॥अभंगवाणी॥५०१ते७५०॥


501
सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥1॥
अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुह्मांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥ बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥2॥ तुका ह्मणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥3॥
502
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥1॥
वाट पाहाते रुिक्मणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥ केली करा क्षमा। बडबड पुरुषोत्तमा ॥2॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥3॥
503
पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥1॥
आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥ तुह्मांसि जागवूं आह्मी आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥2॥ तुका ह्मणे दिलें उिच्छष्टाचें भोजन । आह्मां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥3॥
504
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥1॥
भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समपिऩलें ॥2॥ रंगलीं इंिद्रयें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समपिऩलें ॥3॥ एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥4॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥5॥
505
उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥1॥
निउल जालें सेवका स्वामींचें । आYो करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥ पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥2॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥3॥

दसरा - अभंग 1 506
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥1॥
या हो या हो बाइयानो निघाले हरी। सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।
ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आह्मां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥
अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें ।
ह्मणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥2॥
बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं ।
मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होइऩल काहाणी ॥3॥
ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर। कळलें असों द्या मग पडतील विचार ॥4॥
जयासाटीं ब्रह्मादिक जालेति पिसे । उिच्छष्टा कारणें देव जळीं जाले मासे ।
अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु ह्मणे आलें अनायासें ॥5॥
507
ओवाळूं आरती पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥1॥
सर्व व्यापून कैसें रूप आकळ । तो हा गौऑया घरीं जाला कृष्ण बाळ ॥ध्रु.॥ स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी। तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥2॥ भHीचिया काजा कैसा रूपासि आला । िब्रदाचा तोडर चरणीं मिरविला ॥3॥ आरतें आरती ओवािळली । वाखाणितां कीिर्त्त वाचा परतली ॥4॥ भावभिHबळें होसी कृपाळु देवा । तुका ह्मणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥5॥
508
करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥1॥
आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥ध्रु.॥ पाहा वो सकळा । पुण्यवंता तुह्मी बाळा ॥2॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥3॥
509
द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥1॥
आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥ मोकिळया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥3॥
510
तुह्मीं जावें निजमंदिरा । आह्मी जातों आपुल्या घरा ॥1॥
विठोबा लोभ असों देइप । आह्मी असों तुमचें पाइप ॥ध्रु.॥ चित्त करी सेवा । आह्मी जातों आपुल्या गावां ॥2॥ तुका ह्मणे दिशा भुलों। फिरोन पायापाशीं आलों ॥3॥
511
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥1॥
शेष घेउनि जाइऩन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥ जालों एकसवा । तुह्मां आडुनियां देवा ॥2॥ तुका ह्मणे चित्त । करूनि राहिलों नििंश्चत॥3॥
512
केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आह्मां पोटाची चिंता ॥1॥
बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥ उशिरा उशीर किती काय ह्मणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥2॥ तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका ह्मणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥3॥
513
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥1॥
पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥ शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥2॥ तुका ह्मणे पोट । भरलें वारले बोभाट ॥3॥
514
आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आइऩ ॥1॥
देइप गे विठाबाइऩ प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥2॥ तुका ह्मणे आह्मी तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥3॥
515
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥1॥
आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥ देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥2॥ राग येतो देवा । तुका ह्मणे नेघे सेवा ॥3॥
516
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥1॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥2॥ तुका ह्मणे माझा श्रीकृष्ण विसावा। वाटे न करावा परता जीवा ॥3॥
517
कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥1॥
माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ध्रु.॥ व्हावा ब्रह्मYाानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥2॥ तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥3॥
518
जातो वाराणसी । निरवी गाइऩ घोडे ह्मैसी ॥1॥
गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥ नका काढूं माझीं पेवें। तुह्मीं वरळा भूस खावें ॥2॥ भिकारियाचे पाठीं । तुह्मी घेउनि लागा काठी ॥3॥ सांगा जेवाया ब्राह्मण । तरी कापा माझी मान ॥4॥ वोकलिया वोका । म्यां खचिऩला नाहीं रुका ॥5॥ तुह्मीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥6॥ नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥7॥ तुका ह्मणे नीट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥8॥
519
कास घालोनी बळकट । झालों किळकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥1॥
या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥ कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे। मुH आणि मुमुक्षा ॥2॥ एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों ह्मणे तुका । मी नामाचा धारक ॥3॥
520
आह्मी वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥1॥
झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उिच्छष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥ अथॉ लोपलीं पुराणें । नाश केला शब्दYाानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥2॥ पिटूं भHीचा डांगोरा । किळकाळासी दरारा । तुका ह्मणे करा। जेजेकार आनंदें ॥3॥
521
बिळयाचे अंकित । आह्मी जालों बिळवंत ॥1॥
लाता हाणोनि संसारा । केला षडूमाअचा मारा ॥ध्रु.॥ जन धन तन । केलें तृणाही समान ॥2॥ तुका ह्मणे आतां । आह्मी मुHीचिया माथां ॥3॥
522
मृत्युलोकीं आह्मां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥1॥
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥ सोनें रूपें आह्मां मृित्तके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥2॥ तुका ह्मणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आह्मांपुढें ॥3॥
523
िस्त्रयांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृित्तकेच्या ॥1॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥ दृिष्टमुखें मरण इंिद्रयाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥2॥ तुका ह्मणे जरी अिग्न जाला साधु । परी पावे बाधूं संघट्टणें ॥3॥
524
पराविया नारी रखुमाइऩसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥1॥
जाइप वो तूं माते न करीं सायास । आह्मी विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥2॥ तुका ह्मणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥3॥
525
भिHप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥1॥
पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥2॥ तुका ह्मणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देइप ॥3॥
526
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥1॥
लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥2॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका ह्मणे सदा हें चि ध्यान ॥3॥
527
पढियंतें आह्मी तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥1॥
पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आह्मां ॥2॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥3॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥4॥ ह्मणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥5॥
528
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥1॥
पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी ह्मणोनियां ॥2॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥3॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥4॥ तुका ह्मणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥5॥
529
कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥1॥
कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥2॥ लाज वाटे मज ह्मणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका ह्मणे ॥3॥
530
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥1॥
देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहींऐसें ॥ध्रु.॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥2॥ तुका ह्मणे तुह्मां साजे हें श्रीहरी । आह्मी निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥3॥
531
आह्मी मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥1॥
पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आह्मी धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥ ॠिद्धसििद्ध तुझें मुख्य भांडवल । हें तों आह्मां फोल भHीपुढें ॥2॥ तुका ह्मणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि नििंश्चत सुख भोगू ॥3॥
532
न लगे हें मज तुझें ब्रह्मYाान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥1॥
लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥2॥ तुका ह्मणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देइप मला भेटी आतां ॥3॥
533
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥1॥
तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आह्मी च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥2॥ तुका ह्मणे मुHाफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥3॥
534
काय सांगों तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥1॥
बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥ आह्मी एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां मोक्षाचा कांटाळा । कां तुह्मी गोपाळा नेणां ऐसें ॥3॥
535
देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥1॥
तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥2॥ तुका ह्मणे मज तुझ्या नामापुढें । तुश हें बापुडें सकळी काळ ॥3॥
536
आतां येणेंविण नाहीं आह्मां चाड । कोण बडबड करी वांयां ॥1॥
सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आह्मां बरें कळों आलें ॥ध्रु.॥ तुका ह्मणे वाचा वाइऩली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥3॥
537
बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आह्मां ॥1॥
भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥3॥
538
अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥1॥
जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥2॥ तुका ह्मणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥3॥
539
संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥1॥
शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनादऩन जगीं होउनि ठेला ॥2॥ तुका ह्मणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥3॥
540
देहबुिद्ध वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥1॥
तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥2॥ तुका ह्मणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥3॥
541
काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ॥1॥
वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥2॥ तुका ह्मणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥3॥
542
आणीक काळें न चले उपाय । धरावे या पाय विठोबाचे ॥1॥
अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥ अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥2॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥3॥ तुका ह्मणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥4॥ 543
कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥1 ॥
अगा नारायणा निष्ठ‍ा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥
कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंिद्रयांची गति कुंटे चि ना ॥2॥
तुका ह्मणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥3॥
544
दीनानाथा तुझीं िब्रदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥1॥
पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आह्मां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥
आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥2॥
चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥3॥
तुका ह्मणे तुज भHीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥4॥
545
वणूप महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥1॥
ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥
नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥2॥
मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥3॥
तुका ह्मणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥4॥
546
नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥1॥
देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥
नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥2॥
तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥3॥
तुका ह्मणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥4॥
547
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥1॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥
विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो चित्तीं नारायण ॥2॥
तुका ह्मणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥3॥
548
पिंड पोसावे हें अधमाचें Yाान । विलास मिष्टान्न करूनियां ॥1॥
शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥
क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥2॥
कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥3॥
तुका ह्मणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥4॥
549
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥1॥
सकळां इंिद्रयां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥2॥
चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी नििश्चत एकविध ॥3॥
चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥4॥
तुका ह्मणे तुह्मां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥5॥
550
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न ह्मणें संत ॥1॥
जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥
जगदेव परी निवडीन निराळे । Yाानाचे आंधळे भारवाही ॥2॥
तुका ह्मणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥3॥
551
ह्मणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥1॥
ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाइपडाइप ॥ध्रु.॥
पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥2॥
हि†या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका ह्मणे घन न भेटे तों ॥3॥
552
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥1॥
त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥
प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥3॥
553
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥1॥
अथाअ परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥
देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥3॥
554
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥1॥
भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥
होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥2॥
तुका ह्मणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥3॥
555
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥1॥
नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥
कुडएाची संगती। सदा भोजन पंगती ॥2॥
तुका ह्मणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥3॥
556
कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥1॥
नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥
नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥2॥
नाहीं आह्मां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥3॥
तुका ह्मणे नांवरूप नाहीं आह्मां । वेगळा हएा कर्मा अकर्मासी ॥4॥
लोहगावांस परचक्रवेढा पडला - अभंग 3 557
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥1॥
काय तुह्मी येथें नसालसें जालें । आह्मीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥
परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥2॥
तुका ह्मणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥3॥
558
काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥1॥
उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥
पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥2॥
तुका ह्मणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥3॥
559
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥1॥
आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुह्मी दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥
भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥2॥
तुका ह्मणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥3॥
॥3॥
560
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥1॥
पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळालें ॥2॥
तुका ह्मणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥3॥
561
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥1॥
आतां माझा श्रोता वHा तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च मां ॥ध्रु.॥
कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥2॥
तुका ह्मणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुह्मां गांठी ॥3॥
562
आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥1॥
न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥
वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥2॥
तुका ह्मणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥3॥
563
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥1॥
विष्णुदास आह्मी न भ्याें किळकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥
उधिळतां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥2॥
तुका ह्मणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥3॥
564
नटनाटएें अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥1॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥2॥
तुका ह्मणे आम्ही या जनाविरहित । होऊनि नििंश्चत क्रीडा करूं ॥3॥
565
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥1॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥
नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥2॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥3॥
तुका ह्मणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥4॥
स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग 7 566
मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥1॥
चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ध्रु.॥
कोणाची बाइऩल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥2॥
काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥3॥
कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥4॥
तुका ह्मणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥5॥
567
काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥1॥
किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ध्रु.॥
झवे आपुली आइऩ काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥2॥
तुका ह्मणे येती बाइऩले असडे । काुंफ्दोनियां रडे हांसे कांहीं ॥3॥
568
गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥1॥
भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ध्रु.॥
खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥2॥
तुका ह्मणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥3॥
569
आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥1॥
डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ध्रु.॥
आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥2॥
हातीं टाळ तोंड वासी। गाय देउळीं । देवापासीं ॥3॥
आतां आह्मी करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥4॥
तुका ह्मणे आतां धीरी । आझुनि नाहीं जालें तरी ॥5॥
570
बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥1॥
आतां खाइऩन पोटभरी । ओल्या कोरडएा भाकरी ॥ध्रु.॥
किती तरी तोंड। याशीं वाजवूं मी रांड ॥2॥
तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥3॥
571
न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥1॥
उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ध्रु.॥
जिवंत चि मेले। लाजा वाटुनियां प्याले ॥2॥
संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥3॥
तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥4॥
तुका ह्मणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥5॥
572
कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥1॥
देवासाटीं जालें ब्रह्मांड सोइरें । कोमऑया उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥
मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥2॥
तुका ह्मणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान पाठीं लागे ॥3॥
॥7॥
573
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥1॥
करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥
काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥2॥
तुका ह्मणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥3॥
574
इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥1॥
नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥
मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥2॥
तुका ह्मणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥3॥
575
साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥1॥
परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥
देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥2॥
तुका ह्मणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥3॥
576
आह्मासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥1॥
मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥
कोठें न दिसे पाहतां। उडी घाली अवचिता ॥2॥
सुख ठेवी आह्मासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥3॥
आह्मां घाली पाठीकडे । पुढें किळकाळाशीं भिडे ॥4॥
तुका ह्मणे कृपानीधी । आह्मां उतरीं नांवेमधीं ॥5॥
577
रवि रिश्मकळा । नये काढितां निराळा ॥1॥
तैसा आह्मां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥
गोडी साकरेपासुनी। कैसी निवडती दोन्ही ॥2॥
तुका ह्मणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥3॥
578
थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥1॥
घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥
चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥2॥
आपलें तें हित फार । तुका ह्मणे खरें सार ॥3॥
579
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥1॥
ह्मणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥
ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥2॥
तुका ह्मणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥3॥
580
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥1॥
ह्मणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
खवळलिया कामक्रोधीं। अंगी भरती आधिव्याधी ॥2॥
ह्मणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥3॥
581
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥1॥
आतां भजों कवणे परी । देव सबाहए अंतरीं ॥ध्रु.॥
उदका वेगळा। नव्हे तरंग निराळा ॥2॥
हेम अळंकारा नामीं । तुका ह्मणे तैसे आह्मी ॥3॥
582
परमेिष्ठपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥1॥
हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥2॥
सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥3॥
पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥4॥
योगसििद्धसार। ज्यासि वाटे तें असार ॥5॥
मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥6॥
तुका ह्मणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥7॥
583
मोहो†याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥1॥
नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥
स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥2॥
तुका ह्मणे खोडी । देवमणी न देती दडी ॥3॥
584
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥1॥
बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥
येथें न सरे चार। हीण आणीक वेव्हार ॥2॥
तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥3॥
585
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥1॥
धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥
बहुत बराडी । देवजवळी आवडी ॥2॥
तुका ह्मणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥3॥
586
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥1॥
कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥
पावलें मरे सिवेपाशीं। क्लेश उरत ते क्लेशीं ॥2॥
तुका ह्मणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥3॥
587
न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥1॥
भोग देतां करिती काइऩ । फुटतां यमदंडें डोइऩ ॥ध्रु.॥
पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥2॥
तुका ह्मणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥3॥
588
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥1॥
अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥
आइता च पाक । संयोगाचा सकिळक ॥2॥
तुका ह्मणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥3॥
589
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥1॥
झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥
सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥2॥
तुका ह्मणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥3॥
590
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥1॥
जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥
काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥2॥
तुका ह्मणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥3॥
591
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥1॥
तुह्मी सवाअ सवाौत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥
परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥2॥
गा†हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥3॥
592
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥1॥
संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥.
संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥2॥
तुका ह्मणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥3॥
593
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥1॥
घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥.
नाहीं पाहावें लागत। एकाएकीं च ते रित ॥2॥
तुका ह्मणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥3॥
594. करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥1॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.
शािळग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥2॥
तुका ह्मणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥3॥
595. ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥1॥
करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥.
असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥2॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥3॥
596. देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥1॥
ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥.
वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥2॥
तुका ह्मणे भुक । येणें न लगे आणीक ॥3॥
597. नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥1॥
उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥.
नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥2॥
तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥3॥
598. गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥1॥
परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥.
मुखें ह्मणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥5॥
तुका ह्मणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥3॥
599. द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥1॥
माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥.
कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥2॥
भोग िस्त्रयेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥3॥
तुका ह्मणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥4॥
600. मुखें बोले ब्रह्मYाान । मनीं धनअभिमान ॥1॥
ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥.
पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥2॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥3॥
गाथा ६०१ ते ९००
601
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥1॥
अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यYासििद्ध देहहोम ॥2॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥3॥
602
त्रैलोक्य पािळतां उबगला नाहीं । आमचें त्या काइऩ असे ओझें ॥1॥
पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥2॥ तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥3॥
603
बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥1॥
कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥ टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥2॥ तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥3॥
604
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥1॥
हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥ तुह्मी पापा भीतां । आह्मां उपजावया चिंता ॥2॥ तुका ह्मणे सेवा । किळकाळा जिंकी देवा ॥3॥
605
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥1॥
वृित्त राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥2॥ तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥3॥
606
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥1॥
मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥ दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥2॥ तुका ह्मणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥3॥
607
सुख वाटे तुझे वणिऩतां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥1॥
व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥ वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥2॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥3॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥4॥ ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥5॥ डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥6॥ ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥7॥ तुका ह्मणे तुझी कीतिऩ त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥8॥
608
नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनादऩना ॥1॥
देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥ भोगी भोगविता। बाळासवें तो चि पिता ॥2॥ कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥3॥
नाटाचे अभंग समाप्त 63 609
प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥1॥
तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें। पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥ आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥2॥ काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज ह्मणती । करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥3॥ मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥4॥
610
प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वणिऩतां ॥1॥
तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घाग†या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥2॥ नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग। सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥3॥ जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोिळयां धनी । असुर जयाच्या चरणीं। आदीं अवसानीं तो चि एक ॥4॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥5॥
611
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥1॥
विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥2॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥3॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥4॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥5॥
612
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥1॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥2॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥3॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥4॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुस†याची ॥5॥
613
मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥1॥
नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥ केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥2॥ नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पािळला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥3॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥4॥ आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका ह्मणे ॥5॥
614
आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥1॥
जवळी विठ्ठल रखुमाइऩ । बहिणी बंधु बाप आइऩ । सकळ गोताची च साइऩ । पारिखें काइप ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दु†हावली ॥2॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥3॥ सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥4॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोेले बोबडें पुढें तुका ॥5॥
615
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुHी यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेिष्टला जीव माझा ॥1॥
माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥ काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥2॥ मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृित्तके मृित्तका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥3॥ आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥4॥
616
अगा ए सावऑया सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विYाापना । सांभाळी दीना आपुलिया ॥1॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥2॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥3॥ जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥4॥ माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्ग‍ु तुका ह्मणे ॥5॥
617
आतां मज धरवावी शुिद्ध । येथुनी परतवावी बुिद्ध । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥1॥
करिसील तरि नव्हे काइऩ । राइऩचा डोंगर पर्वत राइऩ । आपुले करुणेची खाइऩ। करीं वो आइऩ मजवरी ॥ध्रु.॥ मागील काळ अYाानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥2॥ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥3॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा। सोडवीं भ्रमापासुनिया ॥4॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥5॥
618
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाइऩन गुण तयाचे ॥1॥
जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥ जो या असुरांचा काळ । भHजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥2॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥3॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥4॥ जयाचे नाम पाप नासी । लIमी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥5॥
619
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुह्मी सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥1॥
काय हें खंडइऩल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । ह्मणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥ काय हो िस्थर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाइऩल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥2॥ काय ऐसें पुण्य होइऩल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥3॥ काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥4॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका ह्मणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥5॥
620
तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥1॥
संतसंगति देइप चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥2॥ मज भाव प्रेम देइऩ कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥3॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपित्तराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भHीविण मायबापा ॥4॥ जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥5॥
621
सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥1॥
आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देइऩल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुिद्ध अधरा ॥ध्रु.॥ दासीचा पाहुनरउखतें। धणी देइऩल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शिHहीन ॥2॥ काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥3॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड। ऐसियास भांड ह्मणे देव तो ॥4॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनादऩनष । तुका ह्मणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥5॥
622
विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥1॥
कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होइऩल भेटी जन्मासी ॥2॥ जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥3॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य। न करिती नित्य नामस्मरण ॥4॥ तुका ह्मणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागिया ॥5॥
623
आले हो संसारा तुह्मी एक करा । मुिHमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥1॥
नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥2॥ नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥3॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोइप । अिग्नस्तंभीं बाही कवटाळविती ॥4॥ देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती। लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥5॥ तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥6॥ ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भिHरस तुका ह्मणे ॥7॥
624
न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा। तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥1॥
उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥2॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशिH टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥3॥ ह्मणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥4॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं ह्मणे तुका ह्मणे ॥5॥
625
आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥1॥
न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥2॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥3॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥4॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥5॥
626
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥1॥
शरण आलों नेणतपणें । भाव आणि भिH कांहीं च नेणें । मतिमंद सर्वYाानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥ मन िस्थर नाहीं माझिये हातीं। इंिद्रयें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युHी । शांति निवृित्त जवळी नाहीं ॥2॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥3॥ राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥4॥
627
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसििद्ध साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥1॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥ भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥2॥ नेणें भाव परि ह्मणवीं तुझा । नेणें भिH परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥3॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां। न भीं सर्वथा तुका ह्मणे ॥4॥
628
कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥1॥
प्रथम केला गभाअ वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥2॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा। वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥3॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौ†याशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥4॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी। तुका ह्मणे करीं कृपा आतां ॥5॥
629
सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥1॥
ह्मणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥2॥ ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाहए अभ्यंतर मजजवळा ॥3॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुिHमुिH जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥4॥ जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका ह्मणे ॥5॥
630
देवा तूं आमचा कृपाळ । भिHप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥1॥
तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥2॥ आह्मां भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥3॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वणूऩ कीर्ती तया सुखा ॥4॥ तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका ह्मणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आह्मां ॥5॥
631
न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बिळवंता सांपडलों ॥1॥
बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडएा नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥ तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥2॥ अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकइऩल छाय । उरइऩल हाय रातिकाळीं ॥3॥ होइऩल संचिताची सत्ता। अंगा येइऩल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां। बहुत चिंता प्रवर्तली ॥4॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका ह्मणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥5॥
632
आतां धर्माधमाअ कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥1॥
येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी। मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीतिऩ हे जगे वाणिजेते ॥2॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥3॥ येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥4॥ केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका ह्मणें सांगितलें संतीं। देइप अंतीं ठाव मज देवा ॥5॥
633
बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥1॥
दिलीं इंिद्रयें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥2॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांइऩ होऊं उतराइऩ। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आइऩ पांडुरंगे ॥3॥ फेडियेला डोिळयांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥4॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा। तुका ह्मणे भिडा भHीचिया ॥5॥
634
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोिळलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥1॥
किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार। गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥ विविध कर्म चौ†याशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥2॥ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥3॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥4॥ ह्मणोनि नासावें अYाान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनादऩन । धरूनि चरण तुका विनवी ॥5॥
635
ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥1॥
जनादऩना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमदऩना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥2॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाटएकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥3॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा। करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥4॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥5॥
636
होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥1॥
धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥ मज तों पडियेली होती भुली। चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृिष्ट उघडली बरें जालें ॥2॥ आतां हा सििद्ध पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुह्मां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥3॥ कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं। केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥4॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥5॥
637
तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विYाापना पायांपाशीं ॥1॥
काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भHीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥ न लवीं आणीक कांहीं पिसें। माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥2॥ तुज समपिऩली काया । जीवें भावें पंढरीराया। सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥3॥ चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव। आरुष भाव परि माझा ॥4॥ होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका ह्मणे साच फोल तूं जाणसी ॥5॥
638
कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥1॥
पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥2॥ काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥3॥ आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥4॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होइप प्रगट ॥5॥
639
मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूतिऩमंत । ह्मणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भH ऐसा दिसें ॥1॥
ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आह्मां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुस†याचा ॥2॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥3॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अYााना समजावीं ॥4॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥5॥
640
बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुह्मां समर्पण ॥1॥
दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥2॥ तुह्मासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥3॥ रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आह्मां दोष । तूं जगदीश कैवारी ॥4॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका ह्मणे ॥5॥
641
आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्ताठायीं ॥1॥
भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥2॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥3॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥4॥ बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेइलों तें ॥5॥
642
तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥1॥
भुिHमुिH जयाच्या कामारी । रििद्धसििद्ध वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥2॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥3॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पिक्षश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥4॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका ह्मणे स्वामी माझा । पावे भिHकाजा लवलाहीं ॥5॥
643
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें ह्मणावें । करितों जीवें निंबलोण ॥1॥
बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥2॥ मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । ह्मणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥3॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥4॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका ह्मणे मज संत हांसती ॥5॥
644
बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥1॥
न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥2॥ जयाचें जया होइऩल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥3॥ आस निरसली ये खेपे। अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥4॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका ह्मणे आपें आप एकाएकीं ॥5॥
645
अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभHी। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुिद्ध जाणोनियां ॥1॥
बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥ जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥2॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें। आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥3॥ न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥4॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुHा आत्मा परिपूर्ण । तुका ह्मणे सगुण भोऑया आह्मां ॥5॥
646
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनादऩना । आनंदघना अविनाशा ॥1॥
सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥2॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या िक्षती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥3॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥4॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी। भवबंधनीं सोडवावें ॥5॥
647
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥1॥
विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥2॥ बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥3॥ होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भिHिप्रय लोभापर । करी आदर याचकपणें ॥4॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । ह्मणोनि शरण निघालों संतां । तुका ह्मणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥5॥
648
माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भिH तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥1॥
धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥2॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंिद्रयांसी ॥3॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे ह्मणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥4॥ ह्मणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों नििंश्चत तुका ह्मणे ॥5॥
649
तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥1॥
आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देइप जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥ माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥2॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढएा आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥3॥ आळवीन करुणावचनीं। आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥4॥ आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका ह्मणे साहे केलें अंतरीं ॥5॥
650
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥1॥
सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होइऩल जाण सत्य भाव ॥2॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥3॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होइऩल परी । होइऩल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥4॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका ह्मणे दशा भोगीं वैराग्य ॥5॥
651
मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥1॥
लक्ष चौ†याशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥2॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥3॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि ह्मणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥4॥ क्षण एक मन िस्थर करूनी । साव होइप डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥5॥
652
दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥1॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भHांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भHांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥2॥ सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥3॥ राखे दारवंटा बळीचा। रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥4॥ भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका ह्मणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥5॥
653
हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भHीची ॥1॥
धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृित्तकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लगे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गि†हे राबवीती ॥2॥ बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥3॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रििद्धसििद्ध देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥4॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥5॥
654
बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौ†याशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥1॥
जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥ न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥2॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥3॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥4॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥5॥
655
जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥1॥
जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥2॥ जोडोनि धन न घलीं माती । ब्रह्मवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥3॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥5॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाइऩल ग्वाही । तुका ह्मणे ते ही यमआYाा ॥5॥
656
ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आह्मां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥1॥
उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥ध्रु.॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥2॥ शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥3॥ आतां पुढें बोलणें तें काइप । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेइप । तुका ह्मणे तइप मज कळसी ॥4॥
657
चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥1॥
शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥ सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । ह्मणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥2॥ ह्मणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥3॥ येणें मज भोगविल्या खाणी। नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥4॥ पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड। आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥5॥
658
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥1॥
उदार तरी लIमीयेसी । जुंझार तरी किळकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥2॥ गांढएा तरी भावाचा अंकित । बराडी तरी उिच्छष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥3॥ खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा। लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥4॥ उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका ह्मणे बोलिलों साच। नाहीं अहाच पूजा केली ॥5॥
659
काय आह्मी भिH करणें कैसी । काय एक वाहावें तुह्मांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥1॥
कसें करूं इंिद्रयां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥2॥ काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥3॥ काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥4॥ तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका ह्मणे ॥5॥
660
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥1॥
शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥ध्रु.॥ शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें। पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥2॥ शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥3॥ शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥4॥ शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग करीं हरिभजनीं ॥5॥
661
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥1॥
न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥2॥ जनमित्र होइप सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥3॥ करिसी देवाविण आस । अवघी होइऩल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥4॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥5॥
662
संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥1॥
किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवताअ भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥2॥ अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥3॥ ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥4॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका ह्मणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥5॥
663
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥1॥
विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥ उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥2॥ रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुटएा धाकुटा ॥3॥ करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय। आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥4॥ पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका ह्मणे चित्तें चित्त मेळवूनी ॥5॥
664
ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥1॥
न पुरे डोिळयांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥2॥ गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण। व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥3॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥4॥ जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥5॥ कान्होबा0नाट अभंग 7 665
अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनादऩना जगव्यापका । अगा पाळका भHांचिया ॥1॥
अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बिळबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥2॥ अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वणूप ॥3॥ अगा अंबॠषिपरंपरा। निलारंभ निविऩकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥4॥ अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥5॥ अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमदऩना । राखें शरणा तुकयाबंधु ॥6॥
666
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥1॥
शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥2॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुिद्रका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥3॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥4॥ सुंदरपणाची साम्यता । काय वणूप ते पावे आतां । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥5॥
667
एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥1॥
नको दुजी बुिद्ध आणीक । रििद्धसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥ मना येइऩल तो जन्म देइप । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥2॥ इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥3॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥4॥
668
कइप देखतां होइऩन डोळीं । सकळां भूतीं मूतिऩ सांवळी। जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥1॥
ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होइऩन । प्रेमसागरीं बुडइऩन । होइऩल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥ ऐसा कइप येइऩन दैवास । दृश्य नासोनि जाइऩल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥2॥ कइप नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होइऩल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥3॥ प्रसन्न दया क्षमा शांति । कइप नवविधा होइऩल भिH । भोगीन वैराग्यसंपित्त । मनोरथ कळती तइप पुरले ॥4॥ तुकयाबंधु ह्मणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । ह्मणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥5॥
669
तूं बिळया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी ह्मणउनी । आतां करीन मी असेल तें ॥1॥
तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ध्रु.॥ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥2॥ उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥3॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु ह्मणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥4॥
670
देवा मी चांडाळ चांडाळ । ह्मणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥1॥
जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥2॥ भिH दया अथवा कथा। कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥3॥ काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥4॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥5॥ पािळलें नाहीं पितृवचन। सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥6॥ कायामनें वाचाइंिद्रयांशीं । सकळ पापांची च राशी । तुकयाबंधु ह्मणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥7॥
671
काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥1॥
भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥2॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥3॥ चेतवूनि इंिद्रयें सकळ। आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुिद्ध केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥4॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु ह्मणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥5॥ नाटाचे अभंग समाप्त 63
672
काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥1॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥ आतां येणें चवी सांडिली ह्मणती । निवाडा करिती दिवाणांत ॥2॥ भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥3॥ तुका ह्मणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥4॥
673
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥1॥
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो ढवाऑया । भावें धुतो चोऑया दासीचिया ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥3॥
674
एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥1॥
एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनी ॥ध्रु.॥ अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥2॥ एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥3॥ एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥4॥ चहूंकडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥5॥ रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावें आतां ॥6॥ कोण रक्षी आतां ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥7॥ आइकोनि तुह्मी तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळविळलां ॥8॥ आYाा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥9॥ ससें एक तेथें उठवुनी पळविलें । तया पाठीं गेली श्वानें दोन्ही ॥10॥ मृगें चमकोनी सत्वर चाललीं । गोविंदें रिक्षलीं ह्मणोनियां ॥11॥ ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भHांसी जीवलग ॥12॥ ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाइऩच्या पती तुका ह्मणे ॥13॥
675
आशाबद्ध वHा । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥1॥
वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ध्रु.॥ बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥2॥ माप तैसी गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥3॥
676
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥1॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥2॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥3॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥4॥ विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥5॥
677
बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटािळलों ॥1॥
एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥ जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे दाखविल्या मुHाफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥3॥
678
बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥1॥
पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥ अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वणिऩतां लक्षण रे देवा ॥2॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु ह्मणे महिमा नेणें रे ॥3॥
679
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें हें अंगणीं वैष्णवांच्या ॥1॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥2॥ नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥3॥ तुका ह्मणे मोक्ष भHाचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥4॥
680
तीथॉ केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥1॥
जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥2॥ तुका ह्मणे विठ्ठलपायीं। अनंत तीथॉ घडिलीं पाहीं ॥3॥
681
कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥1॥
नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥ नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या ह्मैसी गाइऩ व्हाव्या ॥2॥ हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥3॥ तुका ह्मणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥4॥
682
रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥1॥
पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥ध्रु.॥ भिलटीचिया रे उिच्छष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥2॥ मी तों सलगीचें मूल । तुका ह्मणे तू सखोल ॥3॥
683
तुजवरी ज्याचें मन । दरुषण दे त्याचें ॥1॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥ अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥2॥ तुका ह्मणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥3॥
684
विश्वव्यापी माया । तिणें झाकुिळलें छाया ॥1॥
सत्य गेलें भोऑयावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥ आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुह्मी कोडीं हीं उगवा ॥3॥
685
पोटीं जन्मती रोग । तरि कां ह्मणावे आप्तवर्ग ॥1॥
रानीं वसती औषधी । तरि कां ह्मणाव्या निपराधी ॥2॥ तैसें शरीराचें नातें । तुका ह्मणे सर्व आप्तें ॥3॥
686
नव्हे शब्द एक देशी । सांडी गवशी कोणाला ॥1॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥ मोकलिलें जावें बाणें। भाता जेणे वाइलें ॥2॥ आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥3॥
687
गायनाचे रंगीं । शिH अद्भुत हे अंगीं ॥1॥
हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥ अंगीं प्रेमाचें भरतें । नाहीं उतार चढतें ॥2॥ तुका ह्मणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥3॥
688
माप ह्मणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥1॥
देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥ देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥2॥ हातीं सूत्रदोरी । तुका ह्मणे त्याची थोरी ॥3॥
689
कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥1॥
नेलें वा†या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥ कोणाची हे सत्ता। जाली वाचा वदविता ॥2॥ तुका ह्मणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥3॥
690
सकिळकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥
अहो श्रोते वHे सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥2॥ तुका ह्मणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥3॥
691
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥1॥
अणुरेणु सूIमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥2॥ दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृिष्ट कृष्णलोक ॥3॥ तुका ह्मणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥4॥
692
जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥1॥
भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥ आह्मी दुजें नेणों कोणा। हें चि मना मन साक्ष ॥2॥ तुका ह्मणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥3॥
693
स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥1॥
परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥2॥ तुका ह्मणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥3॥
694
तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥1॥
सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥ अव्यHा अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥2॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥3॥ तुका ह्मणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥4॥
695
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥1॥
बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाइऩ नो ॥ध्रु.॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥2॥ तुका ह्मणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥3॥
696
आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥1॥
पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥ पडिलें वळण इंिद्रयां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥2॥ तुका ह्मणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥3॥
697
मी तों सर्वभावें अनधिकारी । होइल कैसी परी नेणों देवा ॥1॥
पुराणींचे अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंिद्रयांचीं आह्मी पांगिलों अंकितें । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसे ॥2॥ एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥3॥ तुका ह्मणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥4॥
698
लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आह्मांस दृष्टीपुढें ॥1॥
कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥ व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निविऩकार ॥2॥ रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुला मानसीं शिव ध्याय ॥3॥ अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥4॥ अचेत चेतलें भHाचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका ह्मणे ॥5॥
699
कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥1॥
कैसी भिH करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥ कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥2॥ कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी िस्थती मती दावीं मज ॥3॥ तुका ह्मणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥4॥
700
निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥1॥
या रे गौिळयांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥ पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥2॥ तुका ह्मणे भार । माथा टाका अहंकार ॥3॥
701
मन वोळी मना । बुिद्ध बुद्धी क्षण क्षणां ॥1॥
मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥ जें जें जेथें उठी। तें तें तया हातें कुंटी ॥2॥ भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥3॥
702
ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥1॥
तो चि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥ शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥2॥ पापपुण्यां नाहीं ठाव । तुका ह्मणे सहज भाव ॥3॥ 703
काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥1॥
तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥ रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सििद्ध ते ठायीं ॥2॥ काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥3॥ वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥4॥ तुका ह्मणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥5॥
704
तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥1॥
तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥2॥ तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥3॥ तुका ह्मणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥4॥
705
बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥1॥
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वटे खरें ॥ध्रु.॥ विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ॥2॥ तुका ह्मणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥3॥
706
होइऩन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥1॥
हा चि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचें नाम ॥ध्रु.॥ हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥2॥ तुका ह्मणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥3॥
707
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥1॥
त्यांची सरली वेरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥ हरी आला हाता । मग कैंची भय चिंता । तुका ह्मणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥3॥
708
मोक्ष तुमचा देवा । तुह्मी दुर्लभ तो ठेवा ॥1॥
मज भHीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥2॥ तुका ह्मणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥3॥
709
नामपाठ मुHाफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥1॥
तरी आह्मी जालों उदास निर्गुणा । भHांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥ द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनियां ॥2॥ तुका ह्मणे आतां अभयदान करा । ह्मणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥3॥
710
भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥1॥
तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥ मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥2॥ तुका ह्मणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥3॥
711
नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥1॥
असें तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ॥ध्रु.॥ नाहीं स्वरूपीं ओळखी । भिHभाव करीं देखीं ॥2॥ नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥3॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काइऩ ॥4॥ कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥5॥
712
सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥1॥
जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीतिऩ जेणें ॥ध्रु.॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥2॥ तुका ह्मणे भोळा । जिंकुं जाणे किळकाळा ॥3॥
713
सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥1॥
आह्मी तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥ आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥2॥ तुका ह्मणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥3॥
714
करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥1॥
बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥ दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥2॥ तुका ह्मणे मन । तेथें सकळ कारण ॥3॥
715
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥1॥
सहज पूजा या चि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥ अवघें भोगितां गोसावी। आदीं आवसानीं जीवी ॥2॥ तुका ह्मणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥3॥
716
नसे तरी मनो नसो । परी वाचे तरी वसो ॥1॥
देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥ दंभिस्थती भलत्या भावें । मज हरिजन ह्मणावें ॥2॥ तुका ह्मणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥3॥
717
नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥1॥
ह्मणविल्या ढास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥ समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥2॥ तुका ह्मणे सत्ता । वरी असते बहुतां ॥3॥
718
न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥1॥
ह्मणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥ नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥2॥ तुका ह्मणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥3॥
719
एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥1॥
ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥ एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥2॥ प्रकाराचें तीन । तुका ह्मणे केलें जन ॥3॥
720
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥1॥
दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥ अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥2॥ बीज पृथिवीच्या पोटीं । तुका ह्मणे दावी दृष्टी ॥3॥
721
विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥1॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥ देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥2॥ तुका ह्मणे होतें । बहु गोमटें उचितें ॥3॥
722
तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥1॥
ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥ वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥2॥ तुका ह्मणे माया । होय दासी लागे पायां ॥3॥
723
मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥1॥
एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥ सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥2॥ तुका ह्मणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥3॥
724
अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥1॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥ हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥2॥ तुका ह्मणे पापा । शिवों नये अनुतापा ॥3॥
725
चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥1॥
तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥ तपें इंिद्रयां आघात । क्षणें एका वाताहात ॥2॥ मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥3॥ व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥4॥ धर्म सkव चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥5॥ भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥6॥ तुका ह्मणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥7॥
726
सोडिला संसार । माया तयावरि फार ॥1॥
धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥ यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥2॥ तुका ह्मणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥3॥
727
बैसों खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥1॥
रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥ विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥2॥ तुका ह्मणे आतां । आह्मां जीवन शरणागतां ॥3॥
728
पाटीं पोटीं देव । कैचा हरिदासां भेव ॥1॥
करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥ एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥2॥ तुका ह्मणे धनी । सपुरता काय वाणी ॥3॥
729
मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥1॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाहए रंग ॥ध्रु.॥ अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥2॥ तुका ह्मणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥3॥
730
जाणे भHीचा जिव्हाळा । तो चि देवीचा पुतळा ॥1॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥ नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥2॥ तुका ह्मणे नवविध । भिH जाणे तो चि शुद्ध ॥3॥
731
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥1॥
माझें दिठावेल प्रेम । बुिद्ध होइऩल निष्काम ॥ध्रु.॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥2॥ तुका ह्मणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥3॥ 732
बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥1॥
नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥2॥ तुका ह्मणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥3॥ 733
अक्षइऩ तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥1॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥2॥
तुका ह्मणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥3॥
734
तुझे थोर थोर । भH करिती विचार ॥1॥
जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥
करुणावचनें । म्यां भाकावीं तुह्मां दीनें ॥2॥
तुका ह्मणे घेइप । माझें थोडें फार ठायीं ॥3॥
735
लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥1॥
सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥
गात नाचत विनोदें । टाळघाग†यांच्या छंदें ॥2॥
तुका ह्मणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥3॥
736
मुH कासया ह्मणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥1॥
सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥
देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥2॥
तुका ह्मणे साहे । देव आहे तैसा आहे ॥3॥
737
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥1॥
तें चि पुढें पुढें काइऩ । मग लागलिया सोइऩ ॥ध्रु.॥
रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥2॥
तुका ह्मणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥3॥
738
आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥1॥
नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥2॥
तुका ह्मणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥3॥
739
काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥1॥
मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥
त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥2॥
तुका ह्मणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥3॥
740
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥1॥
तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥2॥
तुका ह्मणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥3॥
741
पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥1॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥
देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥2॥
गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥3॥
शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥4॥
तुका ह्मणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥5॥
742
भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥1॥
धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥
हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥2॥
तुका ह्मणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥3॥
743
वरि बोला रस । कथी Yाान माजी फोस ॥1॥
ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥
परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥2॥
तुका ह्मणे हाडें । कुत†या लाविलें झगडें ॥3॥
744
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥1॥
अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥
न वजिऩतदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥2॥
नव्हे एकदेशी । तुका ह्मणे गुणदोषीं ॥3॥
745
आपलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥1॥
परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥2॥
तुका ह्मणे भुली । इच्या उफराटएा चाली ॥3॥
746
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥1॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥2॥
तुका ह्मणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥3॥
747
कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥1॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥
भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥2॥
तुका ह्मणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥3॥
748
नेणती वेद श्रुति कोणी । आह्मां भाविकां वांचुनी ॥1॥
रूप आवडे आह्मांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥
आह्मीं भावें बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥2॥
तुका ह्मणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥3॥
749
मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥1॥
मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥
येऊनियां घाली घाला । नेणों काय होइऩ तुला ॥2॥
तुका ह्मणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥3॥
750
घेइप माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥1॥
तुह्मी घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥
तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥2॥
मना तेथें धांव घेइप । राहें विठोबाचे पायीं ॥3॥
तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥4॥

Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP