॥अभंगवाणी॥२५१ते५००॥

251
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥1॥
भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥2॥
तुका ह्मणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥3॥
॥2॥
252
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥1॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ध्रु.॥
भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥2॥
तुका ह्मणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥3॥
253
ब्रह्मनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥1॥
तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥
सांगितलें कानीं। रूप आपुलें वाखाणी ॥2॥
भूतांच्या मत्सरें । ब्रह्मYाान नेलें चोरें ॥3॥
शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥4॥
निंदा स्तुति स्तवनीं । तुका ह्मणे वेंची वाणी ॥5॥
254
इहलोकींचा हा देहे । देव इिच्छताती पाहें ॥1॥
धन्य आह्मी जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥
आयुष्याच्या या साधनें । सिच्चदानंद पदवी घेणें ॥2॥
तुका ह्मणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥3॥
255
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥1॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
जाणोनियां लाभ घेइप हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥2॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥3॥
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥4॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥5॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥6॥
तुका ह्मणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें मूळ तेथें॥7॥
256
आणिकांच्या कापिती माना । निष्ठ‍पणा पार नाहीं ॥1॥
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥2॥
तुका ह्मणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥3॥
257
गंधर्व अिग्न सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥1॥
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ध्रु.॥
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥2॥
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥3॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥4॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥5॥
न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुH ॥6॥
तुका ह्मणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥7॥
258
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥1॥
मुHाफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥
वेदपरायण बधिरा सांगे Yाान । तयाची ते खुण काय जाणे ॥2॥
तुका ह्मणे ज्याचें तो चि एक जाणे । भHीचें महिमान साधु जाणे ॥3॥
259
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥1॥
संसार करितां ह्मणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥
आचार करितां ह्मणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥2॥
संतसंग करितां ह्मणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि Yाान नाहीं ॥3॥
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥4॥
बहु बोलों जातां ह्मणति हा वाचाळ । न बोलतां सकळ ह्मणती गर्वी ॥5॥
भेटिसि न वजातां ह्मणती हा निष्ठ‍ । येतां जातां घर बुडविलें ॥6॥
लग्न करूं जातां ह्मणती हा मातला। न करितां जाला नपुंसक ॥7॥
निपुत्रिका ह्मणती पहा हो चांडाळ। पातकाचें मूळ पोरवडा ॥8॥
लोक जैसा लोक धरितां धरवे ना। अभHा जिरे ना संतसंग ॥9॥
तुका ह्मणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भिH करा ॥10॥
260
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आह्मांसि ॥1॥
वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥
न बाणतां िस्थति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥2॥
तुका ह्मणे अधम त्यासी । भिH दूषी हरीची ॥3॥
261
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तो चि आह्मीं कंठीं साठविला ॥1॥
काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रििद्धसिद्धी ॥ध्रु.॥
असुर जयानें घातले तोडरीं । तो आह्मांसि जोडी कर दोन्ही ॥2॥
रूप नाहीं रेखा जयासि आकार । आह्मीं तो साकार भHीं केला ॥3॥
अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आह्मासाठीं ॥4॥
रििद्धसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥5॥
तुका ह्मणे आह्मी देवाहूनि बळी। जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥6॥
262
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय ह्मणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥1॥
तैसे पूजिती आह्मां संत । पूजा घेतो भगवंत । आह्मी किंकर संतांचे दास। संतपदवी नको आह्मांस ॥ध्रु.॥
केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु। विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥2॥
केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥3॥
ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका ह्मणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आह्मी पाषाणरूप राहणें ॥4॥
263
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥1॥
येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें ह्मणोनियां ॥ध्रु.॥
सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उिच्छष्टाची ॥2॥
तुका ह्मणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥3॥
264
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निदऩळण कंटकांचें ॥1॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥2॥
तुका ह्मणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥3॥
265
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥1॥
आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥
वियोग तें तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥2॥
तुका ह्मणे पायें । डोळा सुखावे ज्या न्यायें ॥3॥
266
कन्या सासु†यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥1॥
तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये। बाळ हुरू हुरू पाहे ॥2॥
जीवना वेगळी मासोळी । तुका ह्मणे तळमळी ॥3॥
267
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥1॥
ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥
सांडिले आचार। द्विज चाहाड जाले चोर ॥2॥
टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥3॥
बैसोनियां तHां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥4॥
मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥5॥
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥6॥
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुिश्चतासी तोडी ॥7॥
वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥8॥
अवघे बाहए रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥9॥
तुका ह्मणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥10॥
268
साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥1॥
परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥
आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥2॥
सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥3॥
अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥4॥
तुका ह्मणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥5॥
269
दिवटएा वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥1॥
नवरा नेइऩ नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥2॥
करूं द्यावें न्हावें वरें। ठायीचें कां रे न कळे चि ॥3॥
व†हडियांचे लागे पाठीं। जैसी उटिका तेलीं ॥4॥
तुका ह्मणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥5॥
270
ब्रह्महत्या मारिल्या गाइऩ । आणीक काइऩ पाप केलें ॥1॥
ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
नरमांस खादली भाडी । हाका मारी ह्मणोनि ॥2॥
अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळााषिलें ॥3॥
उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥4॥
तुका ह्मणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥5॥
271
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥1॥
फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥2॥
तुका ह्मणे त्याचें अन्न । मद्यपाना समान ॥3॥
272
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥1॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥2॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥3॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृित्त ॥4॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥5॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥6॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥7॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥8॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो ह्मणोनि आनंदी ॥9॥
नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥10॥
आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥11॥
नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥12॥
273
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥1॥
देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥
लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥2॥
तुका ह्मणे धीरा । विण कैसा होतो हिरा॥3॥
274
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥1॥
सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥
संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥2॥
तुका ह्मणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥3॥
275
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥1॥
ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥
गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥2॥
विंचु लाभाविण । तुका ह्मणे वाहे शीण ॥3॥
276
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥1॥
विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥
सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥3॥
277
आणिकांची स्तुति आह्मां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥1॥
आह्मां विष्णुदासां एकविध भाव । न ह्मणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
शतखंड माझी होइऩल रसना । जरी या वचना पालटेन ॥2॥
तुका ह्मणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥3॥
278
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥1॥
माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥
तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥2॥
कृपादृष्टीं पाहें । तुका ह्मणे होइप साहे ॥3॥
279
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥1॥
येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ध्रु.॥
अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥2॥
तुका ह्मणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥3॥
280
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥1॥
अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥
हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥2॥
तुका ह्मणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥3॥
281
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥1॥
परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥
उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आह्मां पुढती पाहूं नये ॥2॥
तुका ह्मणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥3॥
282
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥1॥
ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥
कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥2॥
तुका ह्मणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥3॥

हनुमंतस्तुति - अभंग 4 283
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥1॥
काय भHीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥2॥
तुका ह्मणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥3॥
284
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥1॥
ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भHांचें भूषण ॥ध्रु.॥
जाऊनि पाताळा। केली देवाची अवकळा ॥2॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥3॥
जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥4॥
तुका ह्मणे जपें । वायुसुता जाती पापें ॥5॥
285
काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥1॥
तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥
शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥2॥
रामाच्या सेवका । शरण आलों ह्मणे तुका ॥3॥
286
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥1॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥
करोनी उdाण । केलें लंकेचें दहन ॥2॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य ह्मणे तुका ॥3॥

॥4॥
287
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गुफे डावा ॥1॥
ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥
हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥2॥
तुका ह्मणे शिरीं । एक एकाची पायरी ॥3॥
288
मांडे पु†या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥1॥
ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥
बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥2॥
तुका ह्मणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥3॥
289
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥1॥
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥
सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर ह्मुन ॥2॥
तुका ह्मणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥3॥
290
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥1॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥
तुका ह्मणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥2॥
291
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥1॥
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास। गति अथवा अधोगति ॥2॥
साधक वाचक पंडित । श्रोते वHे ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ॥3॥
292
मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥1॥
चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥2॥
तुका ह्मणे नरकीं घाली अभिमान । जरी होय Yाान गर्व ताठा ॥3॥
293
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥1॥
पंडित हे Yाानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥2॥
तुका ह्मणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥3॥
294
प्रारब्ध क्रियमाण । भHां संचित नाहीं जाण ॥1॥
अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
सत्वरजतमबाधा। नव्हे हरिभHांसि कदा ॥2॥
खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥3॥
देवभHपण । तुका ह्मणे नाहीं भिन्न ॥4॥
295
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूतिऩ । तो माझा सांगाती प्राणसखा ॥1॥
ह्मणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥
सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आह्मां संगें क्रीडा करी ॥2॥
तुका ह्मणे आह्मी विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥3॥
296
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥1॥
थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥
पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥2॥
न ह्मणे उिच्छष्ट अथवा थोडे । तुका ह्मणे भHीपुढें ॥3॥
297
कोणें तुझा सांग केला अंगीकार । नििश्चति त्वां थोर मानियेली ॥1॥
कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥
तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥2॥
कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥3॥
तुका ह्मणे यासि सांगा कोणी तरी। विसरला हरी मायबाप ॥4॥
298
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥1॥
साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥2॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका ह्मणे ॥3॥
299
आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥1॥
दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥1॥
तुका ह्मणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥3॥
300 मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥1॥
खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥
मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥2॥
स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥3॥
सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुH शीण तुका ह्मणे ॥4॥
301 माझें ह्मणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥1॥ कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥2॥ तुका ह्मणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥3॥
302 आंधऑयासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥1॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥2॥ तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥3॥
303 छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥1॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा। त्याची व्यभिचारीण माता ॥2॥ तुका ह्मणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥3॥
304 बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥1॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥ संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥2॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥3॥ तुका ह्मणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥4॥
305 अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥1॥ एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥ चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥2॥ तुका ह्मणे नसे संचित हें बरें । तयासि दुसरें काय करी ॥3॥
306 धिग जीणें तो बाइऩले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥1॥ धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥ धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥2॥ धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥3॥ तुका ह्मणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥4॥
307 अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥1॥ मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥ विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥2॥ अणीक एक कोड । नरका जावयाची चाड। तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥3॥ तुका ह्मणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥4॥
308 अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥1॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शािब्दकांसि ॥2॥ तुका ह्मणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥3॥
309 एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥1॥ दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥2॥ एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥3॥ एकां भिH पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥4॥ वर्म पोटीं एका । फळें दोन ह्मणे तुका ॥5॥
310 काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥1॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥2॥ तुका ह्मणे भावें । माझ्या मज समजावें ॥3॥
311 भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥1॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥2॥ हें ना तें सें जालें । तुका ह्मणे वांयां गेलें ॥3॥
312 एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥1॥ ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥ अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥2॥ सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बिळवंत ॥3॥ आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥4॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका ह्मणे व्रत । एकादशी चुकलीया ॥5॥
313 करवितां व्रत अधॉ पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥1॥ शुद्धबुिद्ध होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥ आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥2॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥3॥ तुका ह्मणे तप तीर्थ व्रत याग । भिH हे मारग मोडूं नये ॥4॥
314 इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥1॥ अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥ अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥2॥ तुका ह्मणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥3॥
315 वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥1॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥2॥ तुका ह्मणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥3॥
316 विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥1॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥ बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥2॥ तुका ह्मणे भावें । कृपा करीजेते देवें ॥3॥
317 येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥1॥ वैकुंठींच्या लावूं वाटा ।सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥ येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥2॥ तुका ह्मणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥3॥
318 उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥1॥ बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥2॥ तुका ह्मणे नये आह्मां । पुढें कामा गबाळ ॥3॥
319 बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥1॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥ दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥2॥ तुका ह्मणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥3॥
320 बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥1॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥2॥ सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥3॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥4॥ तुका ह्मणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥5॥
321 दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥1॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥2॥ तुका ह्मणे नाद । जाला अवघा गोविंद ॥3॥
322 कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥1॥ तुह्मी दयावंत कैसे । कीतिऩ जगामाजी वसे ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझा करावा कुठावा ॥3॥
323 ठायींची ओळखी । येइल टाकुं टाका सुखीं ॥1॥ तुमचा जाइऩल इऩमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥ ठेविला तो ठेवा। अभिळाषें बुडवावा ॥2॥ मनीं न विचारा । तुका ह्मणे हे दातारा ॥3॥
324 तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥1॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥2॥ तुका ह्मणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥3॥
325 गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥1॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥ कमाइऩच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥2॥ तुका ह्मणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥3॥
326 पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥1॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥2॥ तुका ह्मणे जपें । संतांचिया जाती पापें ॥3॥
327 देव होइऩजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥1॥ दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥ दाखविले परी नाहीं वजिऩजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥2॥ तुका ह्मणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥3॥
328 शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥1॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ध्रु.॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥2॥ तुका ह्मणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥3॥
329 वैद वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥1॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥2॥ जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥3॥
330 मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥1॥ नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥ चोखािळल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥2॥ झळकती पताका । गरुड टके ह्मणे तुका ॥3॥
331 कातिऩकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥1॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥ चालती िस्थर िस्थर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥2॥ मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥3॥ नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । किळकाळ कांपती ॥4॥ आस करिती ब्रह्मादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक। ह्मणती भाग्याचे कैसे ॥5॥ मरण मुिH वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥6॥ तुका ह्मणे आतां । काय करणें आह्मां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥7॥
332 जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥1॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥ सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निविऩकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥2॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥3॥ उपजोनि संसारीं। एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी। देवभH देखिलिया ॥4॥ ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी। सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे किळकाळा ॥5॥ तें सुख वर्णावया गति। एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥6॥ तुका ह्मणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा। तया पंढरी नावडे ॥7॥
333 एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥1॥ बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥ दोहीं सवा नाड। विहीर एकीकडे आड ॥2॥ तुका ह्मणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥3॥
334 ह्मणवितों दास । मज एवढी च आस ॥1॥ परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥ बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥2॥ तुका ह्मणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥3॥
335 पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥1॥ हें तों जाणां तुह्मी संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥2॥ तुका ह्मणे माथा । पायीं ठेवीं तुह्मां संतां ॥3॥
336 स्वप्नऴिचया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं । जालें लटिकें सकळ ॥1॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥ सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥2॥ तुका ह्मणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥3॥
337 आसुरी स्वभाव निदऩय अंतर । मानसीं निष्ठ‍ अतिवादी ॥1॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥ काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥2॥ तुका ह्मणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥3॥
338 बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥1॥ बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । ह्मणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें । जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥ मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं ।
विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥2॥
एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे ।
लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥3॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।
कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥4॥
वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।
तुका ह्मणे सुखी । केलीं आपणासारिखीं। स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥5॥
339 अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥1॥
सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात। देइऩल कां नेदी भेटी रघुनाथ ।
मन उताविळ जाला दुरी पंथ। राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥
काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें ।
गाइऩवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥2॥
नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें ।
उलंघिली आYाा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥3॥
नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये ।
उपटी पिक्षया एक देउनि पाये । उदकवेढएामध्यें तेथें चाले काये ॥4॥
जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
संमोखी त्रीजटा िस्थर िस्थर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥5॥
340 वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥1॥ तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥ आणिकां गुणां पोटीं वाव। दावी भाव आपुला ॥2॥ तुका ह्मणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥3॥
341 नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥1॥ पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥ लटिक्याचे पुरीं वाहोनियां गेलों दुरी ॥2॥ तुका ह्मणे नाव । आह्मां सांपडला भाव ॥3॥
342 अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥1॥ आपुलालें तुह्मी करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥2॥ देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥3 ॥ हित तरी होय गातां अइऩकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥4॥ तुका ह्मणे होसी भावें चि तूं मुH । काय करिसी युH जाणिवेची॥5॥
343
काय उणें आह्मां विठोबाचे पाइप । नाहीं ऐसें काइऩ येथें एक ॥1॥
ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥2॥ तुका ह्मणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥3॥
344
सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥1॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥2॥ तुका ह्मणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥3॥
345
ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु ।
जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥1॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुिद्ध नािस्त भेदु।
भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥
मन बुिद्ध काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं ।
लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥2॥
अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या ।
वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥3॥
मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास ।
साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका ह्मणे जो विटला जाणीवेस रे ॥4॥
346
भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥1॥
त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥ सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥2॥ भुिHमुHीची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता। तुका ह्मणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥3॥
347
जें का रंजलें गांजलें । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥1॥
तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाहए नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥2॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥3॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥4॥ तुका ह्मणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥5॥
348
याजसाठीं भिH । जगीं रूढवावया ख्याति ॥1॥
नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥ गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥2॥ तुका ह्मणे अळंकारा । देवभH लोकीं खरा ॥3॥
349
अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥1॥
जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥2॥ तुका ह्मणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥3॥
350
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥1॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥ कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥2॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥3॥
351
आचरणा ठाव ।नाहीं अंगीं स्वता भाव ॥1॥
करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥ श्वानाचियापरी मिष्टान्नासि विटाळ करी ॥2॥ तुका ह्मणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥3॥
352
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥1॥
व्याली कु†हाडीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥2॥ तुका ह्मणे जाय । नरका अभHाची माय॥3॥
353
पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥1॥
विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥2॥ तुका ह्मणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥3॥
354
देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥1॥
जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥2॥ अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥3॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥4॥


मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली - अभंग ॥5॥ 355
न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥1॥
भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥ शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥2॥ तुका ह्मणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥3॥
356
बरवें बरवें केलें विठोबा बरवें । पाहोनि आंत क्षमा अंगी कांटीवरी मारविलें ॥1॥
शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥2॥ तुका ह्मणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥3॥
357
पावलों पावलों । देवा पावलों रे ॥1॥
बरवें संचित होतें तैसें जालें रें । आतां काय बोलों रे ॥2॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका ह्मणे करूनि वेगळा केलों रे ॥3॥
358
कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥1॥
मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥ होणार होऊनि गेलें। मिथ्या आतां खंती रे ॥2॥ तुका ह्मणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥3॥
359
सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥1॥
तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥ कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आह्मी जातां ॥2॥
तुका ह्मणे सखया । माझ्या रखुमाइऩच्या कांता ॥3॥ ॥5॥
360
पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥1॥
तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ध्रु.॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥2॥ तुका ह्मणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥3॥
361
ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥1॥
तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥ कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥2॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥3॥ तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥4॥
362
न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥1॥
बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥ कोठवरि जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥2॥ बुडालीं तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥3॥ पुढें उलंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥4॥ तुका ह्मणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥5॥
363
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥1॥
तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥2॥ तुका ह्मणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥3॥
364
शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥1॥
येथें केले नव्हे काइऩ ॥ लंडीपण खोटें भाइऩ ॥ध्रु.॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साहए ॥2॥ तुका ह्मणे घडी । साधिलिया एक थोडी ॥3॥
365
ह्मणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥1॥
माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं काळापाशीं गोवा । िस्थति मति देवा वांचूनियां ॥3॥
366
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥1॥
नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥ पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥2॥ तुका ह्मणे याती । हो का तयाची भलती ॥3॥
367
करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥1॥
आह्मी न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥ पावोत आत्मिस्थति । कोणी ह्मणोत उत्तम मुिH ॥2॥ तुका ह्मणे छंद । आह्मां हरिच्या दासां निंद्य ॥3॥
॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली - अभंग 4 ॥
368
सद्ग‍ुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥1॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥ भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥2॥ कांहीं कळहे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ॥3॥ राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण मािळकेची ॥4॥ बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥5॥ माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्मणे ॥6॥
369
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥1॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥ जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥2॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥3॥ तुका ह्मणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥4॥
370
घालुनियां भार राहिलों नििश्चतीं । निरविलें संतीं विठोबासि ॥1॥
लावूनियां हातें कुरवािळला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥ कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥2॥ खुंटले सायास अणिकि या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥3॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका ह्मणे संता लाज माझी ॥4॥
371
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ॥1॥
तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥2॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुह्मां ॥3॥
तुका ह्मणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥4॥ ॥4॥
372
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥1॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥ देवाची जतन। तया बाधूं न शके अग्न ॥2॥ तुका ह्मणे हरी । प्र†हादासि यत्न करी ॥3॥
373
भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥1॥
ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥ पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोइऩ तें तेव्हां गोड ॥2॥ तुका ह्मणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों ॥3॥
374
संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥1॥
तेथें रामनाम होइऩल श्रवण । घडेल भोजन उिच्छष्टाचें ॥ध्रु.॥ कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥2॥ तुका ह्मणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥3॥
375
एकली राणागोविंदा सवें । गेलें ठावें तें जालें ॥1॥
मज न ह्मणा न ह्मणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥ नव्हती देखिली म्यां वाट । ह्मणोनि हा धीट संग केला ॥2॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥3॥ सलगी धरी पयोधर। साहाती करमुर सवें ॥4॥ आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥5॥ तुका ह्मणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥6॥
376
होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ।
व्हावी भेटी ते जाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥1॥
िस्थर िस्थर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी ।
नाहीं लौकिक स्मरला आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥2॥
उदयीं उदय साधिला अवकाश । नििंश्चतीनें नििंश्चती सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका ह्मणे हा मागुता न ये दिवस वो ॥3॥
377
स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।
अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥1॥
आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
एका मेघःशामें जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सखोल वो ॥ध्रु.॥
एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं ।
अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीतिऩ गाइली पुराणांतरी वो ॥2॥
स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर ।
परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥3॥
भिHवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।
दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥4॥
तुका लाधला हें उिच्छष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून ।
पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥5॥
378
आजि का वो तूं दिससी दुिश्चती । ह्मणी एका मन लगे तुझ्या चित्तीं ।
दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥1॥
सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ ॥
होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी ।
नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदीं देह काम करी वो ॥2॥
नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें ।
नाहीं अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुज देहभावें वो ॥3॥
कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत ।
दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥4॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना ।
परा भिH हे शुद्ध तुह्मी जाणा । तुका ह्मणें ऐसें कळों यावें जना वो ॥5॥
379
भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट ।
चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तो चि नीट वो ॥1॥
चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें ।
दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ध्रु.॥
मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार ।
उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥2॥
धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें ।
मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकी पडिलीं तुझीं सोंगें रें ॥3॥
सुख अंतरींचें बाहए ठसठसी । ह्मणे विनोद हा काय सोंग यासी ।
तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥4॥
करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाहए रंग जाना ।
मन मिनलें रे तुका ह्मणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥5॥
380
आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।
गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥1॥
गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं ।
अंगीं जडला मग उरलें तें काइऩ । आतां राखतां गुमान भलें बाइऩ वो ॥ध्रु.॥
बहुत कामें मज नाहीं आराणूक। एक सारितां तों पुढें उभें एक ।
आजि मी टाकोनि आलें सकिळक। तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥2॥
चिंता करितां हरिली नारायणें। अंगसंगें मिनतां दोघेजणें ।
सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें । तुका ह्मणे खुंटलें येणें जाणें वो ॥3॥
381
मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥1॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥ काहां पग डारूं देख आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥2॥ हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥3॥
382
हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥1॥
क्या मेरे लाल कवन चुकी भइऩ । क्या मोहिपासिती बेर लगाइऩ ॥ध्रु.॥ कोइऩ सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥2॥ तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥3॥
383
भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥1॥
आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे ह्मांना ॥ध्रु.॥ उन्हसुं कळना वेतो भला । खसम अहंकार दादुला ॥2॥ तुका प्रभु परवली हरी ।छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥3॥
384
नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहती बहु होतो उबारा ।
मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा ॥1॥
सखिया वेशिया तुह्मी प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ध्रु.॥
नये कळों नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत ।
एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होइल नेणों भाग्य उदित वो ॥2॥
स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मिळत लोचन ।
अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका ह्मणे दर्शनापें आलें जीवन ॥3॥
385
पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।
मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥1॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं ।
कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥
मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग ।
पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥2॥
शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।
केला उच्चार रे घडल्या दोषांचा। जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥3॥
386
काय उणें कां करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी ।
परपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥1॥
माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात ।
न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि िस्थर चित्त ॥ध्रु.॥
बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी ।
करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥2॥
तुज ह्मणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोिळयां परता ।
न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥3॥
387
घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुिश्चत्ती ।
कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥1॥
बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण ।
ह्मणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता। तैं पाचारिलें होउनि ये वो सीता ।
लाजिनली रूप न ये पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥2॥
सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥3॥
मज भुली पडली कैशापरी । आह्मां भोगूनि ह्मणे मी ब्रह्मचारी ।
दिली वाट यमुने मायें खरी । तुह्मां आह्मां न कळे अद्यापवरी वो ॥4॥
जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका ह्मणे येथें भाव चि कारण वो ॥5॥
388
मिळोनि गौळणी देती यशोदे गा†हाणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकां नुरे कांहीं ।
मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥1॥
हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी ।
आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥
तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो ।
आह्मी जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आह्मां ॥2॥
मुख मिळण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती ह्मणे आणा शीक लावूं ।
थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां। डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥3॥
मिळोनि सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा ।
बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥4॥
फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही ।
उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥5॥
389
गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें ।
जाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥1॥
सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां ।
नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥
आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।
आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥2॥
आह्मी येथें अधिकारी मागें केली तुह्मी चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें ।
बोलिल्या हांसुनी आह्मी सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥3॥
वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं ।
जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥4॥
तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या। कृष्णमिळणीं मिळाल्या त्याही न फिरती ।
तुका ह्मणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥5॥
390
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होइऩन काळी । मग हें वाळी जन मज ॥1॥
उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा। अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥ तुझिये अंगीं घुरट घाणी। बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥2॥ मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥3॥ तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज माझी ॥4॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुH करूनि भोगी ॥5॥
391
सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गा†हाणें देती कैसें ।
काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें। दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें ।
चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥1॥
आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनि सकळै जणी करूं वाखा सखीं तुज मज होइऩल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥ नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आह्मी नसतां तेथें आपण संचार करी।
सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे मेजाबाजावरी । शिंकीं कडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥2॥
आतां याची चाड नाहीं आह्मां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें । सोसिलें बहु दिस नव्हता केला निस ह्मणुनि एकुलतें तुमचें ।
चरण खांबीं जीवें बांधैन सरिसा जवें न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥3॥
घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठ‍ वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा ।
जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥4॥
392
विरहतापें काुंफ्दे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुिश्चती ।
न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती ॥1॥
खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती ।
त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥
बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें संचार ।
विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा ।
त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा ॥3॥
393
ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें ।
कळों नेदी माया त्याचें त्यास ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥1॥
अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया त्या वाहाती संकल्प मना ।
काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ध्रु.॥
अवघियांचा जाणें जाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी ।
कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥2॥
आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन ।
एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका ह्मणे एका नारायणा वांचून ॥3॥
394
खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या ।
मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥1॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी नेदी साउलां रे ॥ध्रु.॥ साडएा साउलीं पातळें गोंडे कसणिया चोऑया । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे।
खांदी धरूनियां करीं दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥2॥
आनंदें कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळ । एकी एकीहूनि ह्मैस वेल सुर काडी ।
एकी उगविती कोडीं । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥3॥
एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । ह्मणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां।
केला सकळी हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां ह्मणतील घरां जावें कैशा परी ॥4॥
तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात ।
लाज राखावी गोपाळा आह्मांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥5॥
जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं ।
भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥6॥
एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे। ह्मणे चला आतां सये जाऊं तयापाशीं ।
जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका ह्मणे केली मात लाज राखिली तयांची ॥7॥
395
धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें ।
एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥1॥
सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं ।
सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥
सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी ।
होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥2॥
कैसी भागली हे करितां उत्तर । शिH मावळल्या आसुडितां कर ।
स्वामी तुकयाचा भोगिया चतुर। भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥3॥
396
गाइऩ गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी ।
चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं । चला चला ह्मणती पाहूं दृष्टी वो ॥1॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ।
मिस पाणियाचें करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ध्रु.॥
चिरें चोिळया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती ।
कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं ताटस्त सकळ नेत्रपातीं वो ॥2॥
दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात ।
करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥3॥
397
कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥1॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥2॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला। बोलीं च अबोला करूनियां ॥3॥
398
गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥1॥
वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥ परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥2॥ तुकयाच्या स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागिल्यांची ॥3॥
399
पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥1॥
बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥ जीवा आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥2॥ जालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥3॥
400
कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस ह्मणे घ्या हरी ॥1॥
देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥2॥ तुका ह्मणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥3॥
401
करूनी आइत सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न ये चि देव येतील कामलहरी रे । पडिली दुिश्चती तंव तो कवाड टिमकारी रे ॥1॥
सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥ मी च वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे । मागुती रुद्रासि भेटी दिली तइप रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥2॥ भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडएा कौसाल्या रे ॥3॥
402
तंव तो हरि ह्मणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥1॥
पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देइप भ्रांति करीं िस्थर बुिद्ध वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुिद्ध वो ॥ध्रु.॥ कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । िस्त्रयांनीं भ्रतारा दानां दिलें वो । कैसा भला मी नव्हे तें सोसिलें वो । रुसतेसी तूं उफराटें नवल जालें वो ॥2॥ काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वें आणविलें हनुमंतासि वो । कष्टी केलें मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु ह्मणे खरें खोटें नव्हे यासि वो ॥3॥
403
तंव ते ह्मणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुह्मी ह्मणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाटए बरें संपादूं जाणतोसि वो ॥1॥
सर हो परता परता हो आतां हरी । ह्मणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥ भावें गेलें ह्मुण न व्हावा वियोग। मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग । तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥2॥ काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में। परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥3॥ काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ‍ ऐसा निर्गुण । आप पर न ह्मणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥4॥ इतुकियावरी ह्मणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना । आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भHवत्सल ह्मणे तुकयाबंधु कान्हा ॥5॥
404
कान्हो एकली रे एकली रे । तुजसवें चुकलें रे । भय वाटे वनीं मज अबळा धाकली रे ॥1॥
निघतां घरीं आइऩ बा वारी। तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥ लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥2॥ पिकल्या बोरी जालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥3॥ आड खुंट जालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥4॥ तुका ह्मणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥5॥
405
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥1॥
बहु दिसीं जाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥ कोवळें बोलतो मना आवरतें । डोिळयाचें पातें ढापवेना ॥2॥ आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥3॥ तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥4॥ तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥5॥
406
आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥1॥
कां गो कलित्यां कोल्हाल । तुह्मी भलत्या च सकल । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥ याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥2॥ काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें। कामबाणीं अंतर ॥3॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥4॥ आतां मोटी वार। माझी नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥5॥
407
हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥1॥
अवघ्या अंगें सवाौत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥ वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥2॥ तुका ह्मणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥3॥
408
गौळणी आल्या वाज । ह्मणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूं । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥1॥
नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥ जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे । त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥2॥ उतरोनि सिंकें । पाहे चाखोनियां निकें। गोड तें चि एका एकें । हातीं लांबवितो । जाणे राखती तयांसि । तेथें अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥3॥ जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरांत धरीयेला । कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥4॥ दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें । तुका ह्मणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । दसवंती कवतुक। करुनी रंजविल्या ॥3॥
409
आलियें धांवति धांवति भेट होइल ह्मुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥1॥
आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥ लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभािळतां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥2॥ जळो आतां संसारु वो कइप शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥3॥
410
आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥1॥
सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥ सदा घालिता हुंबरी। एक एकांचे न करी ॥2॥ तुका ह्मणे घरीं माय वेळोवेळां मारी ॥3॥
411
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥1॥
बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥ माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥2॥ तुका ह्मणी काइऩ । किती ह्मणों बाप आइऩ ॥3॥
412
गाइऩन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाइऩ ॥1॥
चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुह्मीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥ मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥2॥ मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥3॥ निदाऩिळले दुष्ट भHां प्रतिपाळी । ऐसा ह्मणों बळी आमुचा स्वामी ॥4॥ तुका ह्मणे सरसी असों येणें वोघें । लागोनि संबंधें सर्वकाळ ॥5॥

डांका - अभंग 8 413
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥1॥
रंगा येइप वो विठाइऩ सांविळये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥ रजतमधुपारती। पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥2॥ मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भिHभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥3॥ डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥4॥
414
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥1॥
माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥ तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी। तुझ्या घरिच्यांनीं केली ॥2॥ आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥3॥ आंधऑयासी डोळे। देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाइऩ ॥4॥ उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका ह्मणे घडी। न लगे नवस द्या आधीं ॥5॥
415
विनति घातली अवधारीं । मज देइप वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥1॥
रंगा येइप वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥ध्रु.॥ देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवति ॥2॥ न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका ह्मणे कुळ । आमुचिये दैवते ॥3॥
416
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥1॥
या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी। करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥ पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥2॥ घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें। अवघे ठाव सांडुनी ॥3॥ घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥4॥ तुका ह्मणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥5॥
417
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥1॥
एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भHापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥ मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुह्मीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥2॥ तुका ह्मणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥3॥
418
अवघ्या जेष्ठादेवी कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव कोठें नाहींसें जालें ॥1॥
दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥ पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोऑया घागरी डेरे रांझण गाडगीं ॥2॥ तुका ह्मणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्या चि शोभल्या ॥3॥
419
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर। पंढरपुर पाटणीं ॥1॥
आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥ सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकिळया केशी ॥2॥ लाविलें कावरें । प्रल्हादा ह्मैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥3॥ वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥4॥ पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥5॥ नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥6॥ कुळीची कुळदेवता । तुका ह्मणे आह्मां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥7॥
420
देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥1॥
