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥1॥
उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥ आह्मी शोभों निकटवासें। अनारिसें न दिसे ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं॥3॥
2621
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥1॥
अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥2॥ तुका ह्मणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥3॥
2622
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥1॥
केलें तरीं आतां शुशोभें करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥ नाहीं भHराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥3॥
2623
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारासी ॥1॥
काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥ केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पालटेना ॥12॥ तुका ह्मणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥3॥
2624
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥1॥
केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥ आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥2॥ तुका ह्मणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुह्मी ॥3॥
2625
बहुत करूनि चाळवाचाळवी । किती तुह्मी गोवी करीतसां ॥1॥
लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥ दुजियाचा तंव तुह्मांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥2॥ तुका ह्मणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥3॥
2626
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥1॥
वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥2॥ तुका ह्मणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुिद्ध कष्टी सदा दुःखी ॥3॥
2627
नव्हे मतोऑयाचा वाण । नीच नवा नारायण ॥1॥
सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥ लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥2॥ तुका ह्मणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥3॥
2628
घातला दुकान । देती आलियासी दान ॥1॥
संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥ मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥2॥ तुका ह्मणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥3॥
2629
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥1॥
ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥ पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥2॥ भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥3॥ देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥4॥ तुका ह्मणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥5॥
2630
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥1॥
ह्मणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥ एकविध आह्मी स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥2॥ तुका ह्मणे करीं सांगितलें काम । तुह्मां धर्माधर्म ठावे देवा ॥3॥
2631
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥1॥
आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजा याचा ॥ध्रु.॥ प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥2॥ तुका ह्मणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥3॥
2632
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥1॥
भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥ पाकसििद्ध स्वहस्तकें विनियोग। आवडीचे भाग सिद्ध केले ॥2॥ तुका ह्मणे आला उिच्छष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥3॥
2633
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥1॥
पावलें घेइऩन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं॥ध्रु.॥ न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥2॥ तुका ह्मणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥3॥
2634
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा॥1॥
अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥ नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥2॥ तुका ह्मणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥3॥
2635
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥1॥
होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥ लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । त्यांचें यां पुरतें विभागिलें ॥2॥ तुका ह्मणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंगा ॥3॥
2636
उदार तूं हरी ऐसी कीतिऩ चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥1॥
तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रह्मांडा ॥ध्रु.॥ मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥2॥ दिसों देसी कीविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका ह्मणे जिणें माझें तुज अधीन ॥3॥
2637
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥1॥
मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥ नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न ह्मणे दगड ॥2॥ तुका ह्मणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥3॥
2638
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥1॥
लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥ होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला॥2॥ कराया जतन तुका ह्मणे निजधन । केला नारायण साहए नेदी विसंबों ॥3॥
2639
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥1॥
सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥ वसो डोऑयांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥2॥ जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका ह्मणे खंडलें ॥3॥
2640
सोसें सोसें मारूं हाका । होइल चुका ह्मणऊनि॥1॥
मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥ नाम मुखीं बैसला चाळा। वेळोवेळां पडताळीं ॥2॥ तुका ह्मणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥3॥
2641
धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥1॥
पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥ नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाइऩन ॥2॥ तुका ह्मणे संतमेळीं । पायधुळी वंदीन॥3॥
2642
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥1॥
भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥ उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥2॥ तुका ह्मणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥3॥
2643
उदासीनाचा देह ब्रह्मरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥1॥
अनुताप अंगीं अिग्नचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥ दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटलें अंतर अहंभावें॥2॥ तुका ह्मणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥3॥
2644
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥1॥
नाहीं तें च घेतां शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥ नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥2॥ तुका ह्मणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥3॥
2645
तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥1॥
आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥ आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥2॥ तुका ह्मणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥3॥
2646
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥1॥
पुरवीं वासना साच सर्वजाणा । आह्मां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥ बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभोड ॥2॥ तुका ह्मणे धन कृपणा सोयरें । यापरि दुसरें नहो आतां ॥3॥
2647
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥1॥
संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥2॥ तुका ह्मणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुह्मी जाणां ॥3॥
2648
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥1॥
ह्मणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥ सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥2॥ तुका ह्मणे सुरा । दुधा ह्मणतां केवीं बरा॥3॥
2649
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥1॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥ याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥2॥ तुका ह्मणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥3॥
2650
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥1॥
अंती बोळवणेसाटीं । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥ लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥2॥ तुका ह्मणे हितें । जग नव्हो पडो रितें॥3॥
2651
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥1॥
कोणां आराणूक होइऩल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥2॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥3॥ तुका ह्मणे देतों देवाचें गा†हाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥4॥
2652
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥1॥
करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥ भुललिया संसारें । आलें डोऑयासी माजिरें ॥2॥ तुका ह्मणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥3॥
2653
आह्मां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणसकळ स्वामीचे ते ॥1॥
चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आYाा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥ दुजियापासून परतलें मन । केलें द्यावें दान होइऩल तें॥2॥ तुका ह्मणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही॥3॥
2654
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥1॥
ऐसा धीर देइप मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥ अंतरीं तों तुझा वास । आणिकां नास कारण ॥2॥ तुका ह्मणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥3॥
2655
चंदन तो चंदनपणें । सहज गुणसंपन्न ॥1॥
वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥ परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥2॥ तुका ह्मणे कैंची खंती । सुजाती ते ठाकणी ॥3॥
2656
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥1॥
हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां ॥ध्रु.॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥2॥ कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुिद्ध ॥3॥ भिH तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥4॥ तुका ह्मणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥5॥
2657
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥1॥
विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥ श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥2॥ तुका ह्मणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी॥3॥
2658
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥1॥
रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । ह्मणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । Yाानािग्न भरभरां जीवित्वेसी ॥2॥ फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥3॥ दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समपिऩलें ॥4॥ तुका ह्मणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥5॥
2659
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥
आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥
2660
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥1॥
एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥ अमृतसंजीवनी निवविली खाइऩ । अंगें तये ठायीं हारपलीं ॥2॥ एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ।3॥ अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥4॥ तुका ह्मणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥5॥
2661
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं॥1॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥2॥
पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनादऩन अभेदेंसी ॥3॥
आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥4॥
तुका ह्मणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥5॥
2662
सरलें आतां नाहीं । न ह्मणे वेळकाळ कांहीं ॥1॥
विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥
सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठ‍ नाहीं राग ॥2॥
भेदाभेद नाहीं । तुका ह्मणे तिच्याठायीं ॥3॥
2663
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥1॥
करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥
बाहिरल्या वेषें उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें॥2॥
तुका ह्मणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुह्मी साहे न व्हा देवा ॥3॥
2664
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥1॥
आतां तुह्मी सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें॥ध्रु.॥
व्याहएाजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥2॥
तुका ह्मणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुह्मां हातीं ॥3॥
2665
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥1॥
आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥
येथें नाहीं जाली कोणांची निरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥2॥
तुका ह्मणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥3॥
2666
वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥1॥
आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥
ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥2॥
तुका ह्मणे माग । नाहीं लागों देत लाग॥3॥
2667
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥1॥
नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥ हे चि यांची जोडी। सदा बोडकीं उघडीं ॥2॥ तुका ह्मणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥3॥
2668
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥1॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥ आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥2॥ आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥3॥ आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं दोन्ही ॥4॥ तुका ह्मणे करी आपण्यासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥5॥
2669
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥1॥
त्याची बुिद्ध त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥2॥ उंच निंच नाहीं । तुका ह्मणे खळा कांहीं ॥3॥
2670
न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥1॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विYाापना ॥ध्रु.॥ मायबाप बंधुजन। तूं चि सोयरा सज्जन ॥2॥ तुका ह्मणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥3॥
2671
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥1॥
ते मी नाठवीं घडिघडी । ह्मणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥ तुटे भवरोग । जेथें सर्व सुखें भोग ॥2॥ तुका ह्मणे विटे । धरियेले जें गोमटें ॥3॥
2672
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुह्मां ॥1॥
तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥ आमुच्या जीवींचा तो चि जाणे भावो । रकुमाइऩचा नाहो पांडुरंग ॥2॥ चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । ह्मणऊनि कांहीं नावडे त्या ॥3॥ तुका ह्मणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥4॥
2673
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥1॥
निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥ काय पळे सुखें चोरा लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥2॥ जयाचें कारण तो चि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥3॥ तुका ह्मणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥4॥
2674
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥1॥
माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोण सांगा ॥ध्रु.॥ धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुह्मी ॥2॥ वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुह्मां एक सांगतों मी ॥3॥ तुका ह्मणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुH जाला मान पावे ॥4॥
2675
नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥1॥
निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥ निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥2॥ आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥3॥ तुका ह्मणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥4॥
2676
जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥1॥
आतां माझ्या मना होइप सावधान । वोंपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥ शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥2॥ तुका ह्मणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥3॥
2677
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥1॥
पहिपाहुणेर ते सोहऑयापुरते । तेथुनि आरते उपचार ते॥ध्रु.॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥2॥ तुका ह्मणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥3॥
2678
साधावा तो देव सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण॥1॥
मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥2॥ तुका ह्मणे निज भोगइऩल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥3॥
2679
जळों अगी पडो खान । नारायण भोHा ॥1॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥ भोजनकाळीं करितां धंदा । ह्मणा गोविंदा पावलें ॥2॥ तुका ह्मणे न लगे मोल। देवा बोल आवडती ॥3॥
2680
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥1॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥ संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बिळवंत ॥2॥ तुका ह्मणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥3॥
2681
उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥1॥
उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥ दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याइऩ पापाची च मूतिऩ ॥2॥ तुका ह्मणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥3॥
2682
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥1॥
तरी च नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥ जावें वनांतरा। येणें उद्देशें दातारा ॥2॥ तुका ह्मणे गिरी । मज सेववावी दरी ॥3॥
2683
येइल तुझ्या नामा । जाल ह्मणों पुरुषोत्तमा ॥1॥
धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥ जगा कथा नांव। निराशेनें नुपजे भाव ॥2॥ तुह्मी साक्षी कीं गा । तुका ह्मणे पांडुरंगा ॥3॥
2684
नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥1॥
रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥ मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥2॥ तुका ह्मणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥3॥
2685
कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुह्मांसी ॥1॥
तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥ आड ऐसें येतें पाप। वाढे ताप आगळा ॥2॥ तुका ह्मणे गुण जाला । हा विठ्ठला हीनशिH ॥3॥
2686
लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥1॥
कोण्या पापें उदो केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥ न देखवे पिडला सर्प। दया दर्प विषाचा ॥2॥ तुका ह्मणे भलें । मज तो न वजे साहिलें॥3॥
2687
धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥1॥
तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥ न धरावा धीर । धांवा नका चालों िस्थर ॥2॥ तुका ह्मणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥3॥
2688
सेवकासी आYाा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥1॥
मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥ भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥4॥
तुका ह्मणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥3॥
2689. उद्वेगासी बहु फाकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥1॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु ॥ मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥2॥ तुका ह्मणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरि विYाापना ॥3॥
2690
दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥1॥
अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥ क्षणभंगुर ते ठाव। करूनि सांडावे चि वाव ॥2॥ तुका ह्मणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥3॥
2691
मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥1॥
रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥ उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥2॥ तुका ह्मणे लोणी घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥3॥
2692
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥1॥
विश्वासिया घडे लाभ । देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥2॥ तुका ह्मणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥3॥
2693
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥1॥
कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥ धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥2॥ तुका ह्मणे आड । स्वहितासी बहु नाड ॥3॥
2694
अतित्याइऩ बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥1॥
हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥ अवचटें अिग्न जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥2॥ जैसें तैंसें दावी आरसा । नकटएा कैसा पालटे ॥3॥
2695
हेंद†याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥1॥
नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥ अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥2॥ तुका ह्मणे फजितखोरा। ह्मणतां बरा उगा रहा ॥3॥
2696
नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥1॥
सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥ काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥2॥ तुका ह्मणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥3॥
2697
लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥1॥
वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥ समय न कळे वेडगळ बुिद्ध । विजाती ते शुिद्ध चांच चाट ॥2॥ तुका ह्मणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥3॥
2698
एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाइऩचा पती ॥1॥
तेणें जालें अवघें काम । निवारला भवश्रम ॥ध्रु.॥ परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥2॥ तुका ह्मणे फार । नाहीं लागत वेव्हार ॥3॥
2699
भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥1॥
कैसी जाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥ संसाराची खंती । मावळल्या तरी शिH ॥2॥ तुका ह्मणे हीणा । बुिद्ध चुकली नारायणा ॥3॥
2700
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥1॥
लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥ लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥2॥ तुका ह्मणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥3॥
गाथा २७०१ ते ३०००
2701
चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लंछन ॥1॥
ऐशा आह्मीं करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥ ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥2॥ तुका ह्मणे ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥3॥
2702
बुिद्धहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥1॥
हुंगों नये गो†हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥ अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥2॥ तुका ह्मणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥3॥
2703
न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा ।
बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥1॥ आणीक काय तुह्मां काम । आह्मां नेदा तरी प्रेम । कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥ आह्मीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें । संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥3॥ एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी । जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥3॥ रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता । होइऩन सरता । संतांमाजी पोसणा ॥4॥ ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा । तुका ह्मणे बरा । रोकडा चि निवाड ॥5॥
2704. भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥1॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥ नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥2॥ तुका ह्मणे जड । मज न राखावें दगड ॥3॥
2705
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभािळलों दीन ॥1॥
पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥ जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥2॥ तुका ह्मणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥3॥
2706
भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥1॥
येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥ होइप बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥2॥ तुका ह्मणे लोटांगणीं । भिHभाग्यें जाली धणी ॥3॥
2707
नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥1॥
जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥ आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥2॥ तुका ह्मणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥3॥
2708
आह्मी सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥1॥
तरी ह्मणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥ याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥2॥ तुका ह्मणे निद्रा जागृति सुषुिप्त । तुह्मी हो श्रीपती साक्षी येथें ॥3॥
2709
नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥1॥
जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥ गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥2॥ तुका ह्मणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥3॥
2710
हें का आह्मां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥1॥
सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कळीसारिखे ॥ध्रु.॥ शरणागत वै†या हातीं । हे नििंश्चती देखिली ॥2॥ तुका ह्मणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥3॥
2711
कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥1॥
उफराटी तुह्मां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥ साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥2॥ तुका ह्मणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥3॥
2712
शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥1॥
भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥ प्रीत कळे आलिंगनीं। संपादनीं अत्यंत ॥2॥ तुका ह्मणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें॥3॥
2713
नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥1॥
तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥ नाहीं विटािळलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥2॥ तुका ह्मणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥3॥
2714
ऐकिली कीिर्त्त संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥1॥
मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥ आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥2॥ तुका ह्मणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥3॥
2715
मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥1॥
उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥ लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥2॥ तुका ह्मणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥3॥
2716
ह्मणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥1॥
कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥ पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥2॥ तुका ह्मणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समपिऩला ॥3॥
2717
विभ्रंशिली बुिद्ध देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥1॥
पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥ न मारितां हीन बुिद्ध दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥2॥ तुका ह्मणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥3॥
2718
न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥1॥
ह्मणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥ मोकळें हे मन कष्ट। करी नष्ट दुर्जन ॥2॥ तुका ह्मणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥3॥
2719
कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥1॥
धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥ बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥2॥ तुका ह्मणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥3॥
2720
उकरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥1॥
कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥ काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥2॥ तुका ह्मणे काय उपदेश वेडएा । संगें होतो रेडएासवें कष्ट ॥3॥
2721
जया शिरीं कारभार । बुिद्ध सार तयाची ॥1॥
वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥ आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥2॥ तुका ह्मणे शूर राखे । गाढएा वाखेसांगातें॥3॥
2722
एक एका साहए करूं । अवघें धरूं सुपंथ ॥1॥
कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥ अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥2॥ तुका ह्मणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥3॥
2723
फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥1॥
ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥3॥
2724
सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥1॥
कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥ आवडे तें तें च यासी । ब्रह्मरसीं निरसें ॥2॥ तुका ह्मणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥3॥
2725
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित॥1॥
तरि ह्मणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥ सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥2॥ तुका ह्मणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥3॥
2726
आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥1॥
बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥ध्रु.॥ पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥2॥ तुका ह्मणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥3॥
2727
असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥1॥
धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शिHहीन ॥ध्रु.॥ भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥2॥ तुका ह्मणे धांव घेतलीसे सोइऩ । आतां पुढें येइप लवकरी ॥3॥
2728
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या॥1॥
ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥ गळ गिळी आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥2॥ तुका ह्मणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥3॥
2729
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥1॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥ अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥2॥ तुका ह्मणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥3॥
2730
मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें॥1॥
पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥ मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥2॥ आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥3॥
2731
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥1॥
ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥ भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥2॥ तुका ह्मणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥3॥
2732
भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥1॥
परी आह्मी असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥3॥
2733
लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥1॥
पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥ कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥2॥ तुका ह्मणे वाटे चित्त । करा फजित ह्मणऊनि ॥3॥
2734
पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥1॥
पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥ संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥2॥ तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥3॥
2735
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ ॥
प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥ केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥2॥ तुका ह्मणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥3॥
2736
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥1॥
संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृित्त अखंडित ॥ध्रु.॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥2॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥3॥
2737
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥1॥
राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥ भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥2॥ तुका ह्मणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥3॥
2738
न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥1॥
मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥ कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥2॥ तुका ह्मणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥3॥
2739
तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥1॥
जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥ जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव ह्मणऊनि ॥2॥ तुका ह्मणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥3॥
2740
कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥1॥
तुह्मांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥2॥ तुका ह्मणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥3॥
2741
ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥1॥
नाहीं भेदू ह्मुण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥2॥ तुका ह्मणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥3॥
2742
कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥1॥
विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥2॥ तुका ह्मणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥3॥
2743
याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥1॥
येइप गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥ दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे॥2॥ विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका ह्मणे हें चि आह्मां ध्यान निरंतर ॥3॥
2744
गंगा आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥1॥
तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥ पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें॥2॥ तुका ह्मणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥3॥
2745
पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम ह्मणतां तुझी बसली दांतखीळ ॥1॥
हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । ह्मणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥2॥ तुका ह्मणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न ह्मणे त्याचा गाढव मातापिता ॥3॥
2746
आह्मां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥1॥
घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥ वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥2॥ धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥3॥ माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥4॥ नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका ह्मणे गेलें । वांयांविण न घेतां ॥5॥
2747
चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥1॥
तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥ निक्षेपिलें धन। तेथें गुंतलेसे मन ॥2॥ नाशिवंतासाटीं । तुका ह्मणे करिसी आटी ॥3॥
2748
करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥1 ॥
ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥ िप्रया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥2॥ तुका ह्मणे एका । हरीविण नाहीं सखा ॥3॥
2749
आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥1॥
न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥ आधीं करूं चौघाचार। मग सांडूं भीडभार ॥2॥ तुका ह्मणे सेवटीं । तुह्मां आह्मां घालूं तुटी ॥3॥
2750
नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥1॥
जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥ चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥2॥ तुका ह्मणे तूं निर्लज्ज । आह्मां रोकडी गरज ॥3॥

Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP