॥अभंगवाणी॥४२०१ते४४००॥
4201
संसार करिती मोठएा महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥1॥
पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥
आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥2॥
विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । ह्मणोनि लागले जन्ममृत्यु ॥3॥
तुका ह्मणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥4॥
4202
गव्हाराचें Yाान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥1॥
त्यासी Yाानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥2॥
तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥3॥
4203
भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥1॥
कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें Yाान ॥ध्रु.॥
अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥2॥
कथाकीर्त्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥3॥
तुका ह्मणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥4॥
4204
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळइऩच्या माथां तिडिक उठे ॥2॥
आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥
अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥2॥
तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥3॥
4205
आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥1॥
आवडी आवडी किळवराकिळवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥2॥
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥3॥
4206
हे चि माझे चित्तीं । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती। जागृति स्वप्नासी ॥1॥
आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपित्त धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें॥ध्रु॥
तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देइप । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्ताचा ॥2॥
जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद। हरि गोविंद वाचेसी ॥3॥
काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥4॥
तुका ह्मणे या चि भावें । आह्मीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥5॥
4207
मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देइप माझ्या ॥1॥
तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥
तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥2॥
कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥3॥
तुका ह्मणे प्रेमळाच्या िप्रयोत्तमा । बोल सवाौत्तमा मजसवें ॥4॥
4208
काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥1॥
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥
आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥2॥
तुका ह्मणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥3॥
4209
माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥1॥
मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥
वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥2॥
तुका ह्मणे माते भHां तूं कृपाळ । गििळयेले जाळ वनांतरीं ॥3॥
4210
ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रिक्षले वनांतरीं ॥1॥
मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥
गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥2॥
तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥3॥
4211
धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥1॥
अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥
अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥2॥
तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥3॥
4212
अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥1॥
अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥
वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥2॥
तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वणिऩती सकळ नारायणा ॥3॥
4213
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥1॥
अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुिद्ध कळली अंतरींची ॥ध्रु.॥
गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥2॥
तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥3॥
4214
चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जविळ आले ॥1॥
सकुमार मूतिऩ श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥
लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥2॥
चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥3॥
तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥4॥
4215
श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥1॥
विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥
जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ 2॥
तुका ह्मणे अवघा वोणवा गीिळला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥3॥
4216
गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥1॥
नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आह्मां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥
होइप बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥2॥
वोणव्याच्या रागें गििळशील आह्मां । तुका मेघशामा पायां लागे ॥3॥
4217
सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥1॥
शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥
गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥2॥
कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गििळयेलें ॥3॥
तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥4॥
4218
बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥1॥
बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होइऩल पोिळली नारायणा ॥ध्रु.॥
बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥2॥
घोंगडिया घालीं घालूनियां तळीं। वरी वनमाळी बैसविती ॥3॥
तुका ह्मणे भावें आकिळला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥4॥
4219
एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥1॥
वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥
ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥2॥
तुका ह्मणे अवघे विठोबाभोंवते । मिळाले नेणते लहानथोर ॥3॥
4220
एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥1॥
गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आह्मी चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥
ज्वाळांबरोबरि गिळशील आह्मां। ऐसें मेघशामा भय वाटे ॥2॥
तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥3॥
4221
गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥1॥
ज्वाळाबरोबरि तुह्मां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाटीं ॥ध्रु.॥
निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥2॥
चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥3॥
4222
ऐसा मी अपार पार नाहीं अंत । परि कृपावंत भाविकांचा ॥1॥
दुर्जनां चांडाळां करीं निदाऩळण । करीं संरक्षण अंकितांचें ॥ध्रु.॥
भH माझे सखे जिवलग सांगाती । सर्वांग त्यांप्रति वोडवीन ॥2॥
पीतांबरछाया करीन त्यांवरी । सदा त्यांचे घरीं दारी उभा ॥3॥
माझे भH मज सदा जे रातले । त्यांघरीं घेतलें धरणें म्यां ॥4॥
कोठें हें वचन ठेविलें ये वेळे । तुका ह्मणे डोळे झांकियेले ॥5॥
4223
भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥1॥
अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥
जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥2॥
तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥3॥
दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥4॥
भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥5॥
माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥6॥
ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥7॥
वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥8॥
तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥9॥
4224
कामाचा अंकित कांतेतें प्राथिऩत । तूं कां हो दुिश्चत्त निरंतर ॥1॥
माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥
त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥2॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥3॥
वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥4॥
ताइऩत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥5॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥6॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जािळया फुलें ॥7॥
तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥8॥
4225
उजिळतां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हि†या अंगीं ॥1॥
एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥
परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥2॥
तुका ह्मणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥3॥
4226
बारावषॉ बाळपण । तें ही वेचलें अYाानें ॥1॥
ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥
बाकी उरलीं आठएाशीं। तीस वेचलीं कामासी ॥2॥
बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥3॥
बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥4॥
तुका ह्मणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥5॥
4227
सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥1॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥
चुकला हा भार । तयाची च येरझार ॥2॥
तुका ह्मणे दास । जाला तया नाहीं नास॥3॥
4228
आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥1॥
यासी घेऊं प्रायिश्चत्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥
जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥2॥
अनुतापीं न्हाऊं । तुका ह्मणे रवी पाहूं ॥3॥
4229
ठाव तुह्मांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥1॥
न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥
चोरटएासी थारा। येथें कैंचा जी दातारा ॥2॥
तुका ह्मणे मनें । आह्मां जालें समाधान॥3॥
4230
पािळयेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥1॥
बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥
सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥2॥
तुका ह्मणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण॥3॥
4231
जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो॥1॥
सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥2॥
बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥3॥
दधिमंगळभोजन सारा । ह्मणती करा मुरडींव ॥4॥
मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥5॥
तुका ह्मणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥6॥
4232
न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥1॥
भलीं तेथें राहूं नये । क्षणें होइऩल न कळे काय ॥ध्रु.॥
न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥2॥
नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥3॥
भल्या बु†या मारी । होतां कोणी न निवारी ॥4॥
अविचा†या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥5॥
तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥6॥
4233
शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥1॥
निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥
अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥2॥
तुका ह्मणे जडबुिद्ध । कर्मशुद्धी सांडवीं ॥3॥
4234
गोपीचंदन मुद्रा धरणें । आह्मां लेणें वैष्णवां ॥1॥
मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥
विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥2॥
तुका ह्मणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥3॥
4235
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥1॥
न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥
शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥2॥
तुका ह्मणे अभिमाना । नारायणा न सोसे॥3॥
4236
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥1॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥
उभयकुल समवेत । नकाअ प्रवेश अद्भुत ॥2॥
तप्तलोहें भेटी । तुका ह्मणे कल्पकोटी ॥3॥
4237
लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा॥1॥
कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥
रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥2॥
तुका ह्मणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥3॥
4238
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥1॥
चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥
नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥2॥
तुका ह्मणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥3॥
4239
कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी॥1॥
अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥
विश्वासिया करी घात । न धरी चित्ता कांटाळा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥3॥
4240
घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥1॥
तो ही येथें कामा नये । नकाऩ जाय ह्मणोनि ॥ध्रु.॥
विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥2॥
तुका ह्मणे दांभिक तो । नकाऩ जातो स्वइच्छा ॥3॥
4241
सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥1॥
सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥
असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥2॥
तुका ह्मणे आह्मी जालों अिग्नरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥3॥
4242
वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥1॥
पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥
मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे॥2॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥3॥
तुका ह्मणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥4॥
4243
गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि पैं करावें मुळक्षत्र ॥1॥
खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लIमीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥
वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥2॥
मृगजळा पोही घालुनि सYााना । तापलिया जना निववावें ॥3॥
तुका ह्मणे मिथ्या देहेंिद्रयकर्म । ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा ॥4॥
4244
तुझा ह्मणविलों दास । केली उिच्छष्टासी आस॥1॥
मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥2॥
सीण भाग माझा पुसें । तुका ह्मणे न करीं हांसें ॥3॥
4245
काय मागें आह्मी गंुतलों काशानीं । पुढें वाहों मनीं धाक देवा ॥1॥
कीतिऩ चराचरीं आहे तैसी आहे । भेटोनियां काय घ्यावें आह्मां ॥ध्रु.॥
घेउनी धरणें बैसती उपवासी । हट आह्मांपासीं नाहीं तैसा ॥2॥
तातडी तयांनीं केली विटंबणा । आह्मां नारायणा काय उणें ॥3॥
नाहीं मुिHचाड वास वैकुंठींचा । जीव भाव आमुचा देऊं तुज ॥4॥
तुका ह्मणे काय मानेल तें आतां । तूं घेइप अनंता सर्व माझें ॥5॥
4246
जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥1॥
केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥
हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥2॥
तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली लुटी॥3॥
4247
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नकाऩ द्वारीं॥1॥
ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥
बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥2॥
तुका ह्मणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥3॥
4248
गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥1॥
ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे ऊंस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥
बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आह्मांसि नाहीं ॥3॥
आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥4॥
तुका ह्मणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥5॥
4249
आमुचें दंडवत पायांवरि डोइऩ । व्हावें उतराइऩ ठेवूनियां॥1॥
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥2॥
तुका ह्मणे आह्मी लडिवाळें अनाथें । ह्मणोनि दिनानाथें सांभाळावें ॥3॥
4250
भाग्यवंत आह्मी विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥1॥
नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥
प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥2॥
आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥3॥
वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥4॥
तुका ह्मणे भHजनाची माउली । करील साउली विठ्ठल आह्मां ॥5॥
4251
तीथॉ फळती काळें जन्में आगिळया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥1॥
सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥
काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥2॥
उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडािळतां ॥3॥
तुका ह्मणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥4॥
4252
संतजना माझी यावया करुणा । ह्मणउनी दीन हीन जालों ॥1॥
नेणें योग युHी नाहीं Yाान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥
भाव भHी नेणें तप अनुष्ठान । करितों किर्त्तन विठ्ठलाचें ॥2॥
ब्रह्मYाान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥3॥
तुका ह्मणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥4॥
4253
ऐसें काय उणें जालें तुज देवा । भावेंविण सेवा घेसी माझी ॥1॥
काय मज द्यावा न लगे मुशारा । पहावें दातारा विचारूनि ॥ध्रु.॥
करितों पाखांडें जोडूनि अक्षरें । नव्हे Yाान खरें भिHरस ॥2॥
गुणवाद तुझे न बोलवे वाणी । आणिका छळणी वाद सांगें ॥3॥
तरी आतां मज राखें तुझे पायीं । देखसील कांहीं प्रेमरस ॥4॥
तुका ह्मणे तुज हांसतील लोक । निःकाम सेवक ह्मणोनियां ॥5॥
4254
भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥1॥
मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें॥ध्रु.॥
तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥2॥
तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥3॥
4255
अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भHा हातीं चोट आहे ॥1॥
देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥
एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥2॥
तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥3॥
तुका ह्मणे पाणी अंगारा जयाचा । भH कान्होबाचा तो ही नव्हे ॥4॥
4256
कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥1॥
बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥
तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2॥
तुका ह्मणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥3॥
4257
पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥1॥
मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥
मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥2॥
तुका ह्मणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥3॥
4258
अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥1॥
पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥
अधमाचें चित्त दुिश्चत्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥2॥
गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥3॥
पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥4॥
तुका ह्मणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥5॥
4259
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥
शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥
नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥
तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥
4260
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥1॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । िस्त्रयेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥2॥
तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥3॥
4261
मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥1॥
परि मूर्खाचें चित्त बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥
सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥2॥
अतिप्रयत्नें गािळतां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥3॥
अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥4॥
पहा ब्रह्मानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुH केला ॥5॥
4262
भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भिHभावें ॥1॥
ह्मणउनि चिंता नाहीं आह्मां दासां । न भ्याें गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥
आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥2॥
तुका ह्मणे आह्मां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥3॥
4263
आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाइऩच्या पति पांडुरंगा ॥1॥
चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2॥
तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥3॥
4264
नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥1॥
तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥
काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥2॥
तुका ह्मणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥3॥
4265
जिहीं तुझी कास भावें धरियेली । त्यांची नाहीं केली सांड देवा ॥1॥
काय माझा भोग आहे तो न कळे । सुखें तुह्मी डोळे झांकियेले ॥ध्रु.॥
राव रंक तुज सारिके चि जन । नाहीं थोर लहान तुजपाशीं ॥2॥
तुका ह्मणे मागें आपंगिलें भHां । माझिया संचिता कृपा नये ॥3॥
4266
पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥1॥
स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥
भHाचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥2॥
ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥3॥
तुका ह्मणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥4॥
4267
प्रगट व्हावें हे अYाानवासना । माझी नारायणा हीनबुिद्ध ॥1॥
खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसिद्ध हा ॥ध्रु.॥
Yाानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्तीं धरोनियां ॥2॥
परि तूं कृपाळ होसी देवराणा । िब्रदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥3॥
उतावीळ बहु भHांचिया काजा । होसी केशीराजा तुका ह्मणे ॥4॥
4268
जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दु†हावला ॥1॥
ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥
मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥2॥
हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥3॥
तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥4॥
4269
तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥1॥
तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥
कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥2॥
तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥3॥
तुका ह्मणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥4॥
4270
हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥1॥
जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥
दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥2॥
अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥3॥
तुका ह्मणे आह्मी जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥4॥
4271
तुज केलिया नव्हे ऐसें काइऩ । डोंगराची राइऩ क्षणमात्रें॥1॥
मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥
सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥2॥
दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥3॥
तुका ह्मणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥4॥
4272
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥1॥
अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥
सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥2॥
स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥3॥
तुका ह्मणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥4॥
4273
लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी॥1॥
जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥
लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥
मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥3॥
तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥4॥
4274. पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥1॥
सोइ†याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥
बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥2॥
श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥3॥
नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥4॥
हातें मो†या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥5॥
सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥6॥
हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥7॥
पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥8॥
देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥9॥
गाइऩला देखोनी बदबदां मारी । घोडएाची चाकरी गोड लागे ॥10॥
ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥11॥
तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥12॥
4275
आह्मी रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥1॥
मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥
वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥2॥
तुका ह्मणे पेणें । आह्मां वैकुंठासी जाणें॥3॥
4276
पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥1॥
कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥
वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥3॥
अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥3॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥4॥
कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥5॥
काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥6॥
चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥7॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥8॥
मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥9॥
यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥10॥
तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥11॥
4277. नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥1॥
सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥
आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥2॥
तुका ह्मणे देवा । िब्रदें सोडोनियां ठेवा ॥3॥
4278
येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥1॥
विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अिग्न कोठें ॥ध्रु.॥
देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥2॥
ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ कां होसी कृपाळुवा ॥3॥
तुका ह्मणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥4॥
4279
समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥1॥
वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥
ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥2॥
ऐशालागीं मन वोळगे अहनिऩशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मांदिकां ॥3॥
तुका ह्मणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥4॥
4280
पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आह्मां केलें पांडुरंगें ॥1॥
काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृिष्ट जाली ॥ध्रु.॥
आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥2॥
तुका ह्मणे भाग्य या नांवें ह्मणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥3॥
4281
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमागाअ ॥1॥
चंचळ चित्तासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भावाचा पैं हात धरावा निश्चयें । तेणें भवभय देशधडी ॥2॥
नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाइप सर्वकाळ ॥3॥
तुका ह्मणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरु जाला ॥4॥
4282
षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥1॥
त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी नििश्चती फावलें तें ॥ध्रु.॥
तैसें दुष्टकर्म जालें हरिभHा । त्यागिली ममता विषयासिH ॥2॥
इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥3॥
तुका ह्मणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥4॥
4283
बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण नाहीं॥1॥
आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥
साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥
तुका ह्मणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥3॥
4284
वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥1॥
धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भHांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥
पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रह्म सनातन अंगसंगें ॥2॥
अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥3॥
धन्य त्याची शिH भHीची हे ख्याति । तुका ह्मणे मुिH पायीं लोळे ॥4॥
4285
मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥1॥
भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥
चंद्रामृतें तृिप्तपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥2॥
अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥3॥
तुका ह्मणे काय अंधिळया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥4॥
4286
आलिया संसारीं देखिली पंढरी । कीतिऩ महाद्वारीं वानूं तुझी ॥1॥
पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥
साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥2॥
तुका ह्मणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥3॥
4287
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु॥1॥
अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥2॥
तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥3॥
4288
कोणी निंदा कोणी वंदा । आह्मां स्वहिताचा धंदा॥1॥
काय तुह्मांसी गरज । आह्मी भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥
तुह्मांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥2॥
तुका ह्मणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥3॥
4289
तुझे नामें दिनानाथा । आह्मी उघडा घातला माथा॥1॥
आतां न धरावें दुरी । बोल येइऩल ब्रीदावरी ॥ध्रु.॥
पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥2॥
तुका ह्मणे तुझे पायीं । आह्मी मिरास केली पाहीं ॥3॥
4290
रH श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥1॥
तेणें अंजनगुणें दिव्यदृिष्ट जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥
देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥2॥
न जाला प्रपंच आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळलें ॥3॥
तkवमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥4॥
4291
नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥1॥
त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥
ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी॥2॥
आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे॥3॥
केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥4॥
करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥5॥
तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥6॥
4292
मानूं कांहीं आह्मी आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥1॥
आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥2॥
तुका ह्मणे खेळों आह्मी सहजलीळे । ह्मणोनी निराळे सुख दुःख ॥3॥
4293
बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥1॥
अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥
त्याचा होइऩन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥2॥
तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥3॥
4294
पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥1॥
वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें॥ध्रु.॥
चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥2॥
व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥3॥
तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥4॥
4295
जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥1॥
तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक ह्मणती चंद्रभागा॥ध्रु.॥
तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥2॥
विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥3॥
तुका ह्मणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥4॥
4296
नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥1॥
तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥2॥
तुका ह्मणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥3॥
4297
भिHॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे॥1॥
प्रेम व्याज देइप हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥
माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्त्तन ॥2॥
तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाइऩत ॥3॥
तुका ह्मणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥4॥
4298
फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥1॥
भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥
मिराबाइऩसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥2॥
कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥3॥
आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥4॥
4299
हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥1॥
नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥
रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सkव माझें ॥2॥
तुका ह्मणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्तीं येऊं द्यावी ॥3॥
4300
इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥1॥
कावऑयाचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥
क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥2॥
तुका ह्मणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥3॥
4301
मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पििळतां रस कैंचा ॥1॥
वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥
नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥2॥
नैश्वर ब्रह्म तेव्हां होय ब्रह्म । तुका ह्मणे श्रम करुनी काय ॥3॥
4302
धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं॥1॥
धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥
माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥2॥
एके हातीं धरली दाढी । घे कु†हाडी दुजे हातीं ॥3॥
येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥4॥
तुका ह्मणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥5॥
4303
निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥1॥
निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥2॥
तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥3॥
4304
पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुिद्धभेद॥1॥
जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण॥2॥
निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥3॥
4305
नाना मतांतरें शब्दाची वित्पित्त । पाठांतरें होती वाचाळ ते ॥1॥
माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥
यYा याग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥2॥
तुका ह्मणे होय उपरति चित्ता । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥3॥
4306
नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥1॥
हर्षामषॉ अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥
न सरे ते भिH विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ता ॥2॥
तुका ह्मणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥3॥
4307
शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥1॥
ह्मणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥
एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥2॥
तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥3॥
4308
प्रवृित्तनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण॥1॥
Yाानािग्नहुताशीं कडशिले वोजा । आत्मसििद्धकाजा लागूनियां ॥ध्रु.॥
ब्रह्मीं ब्रह्मरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥2॥
स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥3॥
अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥4॥
4309
काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥1॥
काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥
काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥2॥
काय बा करीसी Yाानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥3॥
काय बा करीसी दंभलौकिकातें। हित नाहीं मातें तुका ह्मणे ॥4॥
4310
स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥1॥
चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥
शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥2॥
तुका ह्मणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥3॥
4311
आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥1॥
पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥
भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥2॥
नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥3॥
4312
सद्गूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥1॥
उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं॥2॥
नमस्कारीं त्याला सद्गुरायाला । तुका ह्मणे बोला नाम वाचें ॥3॥
4313
सद्गूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥1॥
हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥2॥
बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं आनंदलों ॥3॥
4314
आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्तीं देवराव ॥1॥
देवराव तो ही आहे निश्चयेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥2॥
बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं धरा भाव ॥3॥
4315
सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥1॥
फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥
शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्त्तनाचा रंग सोडों नये ॥2॥
तुका ह्मणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥3॥
4316
चला आळंदीला जाऊं । Yाानदेवा डोळां पाहूं ॥1॥
होतिल संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥ध्रु.॥
Yाानेश्वर Yाानेश्वर । मुखीं ह्मणतां चुकती फेर ॥2॥
तुह्मां जन्म नाहीं एक । तुका ह्मणे माझी भाक ॥3॥
4317
चरणीं नमन सद्गूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥1॥
गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काऑया नाथिला महाबळी ॥ध्रु.॥
ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनादऩन ॥2॥
तुका ह्मणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥3॥
4318
सद्गूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि॥1॥
ह्मणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥
कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुह्मी ॥2॥
तुका ह्मणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥3॥
4319
डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना॥1॥
परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥
डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥2॥
परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते॥3॥
ब्राह्मणें ब्राह्मणा सद्गू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥4॥
तुका ह्मणे देवें सांगितली सोय । ह्मणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥5॥
4320
संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥1॥
गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥
चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥2॥
श्वपच अंत्यज भिHस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥3॥
4321
कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा॥1॥
चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥
लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥2॥
तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥3॥
ऐसे अहंतेनें नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥4॥
4322
लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वYाा हे भ्रांति बाधूं नेणे ॥1॥
सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काइऩ ॥ध्रु.॥
तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥2॥
भोग भोग्य भोHा नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥3॥
तुका ब्रह्मानंदीं आहे तुकब्रह्म । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥4॥
4323
न ह्मणे वो आह्मी आपुलेनि चित्तीं । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥1॥
खोटा तो विटाळ । ह्मणोनि गाबाळ सांडियेले॥ध्रु.॥
भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥2॥
तुका ह्मणे आह्मी नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥3॥
4324
अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे॥1॥
ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥
स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥2॥
तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥3॥
पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनादऩन ॥4॥
तुका ह्मणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आइऩ तो चि विठो ॥5॥
4325
ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥1॥
पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥2॥
असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥3॥
तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥4॥
4326
किडा अन्नाचें मानुस । त्याचा ह्मणविल्या दास॥1॥
तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥
तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥3॥
4327
कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥1॥
रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥
ऐसिया प्रेमळा ह्मणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥2॥
एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥3॥
तुका ह्मणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदितां चि ॥4॥
4328
उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥1॥
पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥
खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥2॥
तुका ह्मणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥3॥
4329
पंढरीस जाऊं ह्मणती । यम थोर चिंता करि ती ॥1॥
या रे नाचों ब्रह्मानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥
धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥2॥
केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥3॥
दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥4॥
दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥5॥
तुका ह्मणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥6॥
4330
पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥1॥
कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥
मृित्तकेचे घट जाले नानापरी । मृित्तका अवधारीं एकपणें ॥2॥
तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥3॥
4331
पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥1॥
भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृित्त थिरावली परब्रह्मीं ॥ध्रु.॥
निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥2॥
सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकिळक ॥3॥
दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका ह्मणे ॥4॥
4332
अYाान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥1॥
Yाानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली Yाानज्योती ॥2॥
तुका ह्मणे चित्त स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥3॥
4333
दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभािळली देवरायें ॥1॥
तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥
मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥2॥
कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥3॥
धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रिक्षली दुष्काळांत ॥4॥
दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीिर्त्त मोठी ॥5॥
मुजुम करीत होता कानडा ब्राह्मण । फिर्याद लिहून पाठविली ॥6॥
अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥7 ॥
दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥8॥
विकते धारणे सवाइऩचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥9॥
दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥10॥
विठो पाडेवार भHां साहए जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥11॥
जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो ह्मणे स्थळ मंगळवेढें ॥12॥
दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥13॥
देखोनियां राजा संतोष पावला । ह्मणे व्यर्थ त्याला तलब केली॥14॥
काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो ह्मणे बेगारी विठा कां जी॥15॥
पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप ह्मणती ते॥16॥
पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥17॥
छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि॥18॥
वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा॥19॥
दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा ह्मणे जालें कवतुक ॥20॥
काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥21॥
काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा॥22॥
कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला॥23॥
पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥24॥
सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥25॥
दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो ह्मणे आपुलें कर्म नव्हे ॥26॥
आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी॥27॥
निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥28॥
दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृित्त ॥29॥
तुका ह्मणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥30॥
4334
पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाइऩन पवित्र पांडुरंग ॥1॥
दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥
तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥2॥
चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाइऩन निधान पांडुरंग ॥3॥
पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाइऩन निरंतरा पांडुरंगा ॥4॥
साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥5॥
सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥6॥
आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥7॥
नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥8॥
दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥9॥
4335
धरोनियां फरश करी । भHजनाचीं विघ्नें वारी॥1॥
ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥
सेंदुर शमी बहुिप्रय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥2॥
उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥3॥
नागयYाोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥4॥
भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥5॥
4336
नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी॥1॥
ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥
नाम प्र†हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥2॥
नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥3॥
नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी॥4॥
नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥5॥
नाम जाणे शुकमूतिऩ । जाणे राजा परििक्षती ॥6॥
नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥7॥
4337
बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥1॥
करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥
सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥2॥
पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥3॥
विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥4॥
4338
किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥1॥
नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥2॥
तुका ह्मणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥3॥
4339
उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥1॥
जिव्हाऑयाचा काठी उबाऑयाच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥
तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥2॥
तुका ह्मणे ऐसी नोव†याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥3॥
4340
न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥1॥
चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥
काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥2॥
तुका ह्मणे आह्मी बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥3॥
4341
संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥1॥
मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥
कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥2॥
तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥3॥
4342
विधवेसि एक सुत । अहनिऩशीं तेथें चित्त ॥1॥
तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥
सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं । पतिव्रते जैसा पति॥3॥
4343
ह्मणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥1॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥
शािळग्रामासि ह्मणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥2॥
भावी सद्गु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥3॥
हरिभHाच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥4॥
तुका ह्मणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥5॥
4344
स्वगाअचे अमर इिच्छताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आह्मां ॥1॥
नारायणनामें होऊं जिवनमुH । किर्त्तनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥
वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥2॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥3॥
तुका ह्मणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि॥4॥
4345
व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥1॥
पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥
अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥2॥
तुका ह्मणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे॥3॥
4346
पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥1॥
ब्रह्मादिका दुर्लभ वांटा । आह्मां फावला राणटां ॥ध्रु.॥
गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥2॥
उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥3॥
गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥4॥
खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥5॥
4347
आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥1॥
पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाइऩ आमुचि माता ॥ध्रु.॥
भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥2॥
तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥3॥
4348
गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी॥1॥
तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥
जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥2॥
तुका ह्मणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥3॥
4349
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥1॥
मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥
बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥2॥
तुका ह्मणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं॥3॥
4350
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥1॥
रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥
कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥2॥
तुका ह्मणे आस । संनिध चि जगदीशा॥3॥
4351
सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥1॥
सर्वांगें तो सवाौत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥
ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥2॥
तुका ह्मणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा॥3॥
4352
जो का निर्गुण निराकार । तेथें धरियेले अवतार॥1॥
निर्गुण होता तो सगुणासि आला । भिHसाटीं प्रगटला ॥ध्रु.॥
जो का त्रिभुवनचाळक । तो हा नंदाचा बाळक ॥2॥
सोडविलें वसुदेवदेवकीसि । अवतार धरिला तिचे कुशी ॥3॥
मारियेला कंसराणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥4॥
तुका ह्मणे देवादिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥5॥
4353
जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥1॥
नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुह्मां आह्मां ॥ध्रु.॥
येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥2॥
तुका ह्मणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥3॥
4354
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीYाान ॥1॥
त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चिळसवाण ॥ध्रु.॥
प्रेतदेह गौरविलें। तैसें विटंबवाणें जालें ॥2॥
तुका ह्मणे खाणें विष्ठा । तैशा देहबुिद्धचेष्टा॥3॥
4355
पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु ।
तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥
रुसला गुलाम । धणी करीतो सलाम ।
तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥
रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि ।
तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥
देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥
तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥
4356
ब्राह्मणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रह्म नामें एका ॥1॥
लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा॥ध्रु.॥
सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥2॥
केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥3॥
नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥4॥
तुका ह्मणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥5॥
4357
नरदेह वांयां जाय । सेवीं सद्गूचे पाय ॥1॥
सांडोनियां अहंभाव । धरीं भHी पूजीं देव ॥ध्रु.॥
थोराचिये वाटे। जातां भवशोक आटे ॥2॥
प्रल्हादातें तारी । तुका ह्मणे तो कंठीं धरीं ॥3॥
4358
संचित तैशी बुिद्ध उपजे मनामधीं । सांगितलें सििद्ध नव जाय ॥1॥
ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥2॥
घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका ह्मणे ॥3॥
4359
कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥1॥
तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥
अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥2॥
तुका ह्मणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥3॥
4360
धन्य जालों हो संसारीं । आह्मी देखिली पंढरी ॥1॥
चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥
करूं क्षेत्रप्रदिक्षणा। भेटूं सत या सज्जनां ॥2॥
उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥3॥
तुका ह्मणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥4॥
4361
पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥1॥
तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥
आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥3॥
4362
सोडियेल्या गाइऩ नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥1॥
सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाइऩ वनामाजी ॥ध्रु.॥
गाइऩगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥2 ॥
काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥3॥
गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥4॥
तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥5॥
तुका ह्मणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥6॥
4363
ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृिप्त जाली ॥1॥
मुखींचें उिच्छष्ट हिरोनियां खात । वििस्मत विधाता देखोनियां ॥ध्रु.॥
दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । वििस्मत मानसीं सुरवर ॥2॥
देव ॠषि मुनि सिद्ध हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥3॥
तुका ह्मणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥4॥
4364
आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥1॥
श्वानखररूपी होऊनियां आले । उिच्छष्ट कवळ वेचिताति ॥ध्रु.॥
होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥2॥
अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां ह्मणे घ्या रे धणी ॥3॥
तुका ह्मणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥4॥
4365
एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥1॥
एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥
हाता हात हाणे लाही । पळतां घाइऩ चुकविती ॥2॥
तुका ह्मणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥3॥
4366
चला वळूं गाइऩ । दूर अंतरल्या भाइऩ ॥1॥
खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥
गाइऩ हकारी कान्हया । ह्मणोनि लागती ते पायां ॥2॥
तुका ह्मणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥3॥
4367
नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥1॥
हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥
जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥2॥
तुका ह्मणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥3॥
4368
हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥1॥
देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥
आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥2॥
तुका ह्मणे काय बहु बोलों फार । भHीविण नर अभाग्य कीं ॥3॥
4369
जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥1॥
गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥2॥
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥3॥
4370
स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥1॥
तेवीं शब्दYाानें करिती चावटी । Yाान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥
बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥2॥
कागदीं लिहिली नांवाची साकर। चाटितां मधुर केवीं लागे ॥3॥
तुका ह्मणे जळो जळो त्याचें Yाान। यमपुरी कोण दंड साहे ॥4॥
4371
भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खििळलें त्यासी॥1॥
समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥
वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥2॥
तुका ह्मणे पुंडलीका । भिHबळें तूं चि निका ॥3॥
4372
आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥1॥
यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥
सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥2॥
तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥3॥
4373
भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥1॥
मन बुिद्ध जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥
कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥2॥
तुका ह्मणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥3॥
4374
कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुह्मांपुढें ॥1॥
ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥
तुमची तुह्मां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥2॥
तुका गातो नामीं । तेथें नाहीं आह्मी तुह्मी ॥3॥
4375
नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥1॥
लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥2॥
तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥3॥
4376
सांवळें सुंदर पाहे दृिष्टभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥1॥
मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाइऩसवें सदा ॥ध्रु.॥
मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥2॥
वरपंग भाव नको ह्मणे तुका । करीं प्राणसखा नारायणा॥3॥
4377
एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी॥1॥
कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥
जाउनि पडे दुर्घटवनीं। श्वापदांनीं वेढिली ॥2॥
मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें॥3॥
मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥4॥
तुका ह्मणे चित्तीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥5॥
4378
पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥1॥
पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥
कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।2॥
मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥3॥
तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥4॥
4379
उदार कृपाळ पतितपावन । िब्रदें नारायणा जाती वांयां ॥1॥
वणिऩलासि श्रुति नेणे तुझा पार । राहे मौनाकार नेति ऐसें ॥ध्रु.॥
तेथें माझा धांवा पावे कोणीकडे । अदृष्ट हें पुढें वोडवलें ॥2॥
कोण ऐसा भH लाधला भाग्यासी । आठवण ऐसी द्यावी तुज ॥3॥
तुका ह्मणे नको पाहों माझा अंत । जाणोनि हे मात उडी घालीं ॥4॥
4380
ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥1॥
पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥
आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥2॥
तुका ह्मणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥3॥
4381
कां रे पुंडएा मातलासी । उभें केलें विठ्ठलासि ॥1॥
विस्त क्षीरसागरवासीं । आला उभा पंढरीसि ॥ध्रु.॥
भHी देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥2॥
तुका ह्मणे बळी । तूं चि एक भूमंडळीं ॥3॥
4382
शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥1॥
काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥
जीवपरमात्मा ऐक्यासि। सदा वसो हृदयेंसीं ॥2॥
तुका ह्मणे देवा । कंठीं वसावें केशवा॥3॥
4383
माझें परिसावें गा†हाणें । चित्त द्यावें नारायणें ॥1॥
माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥
सबाहएअंतरसाक्ष। ऐसा वेदीं केला पक्ष ॥2॥
तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा॥3॥
4384
गुरुचिया मुखें होइल ब्रह्मYाान । न कळे प्रेमखुण विठोबाची ॥1॥
वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥2॥
तुका ह्मणे सांडा जाणिवेचा शीण । विठोबाची खूण जाणती संत ॥3॥
4385
देव आतां आह्मीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥1॥
एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥
बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥2॥
पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पइप देखा ॥3॥
तुका ह्मणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥4॥
4386
पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥1॥
निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥2॥
नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥3॥
तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥4॥
4387
कीर्त्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाइऩ धन विटाळ तो ॥1॥
हरिभHाचि माता हे हरिगुणकीिर्त्त । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥ध्रु.॥
अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाइऩना जननीची ॥2॥
तुका ह्मणे त्याचें दर्शन ही खोटें । पूर्वजांसि नेटें नरका धाडी ॥3॥
4388
पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥1॥
आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥
संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥2॥
परतोनि सोइऩ धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥3॥
घातलीसे मिठी नाही भिHभाव । उदार पंढरिराव तुका ह्मणे ॥4॥
4389
येइप गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥1॥
येइप गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥
न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥2॥
तुका ह्मणे धांव घालीं कृष्णाबाइऩ । क्षेम चाहूंबाही देइप मज ॥3॥
4390
कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥1॥
शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाइऩ॥ध्रु.॥
क्षण एक धीर होत नाहीं चित्ता । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥2॥
तुका ह्मणे हें चि करीं देइप । तइप च विश्रामा पावइऩन॥3॥
4391
आतां मोकलावें नव्हे हें उचित । तरी कृपावंत ह्मणवावें ॥1॥
पूवाअ भH जाले सर्व आपंगिले । नाहीं उपेिक्षले तुह्मीं कोणी ॥ध्रु.॥
माझिया वेळेसि कां गा लपालासी । विश्व पोसितोसि लपोनियां ॥2॥
करावी ह्मणावी सर्वां भूतीं दया । तरी भेटावया येइऩन मी ॥3॥
तरी माझे हाती देइप मनबुिद्ध । जरि दयानिधि येशील तूं ॥4॥
तुका ह्मणे तूं चि अवघा सूत्रधारी । माझी सत्ता हरी काय आहे ॥5॥
4392
माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥1॥
वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा॥ध्रु.॥
साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥2॥
क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥3॥
साहए होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥4॥
कृपा करोनि देइप दया क्षमा शांती । तेणें तुझी भिH लाभइऩल ॥5॥
माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥6॥
तुका ह्मणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥7॥
4393
अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥1॥
तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥
मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥2॥
तुका ह्मणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥3॥
4394
आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥1॥
पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेिक्षलें न सोडीं मी ॥ध्रु.॥
कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥2॥
तुका ह्मणे कोठें गुंतलेति हरी । येइप झडकरी पांडुरंगा ॥3॥
4395
बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥1॥
तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥
ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥2॥
तुका ह्मणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥3॥
4396
पंचािग्नसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥1॥
सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥
सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥2॥
वाटतें सेवटीं जालासि निष्ठ । न देसी उत्तर तुका ह्मणे ॥3॥
4397
तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥1॥
बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥
मी तया विश्वासें आलों शरणागत । पूवाअचें अपत्य आहें तुझें ॥2॥
अनंत ब्रह्मांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥3॥
अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥4॥
ऐसें विचारिलें ह्मणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥5॥
तुका ह्मणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥6॥
4398
काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥1॥
नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥
आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥2॥
तुका ह्मणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥3॥
4399
नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥
न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥
पूवाअ जाले भH असंख्य विरH । काम क्रोध अहंते निदाऩिळलें ॥2॥
ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥3॥
कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या िब्रदासी राखावया ॥4॥
तुका ह्मणे एक बाळक अYाातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥5॥
4400
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।
अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥1॥
अगा विश्वव्यापका जनादऩना । गोकुळवासी गोपिकारमणा ।
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मदऩना कंसाचिया ॥ध्रु.॥
अगा सवाौत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥2॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥3॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।
अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥4॥
अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका ह्मणे ॥5॥