हरिनाम देवनाम तुह्मी गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥ शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥2॥ गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका ह्मणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥3॥ ॥8॥
421
जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥1॥
मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥2॥ तुका ह्मणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥3॥
422
अंगीं देवी खेळे । कां रे तुह्मासी न कळे । कोणाचे हे चाळे सुख दुःख न मनितां ॥1॥
मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेइप । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥ आपुलाले तुह्मी पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय जाणों विचार ॥2॥ तुका ह्मणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥3॥
423
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे। आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥1॥
दाते हो दान करा। जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी जन्मदुःखातें वारी । कीतिऩ हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥2॥ या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय भीक नाहीं खंडणा । पुढारा ह्मणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥3॥ काय मी चुकलों गा मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं
मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥4॥
दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी
होतें हें चि कारण । दुर्लभ भेटी तुह्मां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥5॥
424
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी कोठें िस्थर राहिलों ।
पाय डोळे ह्मणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ जालों ॥1॥ आतां माझी करीं चिंता । दान देइप भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥ चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें। कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥2॥ भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा । लक्ष चौ†याशी गांव । धरूनि राहिलों गा । हा चि वसता ठाव ॥3॥ भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीतिऩ । तया मज बहुतां ।
ह्मणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥4॥
संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी ।
निष्काम जालों देवा। होतें माझे कपाळीं । तुका ह्मणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥5॥
425
देखत होतों आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ ।
तिमिर कोंदलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥1॥
आतां मज दृष्टी देइप । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी। करीं मारग सोपा । जाइऩन सिद्धपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥ होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना मागें तोही सांडिला आधार । हा ना तोसा ठाव जाला। अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥2॥ जोंवरि चळण गा । तोंवरि ह्मणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंिद्रयें मावळलीं । आला बागुल आजा। कैसा विपरीत जाला। तो चि देह नव्हे दुजा ॥3॥ गुंतलों या संसारें। कैसा झालोंसें अंध। मी माझें वाढवुनी मायातृष्णेचा बाध।
स्वहित न दिसे चि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥4॥
लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग जालों निराळा कैसा ।
पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका ह्मणे वैद्यराजा। पंढरीच्या निवासा ॥5॥
426
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृित्त हे निवृित्त जाली जन न दिसे तेथें ।
मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें। अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥1॥
सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा। वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥2॥
ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतkव निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥3॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । ह्मणोनि चालविला मागें येतील त्यांसीं ।
मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥4॥
वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव ।
ह्मणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका ह्मणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥5॥
427
आंधऑयापांगऑयांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता। भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥1॥
धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ।
न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥2॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें। न देखे न चलवे जना चालते वाटे ।
घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥3॥
बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।
मागील सोसिलें तें ना भीं ह्मणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥4॥
न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना ।
आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना। तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥5॥
428
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी ।
न चलती हात पाय दृिष्ट फिरली कैसी। जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥1॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीतिऩ हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥ भुिH मुिH तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां। कृपादान देइप देवा येउनि सामोरा आतां ॥2॥
संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंिद्रयें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥3॥
तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका ।
जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोइऩ आमुचिये हाका ॥4॥
नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देइप अभयकरू ॥5॥

वासुदेव - अभंग 6
429
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आह्मांवरी गा ॥1॥
ह्मणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ।
दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥
सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।
कडे चुकवुनि कांटवण। ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥2॥
पुढें भHीनें धरिलें हातीं। मागें Yाान वैराग्य धर्म येती ।
िस्थर केलीं जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥3॥
केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ।
धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥4॥
होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव ।
तो येणें अवघा संदेह । ह्मणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥5॥
430
गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका।
डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥1॥
राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं ।
सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥
ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय ।
पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥2॥
क्षणभंगुर नाहीं भरवसा। व्हा रे सावध सोडा माया आशा ।
न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥3॥
कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भिH भाव धरा बळकट ।
तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥4॥
विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां ।
दान इतुलें द्या मज दीना । ह्मणे तुकयाबंधु राम ह्मणा गा ॥5॥
431
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून ।
जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥1॥
हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना ।
चिपऑया टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥
जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ।
द्या परी मीस घेऊं नका भाइऩ । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥2॥
देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त।
जालें एक चित्त तरी बहुत । तेवढएासाठीं नका करूं वाताहात गा ॥3॥
आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास।
नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥4॥
आतां मागुता येइऩल फेरा । हें तों घडे या नगरा ।
ह्मणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥5॥
432
राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥1॥
राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपिळया । टाळ घाग†याघोषें गा ॥ध्रु.॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥2॥ एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं। नीज घेउनि फिरती गा ॥3॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥4॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीतिऩ वाढे चराचर । तुका ह्मणे तया नमस्कार गा ॥5॥
433
बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥1॥
वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥ हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें। गजर होतो बहु मोटएानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥2॥ मी वासुदेव तत्वता । कळों येइऩल विचारितां। आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥3॥ काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥4॥ ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका ह्मणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥5॥
434
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळएा वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥1॥
जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥ निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥2॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होइप सांडुनि झोपेला । दान देइप वासुदेवालागा ॥3॥ तुका ह्मणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान। त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥4॥ ।6॥
गांवगुंड - अभंग 1 435
आह्मी जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥1॥
दुसरें तें खेळों आलें । एका बोले तो मियां ॥ध्रु.॥ अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥2॥
तुका ह्मणे खुंटूं नाद । जिंतूं वाद सर्तीनें ॥3॥ ॥1॥
जोगी - अभंग 1 436
जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥1॥
जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥2॥ पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥3॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥4॥ नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥5॥
तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥6॥ ॥1॥
सरवदा - अभंग 1 437
एका गा ए भाइऩ । सरवदा सांगतो काइऩ । येथें नाडेल माइऩ । दोघां पुत्रांची ।
ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥1॥ आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय। नरकामध्यें अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें। अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें ह्मणोन । पडिलें खान तया घरीं ।
ह्मणोन न ह्मणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होइऩल तइप । चोराठायीं विश्वास ॥2॥
आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं ।
पांचांनीं दिधली हातीं । ह्मणोनि न मनावी नििश्चती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥3॥
एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो तुका ह्मणे आइऩ ।
येथें नांव काइऩ । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥4॥ ॥1॥
मुंढा - अभंग 3 438
संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥1॥
प्यार खुदाइऩ रे बाबा जिकिर खुदाइऩ ॥ध्रु.॥ उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥2॥ कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥3॥
439
सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥1॥
आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥ आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥2॥ जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥3॥ निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥4॥ कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥5॥
440
आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताहाी तुंब बजाये ॥1॥
आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥ काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥2॥ सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ॥3॥ सुनो भाइऩ बजार नहीं । सब हि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥4॥
एक तार नहीं प्यार । जीवतनकी आस । कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥5॥ ॥3॥
डोइऩ फोडा - अभंग 1
441
तम भज्याय ते बुरा जिकीर ते करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥1॥
ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुह्में नहीं ॥ध्रु.॥ दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सचा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥2॥ किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥3॥ सुनो भाइऩ कैसा तो ही । होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ॥4॥
भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख । कहे तुका सो ही संका । हाक आल्ला एक ॥5॥ ॥1॥
मलंग - अभंग 1 442
नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥1॥
काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥ दमरी चमरी जो नर भुला। सोत आघो हि लत खाये ॥2॥
नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोदे खाये ॥3॥ ॥1॥
दरवेस -अभंग 1 443
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥1॥
ख्याल मेरा साहेबका। बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥2॥
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥3॥ ॥1॥
वैद्यगोळी - अभंग 1 444
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे। अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥1॥
मदऩ होये वो खडा फीर नामदऩकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥ सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥2॥ जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥3॥ सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥4॥ मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥5॥
बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥6॥ ॥1॥
गोंधळ - अभंग 3
445
राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली
माझी परब्रह्म वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी। परब्रह्म वेल्हाळा वो ॥1॥
राजस विठाबाइऩ । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोइऩ वो ॥ध्रु.॥ सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा
उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥2॥
निर्गुण निराकार । वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले
श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे । भHां देत अभयकर वो ॥3॥
येउनि पंढरपुरा । अवतरली सारंगधरा वो । देखोनि भिH भाव
वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥4॥
446
सुदिन सुवेळ । तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥1॥
पंढरपुरनिवासे । तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा । मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥ मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरी वो ॥2॥ बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती । कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥3॥ स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो । ओवािळली माता । विठाबाइऩ पंचभूतीं वो ॥4॥ तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो । तुका ह्मणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥5॥
447
सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ।
विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥1॥
अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी। मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो ।
कोटि रविशशिप्रभा लोपल्या सकळा वो । न कळे ब्रह्मादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥
सावळी सकुमार । गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो ।
कटीं क्षुद्र घंटिका । शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी । अभिनव संगीत नृत्य करी वो ॥2॥
अष्टांगें मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली। सुगंध लावण्यखाणी वो ।
सर्वकळासंपन्न । मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली । आदिशिH नारायणी वो ॥3॥
घटस्थापना केली । पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला । तिन्ही ताळांवरी वो ।
आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो । आली भिHकाजा। कृष्णाबाइऩ योगेश्वरी वो ॥4॥
तेहतिस कोटि देव । चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंडएा । करिती पुष्पांचा वरुषाव वो ।
नारद तुंबर गायन । ब्रह्मानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें । तुकयाचा बंधव वो ॥5॥
448
शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें ।
ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें । रे विठ्ठल ॥1॥
टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग ।
पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥2॥
राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी ।
वासने हातीं बांधवी नळी। त्यासि येउनि गिळी । रे विठ्ठल ॥3॥
कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ।
करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख । रे विठ्ठल ॥4॥
सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां ।
विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका । रे विठ्ठल ॥5॥
कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी ।
फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळे । रे विठ्ठल ॥6॥
फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया ।
शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया । रे विठ्ठल ॥7॥
धुळी माती कांहीं खेळों च नका। जवादी चंदन घ्यावा बुका ।
आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका । रे विठ्ठल ॥8॥
बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुिद्ध नाहींत बळें ।
पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें । रे विठ्ठल ॥9॥
काय सांगतो तें ऐका तुका। मोडा खेळ कांहीं अवगों च नका ।
चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका। रे विठ्ठल ॥10॥
449
ऐक बाइऩ तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें ह्मणउन ॥1॥
मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥ सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥2॥ बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥3॥ आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साहए चहूं अठरांच्या बळें ॥4॥ करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखइऩ तो चुडा तुज भोगइऩल ना हो ॥5॥ कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥6॥ तुका ह्मणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥7॥
कावडे - अभंग 5 450
आहा रे भाइऩ । प्रथम नमूं तो विनायक ।
ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥1॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।
पान्हेरीनें मार्ग मळी। जीवन घ्या रे कापडि हो ॥2॥
जें या सीतळाहुनि सीतळ। पातळाहुनि जें पातळ ।
प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥3॥
जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।
धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥4॥
काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव ।
शुद्ध सत्वीं राखोनि भाव । ह्मणा महादेव हरिहर वाणी गजाॉ द्या ॥5॥
पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ।
जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर ह्मणों तया ॥6॥
शिH वेचाविया परउपकारा । खोटें खोटएाचा पसारा ।
सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥7॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।
पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥8॥
संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।
पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥9॥
तुका चालवितो कावडी । प्रवृित्त निवृित्त चोखडी ।
पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥10॥
451
आहा आहा रे भाइऩ । हें अन्नदानाचें सत्र ।
पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥1॥
यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।
पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि ह्मणा रे ॥2॥
नव्हे हें कांहीं मोकळें। साक्षी चौघांचिया वेगळें ।
नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा सािक्षत्वें हरि ह्मणा रे ॥3॥
हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।
विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । ह्मणा हर हर महादेव ॥4॥
तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।
या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥5॥
452
आहा रे भाइऩ । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥1॥
नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥2॥ नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥3॥ नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥4॥ नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥5॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंिद्रयांसि ॥6॥ तुका ह्मणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥7॥
453
आहा रे भाइऩ । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥1॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥ बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिका†यास नये दारा ॥2॥ विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥3॥ गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राह्मण अतीत घडे चि ना ॥4॥ सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥5॥ खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥6॥ तुका ह्मणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भिHभावें ॥7॥
454
आहा रे भाइऩ । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ। तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥1॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण ह्मणों नये लिंगा । संत नव्हती जगा। मानसा त्या सारिखे ॥2॥ काठी ह्मणों नये वेतु । अन्न ह्मणों नये सांतु । राम राम हे मातु । नये ह्मणों शब्द हे ॥3॥ चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥4॥ गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न ह्मणावी ॥5॥ कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लIमी ॥6॥ गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते इऩश्वरीचे ॥7॥ सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥8॥ मुHाफळें नव्हेति गारा । खडएाऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥9॥ गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूतिऩ । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥10॥ कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥11॥ ॥5॥

सौ†या - अभंग 11 455
वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥1॥
त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥ जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥2॥ वेगऑया याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें। टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥3॥ सकळांमधीं आगळी बुिद्ध तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भHी नाचों भावा ॥4॥ ह्मणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥5॥
456
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥1॥
तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा। पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥2॥ तुका ह्मणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥3॥
457
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव ह्मणोनि देतें सिवी ॥1॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें। नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥ कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळऴिचया ठाया ॥2॥ याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका ह्मणे तुह्मा गांठी सोडायाची खंती ॥3॥
458
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥1॥
ऐका बाइऩ लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥ न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥2॥ देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका ह्मणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥3॥
459
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥1॥
या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥ अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाइप । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥2॥ तुका ह्मणे वोळगों एका तोड चिंता माया। देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥3॥
460
सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥1॥
चाल विठाबाइऩ अवघी पांज देइप । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥ हिंडोनि चौ†यांशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥2॥ लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥3॥ जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥4॥ तुका ह्मणे रुका करी संसारतुटी । आतां तुह्मां आह्मां कैसी जाली जीवे साटीं ॥5॥
461
सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥1॥
गाऊं रघुरामा हें चि उरलें आह्मां। नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥ ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥2॥ सौरीयांचा संग आह्मां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥3॥ लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥4॥ तुका ह्मणे हा आह्मां वेष दिला जेणें। जनाप्रचित सवें असों एकपणें ॥5॥
462
नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥1॥
चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आह्मां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥ जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे। साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥2॥ बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका ह्मणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥3॥
463
नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥1॥
ते सौरी नव्हे निकी । भHीविण फिकी ॥ध्रु.॥ चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥2॥ थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥3॥ आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥4॥
464
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥
घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥1॥ घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥2॥ घर केलें दार केलें । दुकान केला मोटा। पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥3॥ दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा ह्मणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी । तुका ह्मणे वेगीं । तर हरि ह्मणा जगीं ॥4॥
465
जन्मा आलिया गेलिया परी । भिH नाहीं केली ।
माझें माझें ह्मणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥1॥
येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका । नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥2॥ खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । ह्मणती आह्मी ब†या । साधु संत घरा आल्या । होती पाठमो†या ॥3॥ वाचोनि पढोनि जाले शाहणे । ह्मणती आह्मी संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥4॥ टिळा टोपी घालुनि माळा। ह्मणती आह्मी साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥5॥ कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥6॥ संत ह्मणती केली निंदा । निंदा नव्हे भाइऩ । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥7॥ ॥11॥
वाघा - अभंग 1 466
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥1॥
शुद्धसkवाचा कवडा मोठा। बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भHीच्या ॥2॥ हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें। Yाानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥3॥ लक्ष चौ†यांशी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥4॥ या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥5॥ ॥1॥
लिळत - अभंग 11 467
आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥1॥
जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥2॥ तुका ह्मणे आला । चवी रसाळ हा काला ॥3॥
468
तुह्मी तरी सांगा कांहीं । आह्मांविशीं रखुमाबाइऩ ॥1॥
कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देइप ॥ध्रु.॥ टोकत बैसलों देखा। इच्छीतसें ग्रासा एका ॥2॥ प्रेम देउनि बहुडा जाला । तुका ह्मणे विठ्ठल बोला ॥3॥
469
वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृिष्ट लागलें चित्त ॥1॥
कइप येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविळ भाव सांडुनियां देहे ॥2॥ सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥3॥ तुका ह्मणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥4॥
470
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥1॥
काय गा विठोबा तुज ह्मणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥ संसाराचा धाक निरंतर आह्मांसी। मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥2॥ तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका ह्मणे कवणा लाज हें कां नेणसी ॥3॥
471
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥1॥
माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेतलें नुतरी उचलोनि कडियेवरी ॥2॥ तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3॥
472
कथेची सामुग्री । देह अवसानावरी ॥1॥
नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥2॥ तुका ह्मणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥3॥
473
गिळत जाली काया । हें चि लिळत पंढरिराया ॥1॥
आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥ वाइला कळस । तेथें िस्थरावला रस ॥2॥ तुका ह्मणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ॥3॥
474
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥1॥
कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाइऩ राही ॥ध्रु.॥ नाना उपचारीं । सििद्ध वोळगती कामारी ॥2॥ हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥3॥
475
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥1॥
तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥ कोटि चंद्रलीळा । पूणिऩमेच्या पूर्णकळा ॥2॥ तुका ह्मणे दृिष्ट धाये । परतोनि माघारी ते न ये ॥3॥
476
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥1॥
परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥ नाहीं चित्तशुिद्ध । िस्थर पायांपाशीं बुिद्ध ॥2॥ अपराधाचा केलों । तुका ह्मणे किती बोलों ॥3॥
477
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥1॥
देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥ध्रु.॥ एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥2॥
दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥3॥ ॥11॥
आशीर्वाद - अभंग 5 478
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥1॥
पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥ विश्वासाची धन्य जाती। तेथें वस्ती देवाची ॥2॥ तुका ह्मणे भोिळयांचा । देव साचा अंकित ॥3॥
479
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥1॥
कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥ भिHभाग्यगांठी धन। त्या नमन जीवासी ॥2॥ तुका ह्मणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥3॥
480
तया साटीं वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥1॥
क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥ परत्रींचे जे सांगाती। त्यांची याती न विचारीं ॥2॥ तुका ह्मणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवीं तीं ॥3॥
481
अभय उत्तर संतीं केलें दान । जालें समाधान चित्त तेणें ॥1॥
आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥ आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥2॥ तुका ह्मणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥3॥
482
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥1॥
सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥ विचारूनि ठाया ठाव। येथें भाव राहिला ॥2॥
आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥3॥ ॥5॥
483
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥1॥
कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥ घेइप ऐसी भाक। मागेन जरि कांहीं आणिक ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे देवा । शब्द इतुका राखावा ॥3॥
484
आली लिळताची वेळ । असा सावध सकळ ॥1॥
लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥ जालिया अवसान । न संपडती चरण ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥3॥
485
नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥1॥
करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन िब्रदें करावीं खरीं ॥ध्रु.॥ नेणें भिHभाव तुझा ह्मणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आह्मांसी आहे ॥3॥
486
तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥1॥
आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥ तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूं च भाव भिH पूजा पुनस्कार आघवा ॥3॥
487
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥1॥
आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥ चिंतन समयीं । सेवा आपुली च देइप ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे भावा । मज निरवावें देवा ॥3॥
488
गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥1॥
बिळयाचा बळी तो कैवारी आमुचा। भुिHमुिHदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥ मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥3॥
489
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥1॥
आला आला रे जगजेठी । भHा पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥ पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥3॥
490
कृपाळु भHांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥1॥
उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥ भाव देखोनि निर्मळ। रजां वोडवी कपाळ ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥3॥
491
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥1॥
घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥ लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आह्मांसी ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥3॥
492
अगोचरी बोलिलों आYोविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥1॥
जाइऩल रोकडा बोल न पुसती आह्मां । तुझा तुझें ह्मणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु हीन मी ह्मणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥3॥
493
जाली पाकसििद्ध वाट पाहे रखुमाइऩ । उदक तापलें डेरां चीकसा मदुऩिन अइऩ ॥1॥
उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं। उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥ अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥2॥ सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥3॥ तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥4॥
494
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥1॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥ जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥2॥ तुका ह्मणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥3॥
495
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥1॥
अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देइप ॥ध्रु.॥ असो नमो भाव आलों तुझिया ठाया। पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥2॥ तुका ह्मणे आह्मीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥3॥
496
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥1॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥ पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥2॥ तुका अवसरु जाणवितो पुढें। उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥3॥
497
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होइऩल फळ धीर करावा ॥1॥
न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥ करूनी मदऩन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥2॥ नेसला सोनसळा विनवी रखुमाइऩ । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥3॥ करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥4॥ तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती ची ॥5॥
498
द्या जी आह्मां कांहीं सांगा जी रखुमाइऩ । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥1॥
टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥ येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आह्मी दातारा ॥2॥ प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका ह्मणे आतां विठ्ठल बोला ॥3॥
499
बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥1॥
पयपकीं निद्रा करावें शयन । रखुमाइऩ आपण समवेत ॥ध्रु.॥ घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥2॥ तुका ह्मणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥3॥
500
नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होइऩल तो ॥1॥
तुह्मां निद्रा मज आYाा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाइऩन लोण ॥ध्रु.॥ एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥2॥ तुका ह्मणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥3॥




Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP