॥अभंगवाणी॥२००१ते२२५०॥


2001
रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥1॥
आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण॥ध्रु.॥
रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥2॥
तुका ह्मणे केलें किळकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥3॥
2002
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥1॥
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धामिऩक पुण्यशील ॥ध्रु.॥
आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥2॥
तुका ह्मणे मुगुटमणी हे भिH । आणीक विश्रांति अरतिया ॥3॥
2003
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥1॥
करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥
वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥2॥
तुका ह्मणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥3॥
2004
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥1॥
चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥
उिच्छष्ट हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥2॥
तुका ह्मणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥3॥ ॥4॥
2005
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥1॥
कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥
ओठ हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा ॥2॥
तुका ह्मणे श्रम । एक विसरतां राम ॥3॥
2006
आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥1॥
होसी फजीती वरपडा । लक्ष चौ†यासीचे वेढां ॥ध्रु.॥
नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥2॥
एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥3॥
जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥4॥
तुका ह्मणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥5॥
2007
लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥1॥
घेइप हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा॥ध्रु.॥
घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥2॥
हित सावकासें । ह्मणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका ह्मणे नेणसी ॥3॥ ॥3॥
2008
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥1॥
मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥
होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥2॥
तुका ह्मणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥3॥
2009
झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥1॥
जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥
जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥2॥
तुका ह्मणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥3॥
2010
आह्मी बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे॥1॥
काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥
कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥2॥
कारण सवें एका । अवघें आहे ह्मणे तुका ॥3॥
2011
उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥1॥
आह्मीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥
भोजन भोजनाच्या काळीं। मागों करूनियां आळी ॥2॥
तुका ह्मणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा॥3॥
2012
केला पण सांडी । ऐसियासी ह्मणती लंडी ॥1॥
आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥
आपला निवाड। आपणें चि करितां गोड ॥2॥
तुह्मीं आह्मीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥3॥
आसे धुरे उणें । मागें सरे तुका ह्मणे॥4॥
2013
न व्हावें तें जालें । तुह्मां आह्मांसी लागलें ॥1॥
आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥
पाटोऑयासवेंसाटी। दिली रगटएाची गांठी ॥2॥
तुका ह्मणे हरी । आणूनियां करिन सरी ॥3॥
2014
पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥1॥
आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥
पावणांचा ठसा। दावीं मज तुझा कैसा ॥2॥
वाव तुका ह्मणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥3॥
2015
करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥1॥
हे तों झोंडाइऩचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥
आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥2॥
तुका ह्मणे किती । बुडविलीं आळवितीं॥3॥
2016
नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥1॥
आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥
पांचांमधीं जावें । थोडएासाटीं फजित व्हावें ॥2॥
तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आह्मी कांहीं ॥3॥
टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥4॥
तुका ह्मणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥5॥ ॥9॥
2017
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥1॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
पाणचो†याचें दार। वरिल दाटावें तें थोर ॥2॥
वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥3॥
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥4॥
तुका ह्मणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥5॥
2018
करूं याची कथा नामाचा गजर । आह्मां संवसार काय करी ॥1॥
ह्मणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें किळकाळ ॥ध्रु.॥
आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥2॥
तुका ह्मणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥3॥ ॥2॥
2019
काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥1॥
अंतरींची बुिद्ध खोटी । भरलें पोटीं वाइऩट ॥ध्रु.॥
काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥2॥
तुका ह्मणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥3॥
2020
मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी॥1॥
आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट॥ध्रु.॥
आलें अंगासी तें बिळवंत गाढें । काय वेडएापुढें धर्मनीत ॥2॥
तुका ह्मणे कळों येइऩल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥3॥ ॥2॥
2021
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥1॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवे ती गंगा । ह्मणवेल उगा राहें काळा ॥2॥
भूत भविष्य कळों येइऩल वर्तमान । करवती प्रसन्न रििद्धसिद्धी ॥3॥
स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥4॥
तुका ह्मणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥5॥ ॥1॥
2022
भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥1॥
इिच्छतील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥
विसरले मुHी भिHअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥2॥
तुका ह्मणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥3॥
2023
भHां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥1॥
सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूतिऩ उभा॥ध्रु.॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥2॥
तुका ह्मणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥3॥
2024
प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृित्त पायीं ॥1॥
सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृिष्ट केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥
सकळ इंिद्रयें जालीं ब्रह्मरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥2॥
तुका ह्मणे जेथें वसे भHराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥3॥
॥3॥
2025
कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥1॥
काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥
नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥2॥
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥3॥
तुका ह्मणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥4॥ ॥1॥
2026
काळ जविळ च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥1॥
कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं॥ध्रु.॥
काळ जविळच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥2॥
काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥3॥
काळ भोंवताला भोंवे। राम येऊं नेदी जिव्हे ॥4॥
तुका ह्मणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥5॥ ॥1॥
2027
दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें॥1॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥
मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥2॥
तुका ह्मणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥3॥
2028
साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें॥1॥
तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥2॥
तुका ह्मणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥3॥ ॥2॥
2029
तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे।
नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें ।
भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें ।
विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥1॥
आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सkवहीन ।
दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥
आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप ।
मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप ।
ज्योति ना अंधार अवघा एकंकार। तेथें काय पुण्यपाप ।
विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥2॥
बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया ।
सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया ।
मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां ।
तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका ह्मणे देवराया ॥3॥ ॥1॥
2030
कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तkवता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥1॥
ऐसी गहन कर्मगति। काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्तीं । कांहीं नेघे आपुला॥ध्रु.॥
उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । ह्मणे करितां ढवाऑया ॥2॥
जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी ददुऩरा । तुका ह्मणे दुरा । देशत्यागें तयासी ॥3॥
2031
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे।
भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥1॥
आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ।
शुकनिळकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकिळया ॥ध्रु॥
पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला ।
जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥2॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न ह्मणें चाडा ।
धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका ह्मणे जाण पावे पीडा ॥3॥ ॥2॥
2032
कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥1॥
येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥
कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥2॥
तुका ह्मणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥3॥
2033
नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥1॥
तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥
नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥2॥
तुका ह्मणे तया करावें तें काइऩ । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥3॥
2034
जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥1॥
कैसा पाहे चिद्रद्रािष्ट । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥
कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥2॥
त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका ह्मणे॥3॥
2035
दुर्बळा वाणीच्या एक दोनि सििद्ध । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥1॥
काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥
तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥2॥
तुका ह्मणे एक वाहाती मोिळया । भाग्यें आगिळया घरा येती ॥3॥ ॥4॥
2036
परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें
एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेिळया । एक ते बांधोनि माडी
अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥1॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥
एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं
फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे
सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥2॥
एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती। ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें
तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं
तुका ह्मणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥3॥ ॥1॥
2037
नाहीं आह्मां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥1॥
पाहें तेथें पांडुरंग रखुमाइऩ । सत्यभामा राही जननिया॥ध्रु.॥
लज्जा भय कांही आह्मां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥2॥
तुका ह्मणे आह्मी सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥3॥
2038
गभाअ असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा॥1॥
कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥
सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥2॥
गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥3॥
पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥4॥
तुका ह्मणे निश्चळ राहें । होइऩल तें सहज पाहें ॥5॥
2039
न ह्मणे कवणां सिद्ध साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥1॥
ऐसें माझे बुिद्ध काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥
गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥2॥
देइप चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥3॥
आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥4॥
तुका ह्मणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देइप प्रेम देवा ॥5॥
2040
अिग्नमाजी गेलें । अिग्न होऊन तें च ठेलें ॥1॥
काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥
लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥2॥
सरिता वोहळा ओघा। गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥3॥
चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे॥4॥
तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं॥5॥ ॥4॥
2041
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥1॥
रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥
प्रेमामृतपान । होइऩल चरणरजें स्नान ॥2॥
तुका ह्मणे सुखें । तया हरतील दुःखें॥3॥
2042
करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥1॥
माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥
ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥2॥
तुका ह्मणे गोड । तेथें पुरे माझें कोड॥3॥ ॥2॥
2043
वेद जया गाती । आह्मां तयाची संगति ॥1॥
नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥
ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥2॥
तुका ह्मणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥3॥
2044
तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥1॥
दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥
माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥3॥
2045
मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥1॥
म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥
आह्मी घ्यावें नाम । तुह्मां समाधान काम ॥2॥
तुका ह्मणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥3॥
2046
तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥1॥
करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥
अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥2॥
तुका ह्मणे आइऩ । हातीं धरूनि संग देइऩ ॥3॥
2047
दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥1॥
तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥
नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥2 ॥
तुका ह्मणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥3॥
2048
मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥1॥
व्याला वाडविलें ह्मुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥
माझें पोट धालें। तुझे अंगीं उमटलें ॥2॥
तुका ह्मणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥3॥
2049
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥1॥
हें चि माझेंभांडवल।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥
भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥2॥
तुका ह्मणे डोइऩ । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥3॥
2050
आह्मी घ्यावें तुझें नाम । तुह्मी आह्मां द्यावें प्रेम॥1॥
ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥
माझी डोइऩ पायांवरी । तुह्मी न धरावी दुरी ॥2॥
तुका ह्मणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥3॥
2051
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥1॥
न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥2॥
तुका ह्मणे देवा । करीन ते घ्यावी सेवा॥3॥
2052
पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥1॥
ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥
जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥2॥
तुका ह्मणे शंका । हित आड या लौकिका ॥3॥
2053 आह्मांवैष्णवांचा।नेमकायामनेंवाचा॥1॥
धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥
उचित समय । लाजनिवारावें भय ॥2॥
तुका ह्मणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥3॥
2054
उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥1॥
सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥
नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥2॥
तुका ह्मणे लोकां । उरली वाचा मारीं हाका॥3॥
2055
बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥1॥
आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥
किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥2॥
माझें मज नारायणा । देतां ां रे नये मना॥3॥
भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥4॥
तुका ह्मणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥5॥
2056 जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥1॥ नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥ करूनियां नीती। दिल्याप्रमाणें चालती ॥2॥ हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं॥3॥ बळ बुद्धी युHी । तुज दिल्या सर्व शHी ॥4॥ तुका ह्मणे खरा । आतां घेइऩन मुशारा ॥5॥
2057
फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥1॥
करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥ चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । पावे ंतरींची सेवा॥3॥ ॥15॥
2058
दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥1॥
कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥ काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद ोले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां॥2॥ हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका ह्मणे रीत । तुमची आह्मां न कळे ॥3॥
2059
आह्मी भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥1॥
तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावें । न संगतां ठावें । तुह्मांविण न पडे॥ध्रु.॥ दोनी फाकलिया वाटा । ाोवी केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड रानें भरती ॥2॥ तुका ह्मणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥3॥
2060
वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥1॥
आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥
आलें बहुतांच्या मना । कां रे न ोसी ााहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागों आपुल्या ॥2॥
तुका ह्मणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥3॥ ॥3॥
2061
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥1॥
तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥
द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥2॥
तुका ह्मणे मनीं । आपुल्या च लाभहानि॥3॥
2062
रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना॥1॥
सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥
पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥2॥
तुका ह्मणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥3॥
2063
जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय ॥1॥
नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥
हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥2॥
तुका ह्मणे हळु । जाला कढत शीतळु ॥3॥
॥3॥
2064
ब्रह्मरस घेइप काढा । जेणें पीडा वारेल ॥1॥
पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥
भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥2॥
तुका ह्मणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥3॥
2065
अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥1॥
सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥
निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥2॥
तुका ह्मणे भावसार । करूनि फार मििश्रत ॥3॥
2066
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥1॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥2॥
तुका ह्मणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥3॥
2067
करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥1॥
बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधु ॥ध्रु.॥
करुनि अराणूक पाहे । भलत्या साहए व्हावया ॥2॥
बोले तैसी करणी करी । तुका ह्मणे एक हरि ॥3॥ ॥4॥
2068
उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं ।
पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥1॥
त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा ।
संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥
रूप डोिळयां आवडे । कीतिऩ श्रवणीं पवाडे ।
मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥2॥
तुका ह्मणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम ।
हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥3॥
2069
आह्मां हें चि भांडवल । ह्मणों विठ्ठल विठ्ठल ॥1॥
सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥
बाखराचें वाण। सांडूं हें जेवूं जेवण ॥2॥
न लगे वारंवार । तुका ह्मणे वेरझार ॥3॥
2070
आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥1॥
आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥
दृढ माझें मन। येथें राखावें बांधोन ॥2॥
तुका ह्मणे वाटे । नको फुटों देऊं फांटे॥3॥ ॥3॥
2071
काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥1॥
करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥
निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥2॥
तुका ह्मणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥3॥
2072
मागणें तें मागों देवा । करूं भHी त्याची सेवा ॥1॥
काय उणे तयापाशीं । रििद्धसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥
कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥3॥
2073
चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥1॥
असे भHांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥
अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥2॥
तुका ह्मणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥3॥
2074
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥1॥
नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥
वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥2॥
तुका ह्मणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कु†हाडी ॥3॥ ॥4॥
2075
बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥1॥
वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥
पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥2॥
तुका ह्मणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥3॥
2076
जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥1॥
डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥
बहुथोडएा आड । निवारितां लाभें जाड ॥2॥
तुका ह्मणे खरें । नेलें हातींचे अंधारें॥3॥
2077
मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥1॥
वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥
अराणूक नाहीं कधीं। जाली तरि भेदबुिद्ध ॥2॥
अंतरली नाव । तुका ह्मणे नाहीं ठाव॥3॥ ॥3॥
2078
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥1॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साहए येथें ॥ध्रु.॥
शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥2॥
तुका ह्मणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥3॥
2079
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥1॥
पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥
वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥2॥
तुका ह्मणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥3॥
2080
बुिद्धमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥1॥
जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥
खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥2॥
तुका ह्मणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥3॥ ॥3॥
2081
पूर्वजांसी नकाऩ । जाणें तें आइका ॥1॥
निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥
मात्रागमना ऐसी।जोडी पातकांची रासी ॥2॥
तुका ह्मणे वाट । कुंभपाकाची ते नीट॥
2082
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥
देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥1॥
कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥2॥
लेंकरें वित्त पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥3॥
आपुली शुिद्ध जया नाहीं । आणिकांची ते जाणे काइऩ ॥4॥
तुका ह्मणे ऐसे जन । नकाऩ जातां राखे कोण ॥5॥
2083
आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥1॥
जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वYा उदार मायबाप ॥ध्रु.॥
ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥2॥
बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥3॥
तुका ह्मणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥4॥
2084
अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥1॥
काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥2॥
नाहीं इंिद्रयां दमन । काय मांडिला दुकान ॥3॥
सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥4॥
तुका ह्मणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥5॥
2085
लय लक्षूनियां जालों ह्मणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥1॥
जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही नििश्चतीनें ॥ध्रु.॥
तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥2॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥3॥
तुका ह्मणे जरी होइऩल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥4॥ ॥5॥
2086
पुरली धांव कडिये घेइप । पुढें पायीं न चलवीं ॥1॥
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥
अवघी निवारावी भूक। अवघ्या दुःख जन्माचें ॥2॥
तुका ह्मणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥3॥
2087
जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥1॥
आतां तूं चि बाहएात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥
नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥2॥
तुका ह्मणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥3॥
2088
जेथें माझी दृिष्ट जाय । तेथें पाय भावीन ॥1॥
असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥
अवघा च अवघे देसी। सुख घेवविसी संपन्न ॥2॥
तुका ह्मणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥3॥ ॥3॥
2089
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥1॥
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥
कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावता ॥2॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥3॥
तुका ह्मणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें॥4॥
2090
अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास॥1॥
जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥
कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥2॥
तुका ह्मणे भHराजा । कोण वर्णी पार तुझा ॥3॥
2091
प्रमाण हें त्याच्या बोला । देव भHांचा अंकिला॥1॥
न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥
अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥2॥
वदे उपचाराची वाणी । कांहीं माग ह्मणऊनि ॥3॥
उदासीनाच्या लागें । तुका ह्मणे धांवे मागें॥4॥
2092
कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥1॥
हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥
होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥2॥
तुका ह्मणे भिHभाव । हा चि देवाचा ही देव ॥3॥
2093
जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥1॥
न लगें सांगावें मांगावें ॥
जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥ बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥2॥
तुका ह्मणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥3॥
2094
आह्मी नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें॥1॥
देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥
आह्मां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥2॥
तुका ह्मणे संतीं । वर्म दिलें आह्मां हातीं ॥3॥
2095
जालों निर्भर मानसीं । ह्मणऊनि कळलासी ॥1॥
तुझे ह्मणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥
चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥2॥
तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥3॥
तुका ह्मणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥4॥ ॥7॥
2096
नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥1॥
काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥
तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥2॥
एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें॥3॥
तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥4॥
काय करूं एका। मुखें सांग ह्मणे तुका ॥5॥
2097
विठ्ठल माझी माय । आह्मां सुखा उणें काय ॥1॥
घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥
क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥2॥
तुका ह्मणे कृपावंत । ठेवीं आह्मांपाशीं चित्त ॥3॥
2098
भिHसुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥1॥
हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥
महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥2॥
सहस्रनामाची आरोळी। एक एकाहूनि बळी ॥3॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥4॥
तुका ह्मणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी॥5॥ ॥3॥
2099
पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥1॥
काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥2॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥3॥
तुका ह्मणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥4॥
2100
कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥1॥
नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥
देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥2॥
त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥3॥
तुका ह्मणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥4॥

2101
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥1॥
गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥
आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥2॥
तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥3॥
तुका ह्मणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥4॥ ॥3॥
2102
देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु॥1॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥2॥ तुका ह्मणे सार । भिH नेणती गव्हार ॥3॥
2103
भाग्यवंत ह्मणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥1॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥ भुिHमुHीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥2॥ गाइलें पुराणीं । तुका ह्मणे वेदवाणी ॥3॥
2104
जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥1॥ न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥
अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥2॥ तुका ह्मणे बुिद्ध । ज्याची ते च तया सििद्ध ॥3॥
2105
नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥1॥ मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥2॥ तुका ह्मणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥3॥
2106
तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसििद्ध केणें तये घरीं ॥1॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥ आषाढी कातिऩकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥2॥ मुिH कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥3॥ तुका ह्मणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥4॥
2107
दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥1॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥1॥ जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आिंळगी आवडी करूनियां ॥2॥ शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥3॥ तुका ह्मणे असों अनाथ दुबळीं । आह्मांसी तो पाळी पांडुरंग ॥4॥
2108
आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥1॥ मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥ जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥2॥ आणिकाचें मज ह्मणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥3॥ तुका ह्मणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥4॥
2109
कळेल हें तैसें गाइऩन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥1॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥ होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥2॥ काय करूं कळा युHी या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥3॥ तुका ह्मणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥4॥
2110
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥1॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥ कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥2॥ काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥3॥ तुका ह्मणे भोळा भाविक हा देव । आह्मी त्याचे पाव धरूनी ठेलों ॥4॥
2111
न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥1॥ नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवHे ॥ध्रु.॥ पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥2॥ आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥3॥ तुका ह्मणे आह्मी आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥4॥
2112
दैन्य दुःख आह्मां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥1॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥ आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥2॥ आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निद।वा कोणा चाड ॥3॥ तुका ह्मणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आह्मां ॥4॥
2113
काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥1॥ धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥ मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥2॥ तुका ह्मणे थीत । नागवला नव्हे हित॥3॥
2114
विठ्ठल मुिHदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥ सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥ अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भHीचें तें वर्म ॥4॥ तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्षण ॥5॥
2115
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥1॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥ काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥2॥ द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥3॥ तुका ह्मणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥4॥
2116
न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥1॥ जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥ आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥2॥ काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥3॥ तुका ह्मणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥4॥
2117
वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥ हरिभHीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥ तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥5॥
2118
तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥1॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥ जन्म नांव धरी भHीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥2॥ असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥3॥ तुका ह्मणे देव भHपण सार । कवतुक- वेव्हार तयासाटीं ॥4॥
2119
याचिया आधारें राहिलों नििंश्चत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥1॥ माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । ह्मणऊनि लागली यास चिंता ॥2॥ मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंिद्रयें तापटीं फांकों नेदी ॥3॥ तुका ह्मणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥4॥
2120
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥1॥ ह्मणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥ किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥2॥ तुका ह्मणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥3॥
2121
जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥1॥ काय वाउगी घसघस । आह्मी विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आह्मी जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥2॥ तुका ह्मणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥3॥
2122
नव जातां घरा । आह्मी कोणाच्या दातारा ॥1॥ कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥ नाहीं आह्मी खात। कांहीं कोणाचें लागत ॥2॥ कळे तैसी सेवा । तुका ह्मणे करूं देवा ॥3॥
2123
मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरि हिता ॥1॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥ संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥2॥ एखादिया भावें । तुका ह्मणे जवळी यावें ॥3॥
2124
काय जाणों वेद । आह्मी आगमाचे भेद ॥1॥ एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥ कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥2॥ तुका ह्मणे दीना । नुपेक्षावें नारायणा॥3॥
2125
धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥1॥ हें चि आह्मां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥ तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥2॥ नाहीं भीड भार । तुका ह्मणे साना थोर॥3॥
2126
निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥1॥ नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥ निवडावें तन। सेतीं करावें राखण ॥2॥ तुका ह्मणे नीत । न विचारितां नव्हे हित॥3॥
2127
दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥1॥ लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥ बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥2॥ तुका ह्मणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥3॥
2128
नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥1॥ येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥ध्रु.॥ नाहीं केली निंदा । आह्मीं दुसिलेंसे भेदा ॥2॥ तुका ह्मणे मज । येणें विण काय काज॥3॥
2129
कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥1॥ तुज आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥ तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥2॥ तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड॥3॥
2130
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥1॥ तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥ देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराइऩ ॥2॥ कायावाचामनें । तुका ह्मणे दुजें नेणें॥3॥
2131
आतां होइप माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥1॥ येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥ अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥2॥ तुका ह्मणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥3॥
2132
नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी॥1॥ आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥ सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥2॥ तुका ह्मणे मी तों अYाान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥3॥
2133
दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥1॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुह्मी आतां ॥ध्रु.॥ खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥2॥ तुका ह्मणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥3॥
2134
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥1॥ ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥ पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥2॥ तुका ह्मणे जाली कोंबडएाची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥3॥
2135
किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥1॥ आतां माझें हातीं देइप हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥ राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥2॥ तुका ह्मणे ऐसा होइऩल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥3॥
2136
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥1॥ चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥ पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥3॥
2137
पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥1॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥ खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥2॥ तुका ह्मणे पाळी तोंडऴिचया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥3॥
2138
आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥1॥ पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे॥ध्रु.॥ घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥2॥ तुका ह्मणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥3॥
2139
कृपावंता दुजें नाहीं तुह्मां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥1॥ घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रह्मरस ॥ध्रु.॥ आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥2॥ तुका ह्मणे आह्मांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥3॥
2140
पािळलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥1॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥ नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥2॥ तुका ह्मणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥3॥
2141
पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुH आतां मज ॥1॥ जन्मांतरें मज तैसीं देइप देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥ वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥2॥ करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥3॥ तुका ह्मणे आह्मी मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥4॥
2142
माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥1॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥ सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥2॥ गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥3॥ तुका ह्मणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥4॥
2143
कथा दुःख हरी कथा मुH करी । कथा याची बरी विठोबाची ॥1॥ कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥ कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥2॥ कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥3॥ तुका ह्मणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥4॥ ॥13॥
2144
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥1॥ तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥ करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझें हृदय वसवा ॥3॥
2145
भला ह्मणे जन । परि नाहीं समाधान ॥1॥ माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥ कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥2॥ तुका ह्मणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥3॥
2146
शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥1॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥ एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥2॥ बुिद्ध नाहीं िस्थर । तुका ह्मणे शब्दा धीर ॥3॥
2147
उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥1॥ कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥ काय बळयुिH । नाहीं तुझे अंगीं शिH ॥2॥ तुका ह्मणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥3॥
2148
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥1॥ माझी शिH नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥ आह्मां ओढी काळ। तुझें क्षीण झालें बळ ॥2॥ तुका ह्मणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥3॥
2149
आतां घेइप माझें । भार सकळ ही ओझें ॥1॥ काय करिसी होइऩ वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥ तूं चि डोळे वाती। होइऩ दीपक सांगातीं ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । विचाराया चाड नाहीं॥3॥
2150
असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥1॥ माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥ गािळयेले भेद । सारियेले वादावाद ॥2॥ तुका ह्मणे मधीं । आतां न पडे उपाधि॥3॥
2151
करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥1॥ आतां ये वो माझे आइऩ । देइप भातुकें विठाइऩ ॥ध्रु.॥ उपायासी नाम। दिलें याचें पुढें क्षेम ॥2॥ बीज आणि फळ । हें चि तुका ह्मणे मूळ॥3॥
2152
धनासीं च धन । करी आपण जतन ॥1॥ तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥ जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥2॥ तुका ह्मणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥3॥
2153
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥1॥ असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥ खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥2॥
तुका ह्मणे उभें । आह्मी राखियेलें लोभें॥3॥ ॥10॥
2154
पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥1॥ तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥ ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥2॥ तुका ह्मणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥3॥
2155
बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥1॥ माझें चित्त मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥ दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥2॥ तुका ह्मणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येइऩल कळों ॥3॥
2156
मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥1॥ याचा कांहीं तुह्मीं देखा परिहार । सर्वYा उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥ काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥2॥ तुका ह्मणे आतां जालों उतराइऩ । कळों यावें पायीं निरोपिलें ॥3॥
2157
सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥1॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥ कुबिर नांव मोळी वाहे। कैसी पाहें फजिती ॥2॥ तुका ह्मणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख काुंफ्दतां ॥3॥
2158
न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥1॥ रुचिविण काय शब्द वा†या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥ आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें॥2॥ तुका ह्मणे तुह्मी असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥3॥
2159
मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आह्मां ॥1॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥ गाणें गीत आह्मां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥2॥ तुका ह्मणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥3॥
2160
एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥1॥ वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥ उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥2॥ तुका ह्मणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥3॥
2161
काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥1॥ मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाटए तुझे चाळे ॥ध्रु.॥ जाली तरी मर्यादा। किंवा त्रासावें गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे साचा । कोठें जासी हृदयींचा॥3॥
2162
कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥1॥ आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥ लावूनियां सवे। पळतां दिसाल बरवे ॥2॥
तुका ह्मणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥3॥ ॥3॥
2163
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥1॥ धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥ द्रव्य आणि कन्या। येथें कुळ कर्म शोधण्या ॥2॥ तुका ह्मणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥3॥
2164
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥1॥ बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥ फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥2॥ तुका ह्मणे मान । लवणासारिखें लवण॥3॥
2165
मज नाहीं धीर । तुह्मी न करा अंगीकार ॥1॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥ चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥2॥ वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें॥3॥
2166
तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥1॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥ वेठीऐसा करीं भिHवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥2॥
तुका ह्मणे कइप देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥3॥ ॥4॥
2167
हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥1॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥ नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥2॥
तुका ह्मणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥3॥ ॥1॥
2168
देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥1॥ येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥ काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त ओढे ॥2॥ विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका॥3॥
2169
खोटएाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥1॥ काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥2॥
तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे॥3॥ ॥2॥
2170
पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥1॥ दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूतिऩ पांडुरंग ॥ध्रु.॥ केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥2॥ कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता॥3॥ माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । कािळमा काजळी पावविते ॥4॥ तुका ह्मणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥5॥ ॥1॥
2171
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥1॥ हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥ जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥2॥ तुका ह्मणे अंधऑयाऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥3॥
2172
नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुिद्ध॥1॥ ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥ कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥2॥ तुका ह्मणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥3॥
2173
माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥1॥ इिच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥ देह आह्मी केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥2॥ तुका ह्मणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥3॥
2174
धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥1॥ ह्मणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥ आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥2॥
तुका ह्मणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥3॥ ॥4॥
2175
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥1॥ ताकिर्याचें अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाइऩचाळे ॥ध्रु.॥ माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥2॥ तुका ह्मणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥3॥
2176
कस्तुरीचें अंगीं मीनली मृित्तका । मग वेगळी कां येइऩल लेखूं ॥1॥ तयापरि भेद नाहीं देवभHीं । संदेहाच्या युिH सरों द्याव्या ॥ध्रु.॥ इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥2॥ तुका ह्मणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥3॥
2177
भिH तें नमन वैराग्य तो त्याग । Yाान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥1॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥ उदक अिग्न धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥2॥
तुका ह्मणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥3॥ ॥3॥
2178
श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥1॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥2॥ तुका ह्मणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥3॥
2179
नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥1॥ नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥ सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥2॥ चुकी जाली आतां काय। तुका ह्मणे उरली हाय ॥3॥
2180
आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥1॥ माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥ भांडवल सेवा। हा चि ठेवियेला ठेवा ॥2॥ करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥3॥
2181
आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥1॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥ आधारें वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसेवणी तुमचिया ॥2॥
तुका ह्मणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥3॥ ॥4॥
2182
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृित्त या ॥1॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥ जळो ऐसी िब्रदावळी। भाटवोळीपणाची ॥2॥ तुका ह्मणे पाहों डोळां । अवकळा नये हे॥3॥
2183
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥1॥ जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥ अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥2॥ तुका ह्मणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥3॥
2184
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥1॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥ काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥2॥ तुका ह्मणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥3॥
2185
प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥1॥ धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥ निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥2॥
तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥3॥ ॥4॥
2186
दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नकाऩचा कोथळ सांटवण ॥1॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥ सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखटएाची ॥3॥
2187
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥1॥ सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥ विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥2॥ तुका ह्मणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे॥3॥
2188
आYाा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥1॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोइऩ येथुनें चि॥ध्रु.॥ येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥2॥
तुका ह्मणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥3॥ ॥3॥
2189
न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥1॥ आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥ संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥2॥ आYोच्या पाळणें । असें तुका संतां ह्मणे॥3॥
2190
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥1॥ आह्मां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥ प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥2॥ तुका ह्मणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥3॥
2191
गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥1॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावऑयाचा ॥ध्रु.॥ अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । ह्मणतां शाहाणा येइल कैसा ॥2॥ तुका ह्मणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥3॥
2192
कुत†याऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे॥1॥ जाय तिकडे हाडहाडी । गो†हवाडी च सोइरीं ॥ध्रु.॥ अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥2॥ तुका ह्मणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥3॥
2193
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥1॥ बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥ सेविलिया निःकामबुद्धी। मदें शुद्धी सांडवी ॥2॥
त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥3॥ ॥5॥
2194
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥1॥ असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥ दुस†यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥2॥ एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥3॥
2195
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥1॥ वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥ तेथील तेथें येथील येथें । वेगऑया कुंथे कोण भारें ॥2॥
याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥3॥ ॥2॥
2196
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥1॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥ कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥2॥ तुका ह्मणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥3॥
2197
आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥1॥ पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥ फेडा आतां पांग। अंगीं लपवुनी अंग ॥2॥ दुजें नेणें तुका । कांहीं तुह्मासी ठाउका॥3॥
2198
बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥1॥ फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥ कुंटित चि युिH । माझ्या जाल्या सर्व शिH ॥2॥
तुका ह्मणे देवा । काममोहें केला गोवा ॥3॥ ॥3॥
2199
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥1॥ नये पाहों कांहीं गो†हवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥ भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥2॥
तुका ह्मणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥3॥ ॥1॥
2200
चावळलें काय न करी बडबड । न ह्मणे फिकें गोड भुकेलें तें ॥1॥ उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥ गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काइऩ ॥2॥ तुका ह्मणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥3॥
2201
आपुला तो देह आह्मां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥1॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥ नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥2॥ तुका ह्मणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥3॥ ॥2॥
2202
चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥1॥ धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥ उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥2॥ सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥3॥
2203
बरें सावधान । राहावें समय राखोन ॥1॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥ लाभ अथवा हानी । थोडएामध्यें च भोवनी ॥2॥ तुका ह्मणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥3॥ ॥2॥
2204
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥1॥ जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥ घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥2॥ आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥3॥
2205
धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥1॥ जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥ विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥2॥
तुका ह्मणे लांसी । माया नाचविते कैसी ॥3॥ ॥2॥
2206
दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥1॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥ न ह्मणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥2॥ तुका ह्मणे भागा । आली निंदा करी मागा॥3॥
2207
शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥1॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥ दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥2॥
सिंदळी त्या सती । तुका ह्मणे थुंका घेती ॥3॥ ॥2॥
2208
भHा ह्मणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥1॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥ अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥2॥
तुका ह्मणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥3॥ ॥1॥

2209
गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥1॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥ न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥2॥ तुका ह्मणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥3॥
2210
बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥1॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥ सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥2॥
तुका ह्मणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥3॥ ॥2॥
अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक
बोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥
लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविला आणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ 20 ॥
2211
भूतबाधा आह्मां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥1॥ जाला भHीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥ जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥3॥
2212
नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥1॥ जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥ ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥2॥ तुका ह्मणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥3॥
2213
करूं कवि काय आतां नाही लाज । मज भHराज हांसतील ॥1॥ आतां आला एका निवाडएाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥ अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥2॥ तुका ह्मणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव िस्थर माझा मज ॥3॥
2214
नाहीं आइकत तुह्मी माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥1॥ येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥ करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥2॥ तुका ह्मणे आला आYोसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥3॥
2215
नव्हे तुह्मां सरी । येवढें कारण मुरारी ॥1॥ मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥ स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥2॥ शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची॥3॥
2216
केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥1॥ सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥ दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥2॥ जातीं उखळें चाटूं । तुका ह्मणे राज्य घाटूं ॥3॥
2217
आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥1॥ हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥ जाणें तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥2॥ तुका ह्मणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥3॥
2218
पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥1॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥ द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥2॥ तुका ह्मणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥3॥
2219
बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥1॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥ समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥2॥ तुका ह्मणे आह्मां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥3॥
2220
काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥1॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥ नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥2॥ तुका ह्मणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥3॥
2221
माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥1॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥ न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे लाज । आह्मां स्वामीचें तें काज ॥3॥
2222
कांहीं मागणें हें आह्मां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥1॥ देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुिद्ध राहिलीसे ॥ध्रु.॥ शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥2॥ तुका ह्मणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥3॥
2223
मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥1॥ काय आह्मी नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥ बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥2॥ तुका ह्मणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥3॥
2224
असो तुझें तुजपाशीं । आह्मां त्यासी काय चाड ॥1॥ निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥ करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥2॥ तुका ह्मणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥3॥
2225
आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥1॥ काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥ िस्थरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥2॥ तुका ह्मणे विळतां मन । आह्मां क्षण न लगे ॥3॥
2226
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥1॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥ नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥2॥ तुका ह्मणे आह्मां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥3॥
2227
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥1॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥ लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥2॥ तुका ह्मणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढएासाटीं ॥3॥
2228
स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥1॥ खोटएा तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥ ह्मणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥2॥ तुका ह्मणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥3॥
2229
कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥1॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शHी । न चलेसी युिH जाली पुढें ॥ध्रु.॥ बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥3॥
2230
रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें नििंश्चत ॥1॥ तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥ जाली इंिद्रयां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥2॥
तुका ह्मणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥3॥ ॥20॥
स्वामींनीं तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंतें येऊन समाधान केलें कीं,
कवित्व कोरडें आहे तें काढणें उदकांतून
2231
थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥1॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥2॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥3॥
2232
तूं कृपाळू माउली आह्मां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥1॥ माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥ कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें॥2॥ तुका ह्मणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आइऩ । आतां पुढें काइऩ तुज घालूं सांकडें ॥3॥
2233
कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥1॥ चुकी जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वहएा राखिल्या॥ध्रु.॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥2॥ गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका ह्मणे जाणावें ॥3॥
2234
काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥1॥ उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुिद्ध । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥ तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव । आह्मां दासां कींव कां भाकणें लागली ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥3॥
2235
नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुह्मां आकांत ॥1॥ वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥ जीव घेती मायबापें थोडएा अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥2॥ तुका ह्मणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता। काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥3॥
वर्षाव केला
2236
तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥1॥ देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥ तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तkवांचा जनिता सकळ सत्तानायक ॥2॥ कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका ह्मणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥3॥
2237
मी अवगुणी अन्यायी किती ह्मणोन सांगों काइऩ । आतां मज पायीं ठाव देइप विठ्ठले ॥1॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी िस्थर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥ अनेक बुिद्धचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥2॥
तुका ह्मणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥3॥ ॥7॥
2238
बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥1॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥ जें आह्मी बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देइऩन प्रसंगीं आजि शिव्या ॥2॥ निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥3॥ खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥4॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा बइऩल तूं देवा भारवाही ॥5॥ लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥6॥ तुका ह्मणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥7॥
2239
आह्मी भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥1॥ होसी सरड बेडुक । बाग गांढएा ही पाइऩक ॥ध्रु.॥ बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥2॥ तुका ह्मणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥3॥
2240
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥1॥ रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ चौघांचिया मतें। आधीं खरें केलें होते ॥2॥ तुका ह्मणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥3॥
2241
प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥1॥ काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥ सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें॥2॥ तुका ह्मणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम।3॥ ॥4॥
2242
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥1॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥ गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।2॥
तुका ह्मणे काळ । पळे देखोनियां बळ ॥3॥ ॥1॥
2243
रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥1॥ शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥2॥
अंतकाळींचा सोइरा । तुका ह्मणे विठो धरा ॥3॥ ॥1॥
2244
जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें॥1॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥ केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥2॥
तुका ह्मणे ठाया । जाइप आपल्या आलिया ॥3॥ ॥1॥
2245
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥1॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥ ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां॥2॥ कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवताअ मायेचिये॥3॥ मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥4॥ तुका ह्मणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची॥5॥
2246
कृपाळू सज्जन तुह्मी संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥1॥ आठवण तुह्मी द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥ अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥3॥
2247
संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥1॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥ भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥2॥
तुका ह्मणे शेष घेइऩन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥3॥ ॥3॥
2248
लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥1॥ पुरोनि पंढरिये उरलें भिHसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥ बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥2॥ असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका ह्मणे विठ्ठल ॥3॥
2249
कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥1॥ उदित हें भाग्य होइऩल कोणे काळीं । चित्त तळमळी ह्मणऊनि ॥ध्रु.॥ उतावीळ बाहएा भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥2॥ तुका ह्मणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंिद्रयांची ॥3॥
2250
नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंिद्रयां व्यापार नाठवती ॥1॥ गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें ॥ध्रु.॥ प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥2॥
तुका ह्मणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥3॥

Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP