॥अभंगवाणी॥७५१ते१०००॥

751
धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहािळतां ॥1॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥
सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥2॥
तुका ह्मणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥3॥
752
जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥1॥
ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥2॥
तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥3॥
753
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युHी ॥1॥
कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥
आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥2॥
तुका ह्मणे मन । पूजा इच्छी नारायण ॥3॥
754
मज संतांचा आधार । तूं एकलें निविऩकार ॥1॥
पाहा विचारूनि देवा । नको आह्मांसवें दावा ॥ध्रु.॥
तुज बोल न बोलवे। आह्मां भांडायाची सवे ॥2॥
तुका ह्मणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥3॥
755
तुज मागणें तें देवा । आह्मां तुझी चरणसेवा ॥1॥
आन नेघों देसी तरी । रििद्ध सििद्ध मुिH चारी ॥ध्रु.॥
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥2॥
तुका ह्मणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥3॥
756
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥1॥
आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥
हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥2॥
तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥3॥
757
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥1॥
तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥
आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥2॥
तुका ह्मणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥3॥
758
क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥1॥
देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥
नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥2॥
अपराधाच्या कोटी । तुका ह्मणे घालीं पोटीं ॥3॥
759
नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥1॥
तैसी चित्तशुिद्ध नाहीं । तेथें बोध करील काइऩ ॥ध्रु.॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥2॥
वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥3॥
नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥4॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥5॥
तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥6॥
760
नवां नवसांचीं । जालों तुह्मासी वाणीचीं ॥1॥
कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥
कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥3॥
761
एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥1॥
कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥
लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥2॥
तुका ह्मणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥3॥
762
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥1॥
आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥
माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥2॥
मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥3॥
पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥4॥
शरण आलों आतां धांवें । तुका ह्मणे मज पावें ॥5॥
763
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥1॥
त्याचा हा चि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥
नामरूपा केला ठाव। तुज कोण ह्मणतें देव ॥2॥
तुका ह्मणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥3॥
764
आपुलें मागतां । काय नाहीं आह्मां सत्ता ॥1॥
परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥
ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥2॥
तुका ह्मणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥3॥
765
असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥1॥
माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥
सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥2॥
तुका ह्मणे बळी । तो गांढएाचे कान पिळी ॥3॥
766
काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥1॥
सर्व- साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥
योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥2॥
तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥3॥
767
हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥1॥
त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥
नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥2॥
करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥3॥
हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥4॥
ह्मणवी हरिचा दास । तुका ह्मणे धन्य त्यास ॥5॥
768
हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥1॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाइऩवांचून ॥ध्रु.॥
करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥2॥
तुका ह्मणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥3॥
769
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥1॥
तैसा तूं चि आह्मांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥2॥
तुका ह्मणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥3॥
770
डोइऩ वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥1॥
तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥
मेळवूनि नरनारी। शकुन सांगती नानापरी ॥2॥
तुका ह्मणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥3॥
771
गाढवाचे घोडे । आह्मी करूं दृष्टीपुढें ॥1॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥
सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥2॥
तुका ह्मणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥3॥
772
बाइऩल मेली मुH जाली । देवें माया सोडविली ॥1॥
विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुस†याचें काज ॥ध्रु.॥
पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥2॥
माता मेली मज देखतां । तुका ह्मणे हरली चिंता ॥3॥
773
योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥1॥
करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥
तरि खंडे येरझार। निघे भार देहाचा ॥2॥
तुका ह्मणे मानामान । हें बंधन नसावें ॥3॥
774
करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥1॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥
मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥3॥
775
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥1॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥
अंगुिळया मोडी। त्यासी काय सिलें घोडीं ॥2॥
नपुंसकासाठीं । तुका ह्मणे न लगे जेठी ॥3॥
776
वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥1॥
तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगें चि ब्रह्म व्हावें ॥ध्रु.॥
जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दाचें पांडित्य ॥2॥
गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥3॥
जाणसील तूं स्वतंत्र । आगमोH पूजायंत्र ॥4॥
साधनाच्या ओढी । डोिळयांच्या मोडामोडी ॥5॥
तुका ह्मणे देहीं । संत जाहाले विदेही ॥6॥
777
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥1॥
मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥
सत्ता सकळ तया हातीं। माझी कींव काकुलती ॥2॥
तुका ह्मणे ठेवी तैसें । आह्मी राहों त्याचे इच्छे ॥3॥
778
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥1॥
त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥
पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥2॥
तुका ह्मणे तइप । सििद्ध वोळगती पायीं ॥3॥
779
धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥1॥
पूजी प्रतिमेचे देव । संत ह्मणती तेथें भाव ॥ध्रु.॥
विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥2॥
तुका ह्मणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥3॥
780
आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥1॥
मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥2॥
तुका ह्मणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥3॥
781
नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥1॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ध्रु.॥
न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥2॥
तुका ह्मणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥3॥
782
टिळा टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी वोंगळ पोटासाटीं ॥1॥
तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ध्रु.॥
कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥2॥
तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥3॥
783
धन्य देहूं गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥1॥
धन्य क्षेत्रवासी लोक दइवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ध्रु.॥
कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगीं ते माता रखुमादेवी ॥2॥
गरुड पारीं उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥3॥
दिक्षणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥4॥
लIमीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥5॥
विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥6॥
तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥7॥
शाHावर - अभंग 13 784
टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोऑयांपुढें ॥1॥
ह्मणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥
दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥2॥
रांगोिळया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥3॥
पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥4॥
नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥5॥
जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥6॥
पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥7॥
कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥8॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥9॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥10॥
योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥11॥
वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥12॥
तुका ह्मणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥13॥
785
शाH गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥1॥
सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंिद्रयें ॥ध्रु.॥
क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥2॥
मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥3॥
स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥4॥
तुका ह्मणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥5॥
786
राजा प्रजा द्वाड देश । शाH वास करिती तो ॥1॥
अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥
न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥2॥
तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥3॥
787
ऐसें कलियुगाच्या मुळें । जालें धर्माचें वाटोळें ॥1॥
सांडुनियां रामराम । ब्राह्मण ह्मणती दोमदोष ॥ध्रु.॥
शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥2॥
तुका ह्मणे वृित्त । सांडुनि गदा मागत जाती ॥3॥
788
अवघ्या पापें घडला एक । उपासक शHीचा ॥1॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥
काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥2॥
करितां पाप न धरी शंका। ह्मणे तुका कोणी ही ॥3॥
789
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥1॥
रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥
जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥2॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥3॥
790
शाHांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥1॥
तिची त्या पडली सवे । मागें धांवें ह्मणोनि ॥ध्रु.॥
शाHांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥2॥
तुका ह्मणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥3॥
791
हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥1॥
ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भHांची ॥ध्रु.॥
अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥2॥
गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥3॥
माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥4॥
पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥5॥
ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥6॥
तुका ह्मणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ती ॥7॥
792
कांद्यासाठी जालें Yाान । तेणें जन नाडिलें ॥1॥
ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥
पूजेलागीं द्रव्य मागे।काय सांगे शिष्यातें ॥2॥
तुका ह्मणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा॥3॥
793
सांडुनियां पंढरीराव । कवणातें ह्मणों देव ॥1॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव ह्मणतां ॥ध्रु.॥
सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥2॥
तुका ह्मणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥3॥
794
बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥1॥
करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥
अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥2॥
तुका ह्मणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥3॥
795
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥1॥
रिक्षता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥
काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥2॥
तुका ह्मणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥3॥
796
नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥1॥
कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥
असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥2॥
तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥3॥ ॥13॥
797
पाखांडएांनीं पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥1॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥
न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥2॥
तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥3॥
तुका ह्मणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥4॥
798
कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥1॥
द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥
डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥2॥
वेदाYो करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥3॥
तुका ह्मणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥4॥
799
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥1॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥
असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥2॥
तप्तभूमीवरि लोळविती पाहीं । अिग्नस्तंभ बाहीं कवळविती ॥3॥
ह्मणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥4॥
800
अल्प माझी मती । ह्मणोनि येतों काकुलती ॥1॥
आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥
धीर माझ्या मना। नाहीं नाहीं नारायणा ॥2॥
तुका ह्मणे दया । मज करा अभागिया ॥3॥
801
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥1॥
तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥2॥
तुका ह्मणे माझ्या असांवल्या बाहएा । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥3॥
802
देह हा सादर पाहावा नििश्चत । सर्व सुख एथें नाम आहे ॥1॥
ब्रह्म जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥
यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥2॥
तुका ह्मणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥3॥ ॥13॥
803
तुझे वणूप गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥1॥
मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥
रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥2॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । ह्मणोनि आटाटी फार त्यांसी ॥3॥
तुका ह्मणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काइऩ ॥4॥
804
मनवाचातीत तुझें हें स्वरूप । ह्मणोनियां माप भिH केलें ॥1॥
भHीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥
योग याग तपें देहाचिया योगें । Yाानाचिया लागें न सांपडेसी ॥2॥
तुका ह्मणे आह्मी भोऑया भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥3॥
805
देवा ऐसा शिष्य देइऩ । ब्रह्मYाानी निपुण पाहीं ॥1॥
जो कां भावाचा आगळा । भिHप्रेमाचा पुतळा ॥ध्रु.॥
ऐशा युिH ज्याला बाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥2॥
ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ॥3॥
806
जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वणिऩसी थोर वैकुंठींची ॥1॥
मोक्षसििद्ध तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥2॥
नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥3॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म तें केवळ नांदतसे ॥4॥
तुका ह्मणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥5॥
807
दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥1॥
येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥
काय करूं देवा ऐसी नाहीं शिH । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥2॥
तुका ह्मणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥3॥
808
शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥1॥
तेवीं अभHांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥
श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥2॥
तुका ह्मणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥3॥
809
रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥1॥
तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥
सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥2॥
तुका ह्मणे श्वाना िक्षरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥3॥
810
जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥1॥
तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥
कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥2॥
तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥3॥
811
आतां असों मना अभHांची कथा । न होइप दुिश्चता हरिनामीं ॥1॥
नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥
प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभHाचें सर्वकाळ ॥2॥
तुका ह्मणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥3॥
812
नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥1॥
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥
सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥2॥
तुका ह्मणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाइप ॥3॥
813
जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥1॥
अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तो चि जाणे ॥ध्रु.॥
शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥2॥
कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥3॥
तुका ह्मणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तो चि जाणे ॥4॥
814
नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥1॥
खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥
जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥2॥
तुका ह्मणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥3॥
815
नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥1॥
मेघवृिष्ट येथें होते अनिवार । जिव्हाऑयां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥
उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥2॥
तुका ह्मणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥3॥
816
त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥1॥
भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥
देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥2॥
तुका ह्मणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥3॥
817
मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥1॥
तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥
ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥2॥
नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥3॥
तुका ह्मणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥4॥
818
राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥1॥
कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥
शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरि । उमटे लौकरि जैसे तैतें ॥2॥
तुका ह्मणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥3॥
819
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥1॥
शिकविलें काय येइऩल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥
सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । ह्मणऊनि लाता मागें सारी ॥2॥
तुका ह्मणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥3॥
820
देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥1॥
आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥
आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥2॥
तुका ह्मणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥3॥
821
अवघा वेंचलों इंिद्रयांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥1॥
असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥
कायावाचामनें तो चि निजध्यास । एथें जालों ओस भिHभावें ॥2॥
तुका ह्मणे करूं येइऩल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥3॥
822
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥1॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥
होइऩल येणें कळसा आलें । िस्थरावलें अंतरीं ॥2॥
तुका ह्मणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥3॥
823
आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥1॥
दाशkवें दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥
उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥2॥
तुका ह्मणे दृिष्ट सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥3॥
824
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥1॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥
निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥2॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥3॥
825
लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥1॥
उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥
मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥2॥
तुका ह्मणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥3॥
826
अवगुण तों कोणीं नाहीं प्रतििष्ठले । मागें होत आले शिष्टाचार ॥1॥
दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥
मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥2॥
तुका ह्मणे माझा उिच्छष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृिष्टन्यायें ॥3॥
827
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥1॥
भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥
करावा उपदेश। निवडोनि तरि दोष ॥2॥
तुका ह्मणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥3॥
828
आह्मां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥1॥
कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥
अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥2॥
तुका ह्मणे येथें ख†याचा विकरा । न सरती येरा खोटएा परी ॥3॥
829
दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥1॥
ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥
अंधऑयास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥2॥
तुका ह्मणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥3॥
830
नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥1॥
नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥2॥
तुका ह्मणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तो चि निंदा मायझवा ॥3॥
831
लेकरा आइऩतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥1॥
त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥
भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥2॥
आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥3॥
832
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥1॥
सगुणाचे सोइऩ सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥
कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥2॥
तुका ह्मणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥3॥
833
जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥1॥
चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तो चि ॥ध्रु.॥
काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥2॥
तुका ह्मणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥3॥
834
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥1॥
रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥2॥
तुका ह्मणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥3॥
835
कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥1॥
निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥
भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होइऩजेतें ॥2॥
तुका ह्मणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥3॥
836
मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥1॥
पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥2॥
वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥3॥
पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥4॥
तुका ह्मणे चला । तुह्मी आह्मी धरूं त्याला ॥5॥
837
भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां सािक्षत्वेसीं ॥1॥
माझी माझी ह्मणे एकएकां मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ध्रु.॥
तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥2॥
तुका ह्मणे एके ठायीं आहे वर्म । हें चि होय श्रम निवारितें ॥3॥
838
लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥1॥
बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥
मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥2॥
सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका ह्मणे स्मरीला ॥3॥
839
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहनिऩशीं ॥1॥
भवनिदाऩळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥
सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥2॥
तुका ह्मणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥3॥
840
बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥1॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥
भाग्यें जाली संतभेटी। आवडी पोटीं होती ते ॥2॥
तुका ह्मणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥3॥
841
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥1॥
आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥
उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥2॥
तुका ह्मणे नुचलीं डोइऩ । ठेविली पायीं संतांचे ॥3॥
842
आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥1॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥2॥
तुका ह्मणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥3॥
843
उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥1॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥2॥
तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥3॥
844
आह्मां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवऑयानें ॥1॥
न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥2॥
तुका ह्मणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥3॥
845
बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥1॥
फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥2॥
तुका फजीत करी बुच्या। विसरे कुच्या खोडी तेणें ॥3॥
846
धांव घालीं आइऩ । आतां पाहातेसी काइऩ ॥1॥
धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥
करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥2॥
तुका ह्मणे डोइऩ । कधीं ठेवीन हे पायीं ॥3॥
847
तुह्मां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥1॥
होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥
नसतें सांभािळलें। जरि तुह्मीं आश्वासिलें ॥2॥
तुका ह्मणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥3॥
848
देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥1॥
पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥
आरुष हे वाणी। गोड वरूनि घेतां कानीं ॥2॥
आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥3॥
849
दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥1॥
जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥
कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥2॥
जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥3॥
850
भोगावरि आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥1॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥
काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥2॥
केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥3॥
आवघे चि वाण आले तुह्मां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥4॥
तुका ह्मणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥5॥
851
कां हो एथें काळ आला आह्मां आड । तुह्मांपाशीं नाड करावया ॥1॥
कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥
कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥2॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥3॥
काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥4॥
तुका ह्मणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥5॥
852
काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥1॥
काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥
काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥2॥
काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥3॥
तुका ह्मणे काय करावा उपाव । ऐसा देइप भाव पांडुरंगा ॥4॥
853
दंभें कीतिऩ पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥1॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥
पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥2॥
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥3॥
तुका ह्मणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥4॥
854
धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥1॥
ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥
देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥2॥
तुका ह्मणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥3॥
855
आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरिकथा ॥1॥
होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥
भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥2॥
तुका ह्मणे आह्मी लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥3॥
856
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥1॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥2॥
तुका ह्मणे वाचा राहिली कुंटित । पुढें जालें चित्त समाधान ॥3॥
857
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥1॥
विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥2॥
सकळां इंिद्रयां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥3॥
तुका ह्मणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥4॥
858
होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥1॥
काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥2॥
तुका ह्मणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥3॥
859
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥1॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥
न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥2॥
तुका ह्मणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥3॥
860
बळें बाहएात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥1॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥2॥
प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥3॥
तुका ह्मणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥4॥
861
ह्मणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥1॥
गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥
पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥2॥
भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥3॥
तुका ह्मणे वांयां गेलों ऐसा दिसें । होइऩल या हांसें लौकिकाचें ॥4॥
862
न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥1॥
येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कइप कासयानें ॥ध्रु.॥
साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं गा देवा ॥2॥
लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥3॥
तुका ह्मणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥4॥
863
चिंतिलें तें मनिंचें जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥1॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥
नवसियाचे नव रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥2॥
तुका ह्मणे सम चि देणें । समचरण उभा असे ॥3॥
864
उधाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥1॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥
बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥2॥
तुका ह्मणे आह्मांसाटीं । कृपा पोटीं वागवी ॥3॥
865
काय विरिH कळे आह्मां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥1॥
नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥2॥
कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥3॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥4॥
तुका ह्मणे आह्मां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥5॥
866
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥1॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥2॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥3॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥4॥
तुका ह्मणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥5॥
867
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥1॥
पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥2॥
योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥3॥
तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥4॥
868
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥1॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥2॥
तुका ह्मणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥3॥
869
उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥1॥
उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥2॥
तुका ह्मणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥3॥
870
आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥1॥
ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥
मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मYाान ॥2॥
तुका ह्मणे ठेवा । जाणपण एक सवा ॥3॥
871
अनाथांची तुह्मां दया । पंढरीराया येतसे ॥1॥
ऐसी ऐकोनियां कीतिऩ । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥
अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥2॥
तुका ह्मणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥3॥
872
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥1॥
विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ध्रु.॥
वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥2॥
तुका ह्मणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥3॥
873
हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥1॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥
हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥2॥
तुका ह्मणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥3॥
874
दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥1॥
नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥
चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥2॥
तुका ह्मणे उभयलोकीं । हे चि निकी सामोग्री ॥3॥
875
धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥1॥
संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥2॥
तुका ह्मणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥3॥
876
दिनरजनीं हा चि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥1॥
संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥
नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंिद्रयां ॥2॥
कीतिऩ मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥3॥
877
खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥1॥
मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥
कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पित्त । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥2॥
तुका ह्मणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीणाअ प्रकाशाची ॥3॥
878
गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥1॥
विठ्ठल हे मूतिऩ साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥
कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥2॥
बाळाचे सोइऩतें घांस घाली माता । आटाहास चिंता नाहीं तया ॥3॥
गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥4॥
तुका ह्मणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥5॥
879
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥1॥
आतां हाता धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥
येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥2॥
तुका ह्मणे आह्मां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥3॥
880
पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥1॥
होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥
इंिद्रयांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥2॥
तुका ह्मणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥3॥
881
बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†हेरा ओढाळांचा ॥1॥
बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥
त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥2॥
नाहीं कोठें िस्थर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥3॥
वेगळाल्या खोडी केली तडातडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥4॥
निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥5॥
882
न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥1॥
दृिष्ट ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥
येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥2॥
खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥3॥
शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥4॥
तुका ह्मणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥5॥
883
आमच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥1॥
धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥
आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥2॥
तुका ह्मणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥3॥
884
खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥1॥
संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥
घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥2॥
फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥3॥
तुका ह्मणे आतां जालीसे नििंश्चती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥4॥
885
पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥1॥
रुधवूनि ठेलों ठाव । जगा वाव सकळ ॥ध्रु.॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥2॥
। तुका ह्मणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥3॥
886
निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥1॥
आतां पुढें भावसार । जीवना थार पाहावया ॥ध्रु.॥
पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥2॥
तुका ह्मणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥3॥
887
उचित न कळे इंिद्रयाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥1॥
आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥
अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥2॥
तुका ह्मणे आह्मी तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥3॥
888
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येइऩ कैसें ॥1॥
ह्मणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥
आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरी च कारण साध्य होय ॥2॥
तुका ह्मणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज िस्थत येइऩल कळों ॥3॥
889
गावे ह्मणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥1॥
हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥2॥
तुका ह्मणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥3॥
890
कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥1॥
सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥
अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥2॥
इंिद्रयांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥3॥
तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥4॥
तुका ह्मणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥5॥
891
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥1॥
कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न ह्मणे राम ॥ध्रु.॥
पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥2॥
बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥3॥
नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥4॥
अझुन तरि मुका । कां रे जालासि ह्मणे तुका ॥5॥
892
वांटा घेइप लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥1॥
ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥
नाहीं सारिलें तोंवरी । धांव घेइप वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥2॥
फट लंडी ह्मणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥3॥
893
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥1॥
ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥
व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥2॥
तुका ह्मणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥3॥
894
काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥1॥
जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ध्रु.॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥2॥
तुका ह्मणे कुचर दाणा । तैसा ह्मणा डेंग हा ॥3॥
895
देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†या ऐसी केवीं गारगोटी ॥1॥
मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूतिऩ ॥ध्रु.॥
काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥2॥
तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित ह्मणउनी ॥3॥
896
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥1॥
भHीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥
भिक्षाणी वेवसाव। काला करितो गाढव ॥2॥
करुनि वस्ती बाजारीं । ह्मणवी कासया निस्पृही ॥3॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥4॥
तुका ह्मणे होंइऩ सुर । किंवा निसुर मजुर ॥5॥
897
तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥1॥
काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥
नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥2॥
तुका ह्मणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥3॥
898
मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥1॥
आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥2॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥3॥
तुका ह्मणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥4॥
899
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥1॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥
फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तइप ॥2॥
तुका ह्मणे देवा । पुढें भाव सारावा ॥3॥
900
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं िस्थर ॥1॥
न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥2॥
अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका ह्मणे ॥3॥
गाथा ९०१ ते १२००
901
जीवन हे मुH नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥1॥
बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥2॥
तुका ह्मणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥3॥
902
द्रव्याचा तो आह्मी धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥1॥
करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥2॥
तुका ह्मणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥3॥
903
द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । ह्मणोनियां संग खोटा त्याचा ॥1॥
निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥
आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥2॥
प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥3॥
तुका ह्मणे घेइप राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥4॥
904
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥1॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥
रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥2॥
तुका ह्मणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा ह्मणउनी ॥3॥
905
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥1॥
कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥
भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥2॥
तुका ह्मणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥3॥
906
सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥
मुखीं वाणी कानीं कीतिऩ । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥
घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥
तुका ह्मणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥
907
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥1॥
म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥
संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥2॥
तुका ह्मणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥3॥
908
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥1॥
संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक ह्मणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥2॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥3॥
तुका ह्मणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥2॥
909
आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥1॥
भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥
गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥2॥
तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥3॥
तुका ह्मणे गुण गाइप या देवाचे । घेइप माझे वाचे हे चि धणी ॥4॥
910
आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥1॥
आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥2॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥3॥
तुका ह्मणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥4॥
911
धाइप अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥1॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥
वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥2॥
अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥3॥
साधनाची सििद्ध । मोन करा िस्थर बुिद्ध ॥4॥
तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥5॥
912
कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥1॥
कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥
भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥2॥
तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥3॥
913
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥1॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥2॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥3॥
तुका ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुहए भाव तो चि जाणे ॥4॥
914
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥1॥
साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोटएां बाळां धाकुटियां ॥2॥
तुका ह्मणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥3॥
915
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥1॥
शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥2॥
भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभHांची परी नावडेती ॥3॥
न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥4॥
तुका ह्मणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥5॥
916
तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥1॥
वोळगती जया अष्टमासििद्ध । ते या जनबुद्धी नातळती ॥2॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥3॥
लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥4॥
तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥5॥
917
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥1॥
शास्त्रYा पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥2॥
कलियुगीं बहु कुशळ हे जन । छिळतील गुण तुझे गातां ॥3॥
मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥4॥
तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥5॥
918
काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥1॥
जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥2॥
तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥3॥
तुका ह्मणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥4॥
919
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥1॥
सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥2॥
तुका ह्मणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥3॥
920
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥1॥
होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥2॥
तुका ह्मणे माझें । काय होइऩल तुह्मां ओझें ॥3॥
921
एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥1॥
आह्मी देवा शिHहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥
पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥2॥
तुका ह्मणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥3॥
922
पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥1॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥
ज्येष्ठांचीं कां आह्मां जोडी। परवडी न लभों ॥2॥
तुका ह्मणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥3॥
923
कैवल्याच्या तुह्मां घरीं । रासी हरी उदंड ॥1॥
मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥
सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥3॥
924
आपलाल्या तुह्मी रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥1॥
हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥
बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥2॥
तुका ह्मणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥3॥
925
न मनावी चिंता तुह्मीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥1॥
पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥
बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥2॥
तुका ह्मणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥3॥
926
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥1॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥
मंगळ तें तुह्मी जाणां । नारायणा काय तें ॥2॥
तुका ह्मणे समपिऩला । तुज विठ्ठला देहभाव ॥3॥
927
भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥1॥
चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥
माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥2॥
तुका ह्मणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥3॥
928
पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोिळयांची भूक न वजे माझी ॥1॥
जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥2॥
महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥3॥
तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥4॥
929
हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥1॥
बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥2॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥3॥
तुका ह्मणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥4॥
930
आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥1॥
प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृिष्ट हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥
भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥2॥
आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया ॥3॥
तुका ह्मणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥4॥
931
जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥1॥
पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥
भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥2॥
तुका ह्मणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥3॥
932
आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥1॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥2॥
तुका ह्मणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥3॥
933
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥1॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥
वदऩळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥2॥
तुका ह्मणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥3॥
934
एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥1॥
होय भHीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥
एवढा जगदानी। मागे तुळसीदळ पाणी ॥2॥
आला नांवा रूपा । तुका ह्मणे जाला सोपा ॥3॥
935
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥1॥
विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥
अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥2॥
तुका ह्मणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥3॥
936
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण तैशापरी ॥1॥
सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आह्मां नारायण तैशापरी ॥2॥
तुका ह्मणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥3॥
937
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥1॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
तो चि शरणागतां हा विठ्ठल मुिHदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥2॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सििद्ध। लागली समाधि विठ्ठलनामें ॥3॥
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका ह्मणे ॥4॥
938
विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥1॥
लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥2॥
बांधा माझिया जीवासी । तुका ह्मणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥3॥
939
वाट वैकुंठीं पाहाती । भH कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥1॥
धन्यधन्य हरिचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस। वाट कर जोडोनियां ॥2॥
रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभHां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भHांची ॥3॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥4॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका ह्मणे दरुषणें ॥5॥
940
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥1॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥ क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥2॥ तुका ह्मणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावइऩल ॥3॥
941
फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥1॥
आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥ भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥2॥ तुका ह्मणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥3॥
942
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥
बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥ तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥
943
आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥1॥
होइप बा जागा होइप वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥2॥ तुका ह्मणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥3॥
944
माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥1॥
फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥3॥
945
चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काइऩ । स्वहित तें ठायीं आपणापें ॥1॥
मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥2॥ भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥3॥ तुका ह्मणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होइऩल त्यांचा ॥4॥
946
नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥1॥
कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥2॥ ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका ह्मणे ॥3॥
947
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥1॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥ सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥2॥ तुका ह्मणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥3॥
948
चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥1॥
अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥ करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥2॥ तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥3॥
949
निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥1॥
तुह्मां आह्मां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर ह्मणउनि ॥2॥ तुका ह्मणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुह्मां ऐसी ॥3॥
950
तुज च पासाव जालोंसों निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥1॥
पाहावा जी ठायीं करूनि विचार । नुन्य कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं आYोचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥2॥ तुका ह्मणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुह्माऐसा ॥3॥
951
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भिHरस सांगा कां जी तुह्मीं ॥1॥
ह्मणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥ न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥2॥ तुका ह्मणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥3॥
952
लटिका ऐसा ह्मणतां देव । संदेहसा वाटतसे ॥1॥
ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥2॥ तुका ह्मणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥3॥
953
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥1॥
उदास तूं नारायणा । मी ही ह्मणा तुह्मी च ॥ध्रु.॥ ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥2॥ एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥3॥
954
बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥1॥
आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥ तुह्मां आह्मां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥2॥ तुका ह्मणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥3॥
955
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥1॥
मढएापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥2॥ तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥3॥
956
मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥1॥
लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥2॥ तुका ह्मणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥3॥
957
पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥1॥
घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥ न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरडएा ॥2॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥3॥
958
अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥1॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥2॥ तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥3॥
959
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥1॥
आतां नको मज खोटएानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥2॥ तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥3॥
960
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥1॥
आह्मी ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥2॥ तुका ह्मणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥3॥
961
उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥1॥
काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सवाौत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥ नानाछंदें आह्मां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥3॥
962
आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥1॥
जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥3॥
963
तुह्मी साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥1॥
कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥ सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी सभाग्य जी देवा । माझा तुह्मां केवा काय आला ॥3॥
964
तुह्मां होइऩल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥1॥
पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥ आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥2॥ तुका ह्मणे देह देइऩन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥3॥
965
जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥1॥
ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥ गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तइप । अवकळा केलिया ॥2॥ तुका ह्मणे ठावे । तुह्मी असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥3॥
966
आह्मी शिHहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥1॥
माझें मज देइप देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥ नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥2॥ नाहीं येत बळा । आतां तुह्मासी द्मगोपाळा । तुका ह्मणे गळा । उगवा पायां लागतों ॥3॥
967
काय कृपेविण घालावें सांकडें । नििंश्चती निवाडें कोण्या एका ॥1॥
आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥ धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥2॥ तुका ह्मणे आह्मी भावहीन जीव । ह्मणउनी देव दुरे दुरी ॥3॥
968
नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥1॥
अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान नििंश्चतीचें ॥ध्रु.॥ दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां लाज येत नाहीं । आह्मां चिंताडोहीं बुडवितां ॥3॥
969
जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥1॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥ क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥2॥ तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥3॥
970
ह्मणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥1॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥ कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥2॥ तुका ह्मणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥3॥
971
काय आतां आह्मीं पोट चि भरावें । जग चाळवावें भH ह्मुण ॥1॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥2॥ तुका ह्मणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥3॥
972
वर्म तरि आह्मां दावा । काय देवा जाणें मी ॥1॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥ द्याल जरि तुह्मी धीर । होइऩल िस्थर मन ठायीं ॥2॥ तुका ह्मणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥3॥
973
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥1॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥ आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥2॥ तुका ह्मणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥3॥
974
निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥1॥
बैसलिया भाव पांयीं । बरा तइप नाचेन ॥ध्रु.॥ स्वामी कळे सावधान। तरि मन उल्हासे ॥2॥ तुका ह्मणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥3॥
975
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥1॥
नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥ पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥2॥ आतां ह्मणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥3॥
976
आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥1॥
तुह्मांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥ सेवेच्या अभिळासें। मन बहु जालें पिसें ॥2॥ अरे भHापराधीना । तुका ह्मणे नारायणा ॥3॥
977
तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥1॥
कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥ कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥2॥ तुका ह्मणे आतां । न सरे हवाले घालितां ॥3॥
978
माझी भHी भोळी । एकविध भावबळी ॥1॥
मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥ आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥2॥ तुका ह्मणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥3॥
979
आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥1॥
अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥ तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥2॥ तुका ह्मणे रुची । येथें भिन्नता कैची ॥3॥
980
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥1॥
युH आहार वेहार । नेम इंिद्रयांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥2॥ देह समपिऩजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होइऩल आघवा। तुका ह्मणे आनंद ॥3॥
981
मऊ मेनाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥1॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठएाळा चि गांठीं देऊं माथां ॥2॥ मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥3॥ अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥4॥ तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥5॥
982
गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥1॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥ उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥2॥ तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥3॥
983
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥1॥
गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुिद्ध करुनी ठेवा ॥ध्रु.॥ विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥2॥ तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥3॥
984
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥1॥
उदंड त्या गाइऩ ह्मैसी आणि शेऑया । परि त्या निराऑया कामधेनु ॥2॥ तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥3॥
985
जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥1॥
सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥ मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥2॥ जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥3॥ बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥4॥ तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥5॥
986
वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥1॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥ सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥2॥ याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥3॥ तुका ह्मणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥4॥
987
अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥1॥
गिळुनि सांडिलें किळवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥2॥ तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥3॥
988
धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥1॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥ जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥2॥ तुका ह्मणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥3॥
989
हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥1॥
येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥ सांभािळलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥2॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥3॥
990
फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥1॥
स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ‍ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥ निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥2॥ योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥3॥ तुका ह्मणे मना पाहें विचारून । होइप रे कठिण वज्राऐसें ॥4॥
991
जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥1॥
तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोHा निराळा । तेणें गोडी निवडिली ॥2॥ हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥3॥ उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥4॥ तुका ह्मणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुH । ऐसा जाला भरवसा ॥5॥
992
मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥1॥
जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥ भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥3॥
993
नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होइऩल त्या साहे पांडुरंग ॥1॥
पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥ नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥2॥ तुका ह्मणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥3॥
994
कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥1॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाइऩन तें ॥ध्रु.॥ न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥2॥ तुका ह्मणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभािळता ॥3॥
995
चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता काुंफ्ज अंगीं ॥1॥
आतां पुढें वांयां जावें हें तें काइऩ । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुिद्ध ॥2॥ तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥3॥
996
धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥1॥
येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥ लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥2॥ मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥3॥
997
कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥1॥
राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥ तरटापुढें बरें नाचे। सुतकाचें मुसळ ॥2॥ तुका ह्मणे काठी सार । करी फार शाहाणें ॥3॥
998
कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥1॥
जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥ आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥2॥ तुका ह्मणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥3॥
999
मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥1॥
लIमी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥ नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥3॥
1000
शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥1॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥ध्रु.॥ पुढें फार बोलों काइऩ । अवघें पायीं विदित ॥2॥ तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥3॥

Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP